चला उद्योजक घडवूया ह्याचा मुख्य उद्देश हा आर्थिक विकास आणि आणि आत्मविकास ह्यामध्ये सर्वांगीण विकास ज्यामध्ये मानसीक आणि शारीरिक आरोग्यही येते हे आहे.
ज्या वेळेस हा पेज सुरु केला त्या वेळेस एक गैर समज होता कि मराठी उद्योजक आणि व्यवसायिक खूपच कमी आहे तो दुसऱ्याच महिन्यापासून सुरु झालेल्या फोन कॉल पासून तो विश्वास, गैरसमज मोडला गेला.
१ वर्ष जुना उद्योजक, व्यवसायिक आणि १५, २०, ३० वर्ष जुने उद्योजक, व्यवसायिक ते ज्यांना वारसा हक्काने उद्योग, व्यवसाय भेटला आहे आणि काहींचा पिढ्यांचा व्यवसाय आहे अश्यांचे फोन यायला सुरवात झाली.
तेच पुढे समुपदेशन, मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी यायला लागले. ९० टक्क्याहून जास्त हे करोडोंचे उलाढाल करणारे आहेत. त्यामुळे अजून एक गैर समज दूर झाला कि मराठी मनुष्य हा उंच उडी घ्यायला घाबरतो म्हणून.
करोडोंची उलाढाल करणारे जवळ सर्वच आपले, आरोग्य, घर आणि कर्ज सांभाळून इतकी मोठी जबाबदारी आरामत पार पाडत आहेत. मुंबई मधला मराठी जेवढ्या मोठ्या प्रमाणात पाठ फिरवून मुंबई बाहेर पळून गेला त्याउलट जास्त प्रमाणात मुंबई शहराबाहेरील मराठी हा ताठ मानेने तिथल्या उच्चभ्रु वस्तीत राहत आहे.
सिनेमा मध्ये जी मराठी लोकांची नोकर म्हणून ओळख दाखवायचे ती शहरात कदाचित असेल पण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर असे दृश्य नव्हते.
धाडस प्रचंड,सकारात्मक दृष्टीकोन प्रचंड, चिकाटी प्रचंड आणि गरुडझेप घेतलेला असे वर्णन मी करू शकतो.
ह्यापलीकडे परिस्थिती अशी झाली आहे कि आता विदेशातून मागणी यायला लागली आहे. ह्यावरून तुम्हाला अंदाज येईल कि मराठी झेंडा हा कधीच विदेशात गाडला गेला आहे.
ह्यामध्ये मुली आणि स्त्रियाही पाठी नाही आहे. त्याही सरकारी, खाजगी कंपन्यांमध्ये उच्च पदाचा अनुभव घेतलेल्या आणि स्वतःचे उद्योग व्यवसाय असलेल्या आहेत. वरील करोडोंच्या उलाढाली त्याही करणाऱ्या आहेत.
जे स्थिर मानसिकतेचे असतात, त्यांचे ध्येय आणि उदिष्ट हे निश्चित असते आणि त्यांना माहित असते कि आपल्याला सध्या कसली गरज आहे ते, त्यांच्या विचार आणि कृतीत खूप कमी अंतर असते, त्यांना जे पाहिजे ते त्यासंदर्भात त्यांना चांगलेच माहित असते ते त्यासंदर्भात बोलतात, त्यांना जे पाहिजे ते मिळते आणि ते पुढील वाटचालीच्या दिशेने जातात.
उद्योजक, व्यवसायिक हे कामापुरते किंवा मार्केटिंग पुरते फेसबुक आणि व्हास्टएप वर असतात त्यानंतर ते परत आपल्या उद्योग, व्यवसायिक विश्वात रममाण होतात.
जसे तुमचे अंतर्मन असते तशी परिस्थिती आणि लोक तुमच्या आयुष्यात येत असतात किंवा तसे अनुभव येत असतात. जर तुम्ही वरील परिस्थितीत नाही आहात तर तुम्हाला आत्मविकासाची सक्त गरज आहे. ज्यामध्ये पहिले तुमचा दृष्टीकोन बदलला जातो आणि त्यानंतर तुमची परिस्थिती आपोआप बदलली जाते.
तुम्हाला जर बाळकडू मिळाले असेल किंवा तुमची जडण घडण आर्थिक साक्षरतेपासून झाली असेल ते गोष्ट निराळी आहे. झाड वाढायला जसे पोषक वातावरण लागते तसेच उद्योजक आणि व्यवसायिक घडायलाही पोषक वातावरण लागते.
जर झाड निट वाढत नसेल तर वातावरण बदलायची गरज आहे नाही कि झाडावर उपचार करायची, तसेच मुल, उद्योजक आणि व्यवसायिक घडायलाहि वातावरण बदलायची गरज आहे ना कि उद्योग व्यवसाय तपासण्याची.
समविचारी लोकांसोबत राहा, जिथे नैसर्गिक वाढ भेटेल तिथे तग धरून राहा आणि जर वातावरण नसेल तर ते बदला, जे उद्योजक आणि व्यवसायिक आहेत त्यांच्यासोबत राहा, त्यांना उद्योग व्यवसायात मदत करा निस्वार्थीपणे, मग हळू हळू तुम्ही बदलत जाल.
व्हास्टएप, फेसबुक वर भेटणे आणि प्रत्यक्षात भेटणे ह्यामध्ये जमीन आसमान चा फरक आहे. इंटरनेट हे आभासी जग आहे, जो त्यावर विश्वास ठेवतो तो मूर्ख असतो, आणि जो प्रत्यक्षात ५००० ऑनलाईन मित्रांपेक्षा ५ सकारात्मक ऑफलाईन मित्रांसोबत राहत असतो तो प्रगती करून जातो आणि त्याची मानसिक स्थिती हि चांगली असते. तो स्वप्नात नाही तर वास्तवात आयुष्य जगत असतो.
जगामध्ये आणि भारतामध्येही जे तटस्थ आहेत त्यांनी जग घडवले आहे, बाकी परिस्थितीनुसार ते आणि त्यांचे कुटुंब संपून गेले आहे. नेहमी तटस्थ व्यक्तींबरोबर राहा. अश्यांकडे सकारात्मकता, संपत्ती आणि समृद्धी आकर्षित होत असते. आणि हे पिढ्यान पिढ्या समृध्द आयुष्य जगत असतात.
काही नियम हे मी तयार करू शकत नाही आणि न ते तुम्हाला लागू करू शकत, जे तुमच्या समजण्यावर आणि आकलनशक्तीवर अवलंबून असते. हे पेज लाईक करण्यापूर्वी आणि ग्रुप जॉईन करण्यापूर्वी लक्ष्यात ठेवा.
हा पेज सुरु झाल्यापसून अनेकांनी लेख आणि जेही माझे विचार मांडतो त्यावरून त्यांचे स्वतःचे नवीन उद्योग, व्यवसाय सुरु केला आहे आणि काहींनी तर अगदी थोड्या कालावधीमध्ये दुसरा उद्योग, आणि व्यवसायही सुरु करून टाकला आहे.
अनेकांचे आजारी पडलेले उद्योग व्यवसाय हे पुन्हा भरारी घेवून उभे राहिले आहे. अनेकांनी परत जोशाने, धोके पत्करत घाट्यात चाललेल्या उद्योग, व्यवसायाला परत नफ्यामध्ये आणून सोडले आहे.
आणि बाकी प्रत्यक्षात लाभ घेवून जात आहेत. ह्या सर्वांमध्ये साम्य एकच कि त्यांच्या ध्येयाशी, उद्योग, व्यवसायाशी एकनिष्ठ आहे. मी जितके माझ्या कडे असेलेल तुटपुंजे ज्ञान त्यांना द्यायचे प्रयत्न करतो त्यापेक्षा जास्त ज्ञान आणि अनुभव मला त्यांच्याकडून मिळते.
विरोधाभास तर कधीच जाणवला नाही. इतकाच चांगला अनुभव हा मला नोकर पेश वर्गांकडूनहि आला. कोणीही तुम्हाला इथे कमेंट करताना, चर्चा करताना दिसणार नाही.
चला उद्योजक घडवूया च्या प्रवासात तुम्ही कुठे आहात? पेज लाईक केल्यापासून ३ महिन्याचा कालावधी ठरवा, त्यामध्ये आर्थिक विकासावर भर द्या, जे लेख आणि विचार नाही समजले तर आत्मविकासापासून सुरवात करा, कारण माझे लेख आणि विचार ,माझ्या सांगण्यापेक्षा तुम्हाला समजणे खूप महत्वाचे आहे.
जर तुम्ही आर्थिक विकासासाठी पूर्ण तन, मन, धन लावून देतात तेव्हा तुमचा कमीत कमी ३ महिन्यात विकास व्हायला सुरवात होतेच. एकदा का तुम्ही जुना आराखडा म्हणजे गरिबी, मध्यमवर्ग, आर्थिक समस्या आणि मर्यादा हा मोडला कि परत तुम्ही जुन्या मर्यादित आयुष्यात परत जात नाही.
उद्योग, व्यवसाय, आर्थिक विकास आणि आत्मविकास ह्याच्या प्रवाहामध्ये रहा, जर तुम्ही किनाऱ्यावर असाल तर अनेक जन कधीच तुम्ही जिथे बसला आहात त्याच्या पुढे गेलेले आहेत. ह्या प्रवाहात राहणारच जरी थांबला तरी हा सकारात्मक प्रवाह त्याला वाहून नेत जातो, पण जर अपयशाने खचून हार मानून प्रवाहाबाहेर किनाऱ्यावर थांबला कि तो कायमचाच थांबला.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार