आजारपण, हॉस्पिटल, औषध बनवणार्या कंपन्या, मनुष्याचा जीव आणि भांडवलशाही

औषध बनवणाऱ्या कंपन्यांना फायदा कधी होईल? आजार बरा झाल्यावर कि आजार परत परत होत राहिल्यावर?

मी जर डेंगू वर औषध बनवत असेल तर जर शासनाने डेंगूचे संपूर्ण उच्चाटन केले तर माझा उद्योग चालेल कसा?

सरकारी हॉस्पिटल्स का कमी आहेत? कारण खाजगी हॉस्पिटल्स नि नफा कमवावा म्हणून.

आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेनुसार हृद्य विकाराने मृत्यू होणार्यांची संख्या हि खूप जास्त आहे. भारताची लोकसंख्या २०१३ च्या आकड्यानुसार १२५.२० करोड आहे असे समजू, ह्यानुसार हृद्य विकारामुळे दर ३३ सेकंदाला एकाचा मृत्यू हा होत असतो.हे वास्तव आहे, आकडे सगळे सरकारी आणि निम सरकारी कार्यालयात उपलब्ध आहेत. "६,२०,००० करोड आकड्यात सहा लाख वीस हजार करोड रुपयांची उलाढाल हि हृद्य रोग संबंधी आजार, केंसर, तीव्र श्वसन रोग, आणि मानसिक आजार ह्यांची आहे."

संशोधनावरील खर्च कमी करण्यासाठी माणसांवर प्रयोग करावे लागतात त्यासाठी आपला देश हा उत्तम आहे कारण इथे गरिबी, बेकारी खूप आहे आणि भ्रष्ट शासनव्यवस्था पण ज्यामुळे कंपन्या आपली उत्पादने हि खूप कमी वेळात खर्च वाचवून बाजारात उपलब्ध करून देतात. इथले नागरिक हे भावनिक असल्यामुळे ते समोरच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतात. त्यामुळे समोरचा जसा नाचवत जाईल तसे ते नाचत जातात, भले ह्यामध्ये त्यांचा जीव गेला तरी त्यांना काहीही फरक पडत नाही.

तुम्ही फक्त उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीचे हिमनगाचे फक्त टोक बघितले आहे, त्याखाली ते कसे काम करते ह्याचा बिलकुल अंदाज नाही आणि येणारही नाही. जे डॉक्टर ह्या व्यवस्थेनुसार चालतात किंवा मजबुरीने चालवून घेतात ते सामान्य जीवन जगतात आणि जे ह्या विरुद्ध उभे असतात ते गरीबीचे जीवन जगत असतात आणि तोच इमानदार आणि सभ्य समाज अश्या डॉक्टर पासून लांब जातो.

हॉस्पिटल मध्ये पाय ठेवला कि त्यांना अगोदरच टार्गेट असते कि इतका नफा झाला पाहिजे किंवा आलेल्या पेशंट कडून इतका पैसा निघालाच पाहिजे तेव्हा तेही मजबूर असतात. शेवटी त्यांनाही जीवन जगायचेच असते. आज जर त्यांनी काम नाही केले तर त्यांचे घर चालणार कसे? औषधे आता इतकी महत्वाची केली आहे कि आम्ही मनुष्य प्राणी ह्यांनी तीच खात जगत रहावे. बाकी ताजी फळे-भाज्या ह्याच्यामधून आम्हाला काहीच भेटत नाही. बाळंतीन स्त्री नैसर्गिक रित्या बाळ जन्माला घालूच शकत नाही, तिला सिझरिंग च करावे लागेल.

लोक भावनिक मुद्दे जसे जात, पात धर्म, प्रदेश बोलीभाषा ह्या मध्ये इतके गुंतलेले आहे कि त्यांना आपल्या जिवापेक्षा हे मुद्दे खूप महत्वाचे वाटतात आणि त्यासाठी ते रस्त्यावरही उतरायला तयार असतात. अश्याच सामान्य लोकंच्या जीवनशैलीचा फायदा घेत अनेक मोठ मोठ्या हॉस्पिटल्स, औषध बनवणार्या कंपन्या आणि नकली औषध बनवणार्या कंपन्यांचे मोठ मोठे केसेस दाबून टाकेल जातात. लोक आपला हजारो वर्षांचा इतिहास गर्वाने सांगतील पण ८ महिन्यापूर्वी झालेल्या पोलीस कारवाईचे त्यांना अ कि ब असे काहीच आठवणार नाही.

इथे कुपोषणाने दररोज मरणाऱ्या शेकडो गरिबांच्या बाळांसाठी बातमी देण्यासाठी वृत्त वाहिन्यांना वेळ नाही पण एका प्रसिद्ध कलाकाराच्या घरी जन्माला येणाऱ्या एका बाळासाठी दिवस, आठवडे आणि महिने खर्च करतील. आणी ह्याच बातम्या सामान्य, सभ्य, इमानदार आणि सरळ मार्गाचा मुखवटा घेवून चालणारा समाज हा डोक्यावर घेईल. जशी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची समाजाला सवय झाली आहे तशीच गरिबांच्या मरण्याची देखील झाली आहे.

भ्रमाचा मुखवटा फाडा आणि ह्या वास्तवात ताठ मानेने कसे जगू शकाल ह्याबद्दल विचार करा. कोणीही तुमचे घर चालवणार नाही, कोणीही तुम्हाला पोसणार नाही, तुमचे तुम्हालाच बघायचे आहे. भावनिक दृष्ट्या कणखर बना, ह्यामुळे तुम्ही जग नाही तर एखादा तरी जीव वाचवू शकता किंवा भले करू शकता आणि हाच आनंद अब्जोंच्या घरात आहे. कमेंट योध्यांपासून लांब रहा, जे नुसते कमेंट कमेंट खेळत असतात. एकदा का तुम्हीं त्यांच्यात गुंतला की संपूर्ण दिवस हा तुमचा खराब निघून जातो.

बोध :
भांडवलशाही मध्ये मनुष्याच्या जिवापेक्षा कंपनी आणि सत्ताधारी ह्यांचा नफा हा खूप महत्वाचा आहे.

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार