यशस्वी होण्याची ९ रहस्य



एका गरीब घरच्या तरुणीने एकदा मला प्रश्न केला कि “मी यशस्वी कशी होणार?” “यशस्वी होण्यासाठी मला कुठल्या मार्गाचा अवलंब करावा लागे?”
मला त्यावेळेस काही सुचले नाही. पण हा प्रश्न काही मला शांत बसवत नव्हता. कारण गरीब लोकांचे चांगलेच अनुभव गाठीशी होते. गरिबांना कधीच कोणी माणुसकीच्या नजरेने बघत नाही, अर्थात अपवाद असतात पण त्यांही संख्या अगदीच नगण्य असल्यामुळे ती असून नसल्यासारखी आहे.
मला अगदी कमी शब्दात आणि सामान्य गरीब, मध्यम वर्गीय ह्यांना समजेल अश्या भाषेत आणि उदाहरण देवून सांगायचे होते. त्यासाठी माझा खजिना म्हणजेच पुस्तके, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय लेखक आणि शास्त्रज्ञांचा भरणा आहे ती परत चाळायला सुरवात केली.
मला माहित होते कि हीच पुस्तक रुपी खजीण्यामधील हजारो रुपयांची गुंतवणूक मला पुढे जावून लाखो रुपयांचा फायदा करून देईल, आणि दिलेच. अर्थात आवड होती आणि पाहिजेच, मी पुढे स्पष्ट करेन.
यशाची ९ रहस्य
१) आवड : ऑटोमोबाईल आणि इंडस्ट्रीयल डिझायनर फ्रीमन थोमस ने सांगितले आहे कि “मी मला जे आवडेल तेच करत गेलो”. जेवढी यशस्वी व्यक्तिमत्व होवून गेले आहे ते त्यांना जे आवडेल किंवा जे करण्यापसून त्यांना आनंद भेटत होता तेच ते काम करत होते, ना कि पैश्यांसाठी.
२) केरोल कोट्टा कम्युनिटी एन्ड नेशनल इनिशेटीव्ह चे उपाध्यक्ष ह्यांनी सांगितले “मी जे करतो ते करण्यासाठी मी दुसऱ्यालाही पैसे देईल.” आणि महत्वाचा मुद्दा जर तुम्ही तुमच्या आवडीचे करत आहात तर पैसा आणि प्रसिद्धी आपोआप तुमच्याकडे येईल.
३) रुपर्ट मरडॉक ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांचे मालक सांगतात “काहीही सप्या मार्गाने भेटत नाही, कठीण परिश्रम करावे लागते. पण मला हे करताना मजा वाटते.” हो मजा वाटते हे तुम्ही बरोबर ऐकले, तुम्ही तुमचे आवडीचे काम करता तेव्हा ते काम करताना तुम्हाला आनंद होतो व मजा येत असते.
४) एलेक्स गार्डनर म्हणतो “जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला तुमचे नाक क्ष्याम्ध्ये तरी खुपसून बसावे लागेल, आणि त्यामध्ये प्राविण्य मिळवावे लागेल. इथे काही चमत्कार वगैरे नाही आहे, आहे ते फक्त सराव, सराव आणि सराव.”
५) लक्ष्य केंद्रित करा. नॉर्मन फ्रेडरिक केनेडियन फिल्म सेंटर चा संस्थापक, डायरेक्टर, नट आणि प्रोड्युसर म्हणतो “माझ्या मते तुम्हाला एका वेळेस एकाच कामावर लक्ष्य केंद्रित करावे लागेल.”
६) पुढे जायला सतत प्रेरित करत रहा. मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या स्वतला पुढे जायला प्रेरित करत रहावे लागते. तुम्हाला लाजाळूपणा आणि स्वतःविषयी अविश्वास ह्याच्या पलीकडे जाण्यासाठी प्रेरित करत रहावे लागेल.
७) गोल्डी होण अमेरिकन नटी म्हणते “मी नेहमी स्वतःवर अविश्वास दाखवायची. कि मी हे काम करू शकत नाही, मी हुशार नाही आहे, मला नाही वाटत कि मी हे करू शकते म्हणून.”
कधी कधी स्वतःला प्रोस्ताहित करणे इतके सोपे नसते. त्यासाठी आईचा अविष्कार करण्यात आला.
८) फ्रेंक गेरी अमेरिकन आर्किटेक म्हणतो “माझी आई मला प्रोस्ताहित करत होती.”
९) सेवा करा. शेर्विन न्युलंड अमेरिकन सर्जन आणि रायटर म्हणतो “डॉक्टर म्हणून सेवा करणे हा माझ्यासाठी बहुमान आहे.”
जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्याकडे २ मार्ग आहेत, पहिला मला २००० रुपये फी देवून वरील ९ रहस्य आत्मसात करून घ्याल, आणि दुसरा स्वतःहून हे वरील ९ रहस्य आत्मसात करायचा प्रयत्न करा आणि यशवी व्हा.
जीवनात सर्वकाही शक्य आहे. जर वरील ९ व्यक्तिमत्व यशस्वी होऊ शकतात तर तुम्ही पण होऊ शकता. बिनधास्त प्रयत्न करा.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार