भारतातील २०० मोठ्या कंपन्यांमधील ७२ % सीइओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) हे आयआयटी किंवा आयआयएम मधून शिकलेले नाही आहेत.

भारतातील २०० मोठ्या कंपन्यांमधील ७२ % सीइओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) हे आयआयटी किंवा आयआयएम मधून शिकलेले नाही आहेत.
तुम्ही कुठल्याही विद्यापीठामधून शिकलेले असू द्यात, तुम्ही आरामत उच्च पदावर जावू शकतात. ह्यासाठी तुम्हाला आयआयटी किंवा आयआयएम मधूनच शिक्षण घ्यायची गरज नाही आहे. उच्च विद्यापीठांनी फक्त २८ % सीइओ दिले आहेत, बाकी ७२ % सीइओ हे सामान्य विद्यापीठांमधून आलेले आहेत.
आता जेव्हाही तुम्ही तुमच्या विद्यापीठात शिकायला जाल तेव्हा तेवढ्याच आत्मविश्वासाने जा, प्रत्येक विद्यार्थ्याकडे आणि स्वतःकडे तुम्ही भविष्यातील सीइओ होणार ह्याच दृष्टीकोनातून बघा. शिक्षकांनी देखील हीच भावना ठेवून विद्यार्थ्यांना शिकवायचे, लहान विद्यापीठामधल्या शिक्षकांनीहि लक्ष्यात असू द्यात कि तुमच्या वर्गातील विद्यार्थी कदाचित भविष्यात सीइओ किंवा मालक बनतील.
मर्यादा आखून घेवू नका. जग विद्यापीठांच्या चार चौकटीत बनवलेल्या शिक्षणामुळे चालत नाही, जगाला कोणीहि बंधनात बांधून ठेवू शकत नाही. आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षणाला जाणीव करून द्याल. स्पर्धेला घाबरू देवू नका, मोठी स्वप्न बघायला लावा.
हत्ती हा मोठा ताकदवर झाल्यावरहि त्याच्या पायाला बांधलेला दोरखंड तोडू शकत नाही कारण लहानपणी त्याच्या पायाला दोरखंड बांधून ठेवलेला असतो, लहनपणी त्याची ताकद हि कमी असते त्यामुळे तो प्रयत्न करूनही ते दोरखंड तोडू शकत नाही, त्याच लहानपणी ज्याला आपण संस्कार बोलू तो तो मोठा बलवान झाल्यावरही निघत नाही आणि, मोठा शक्तिशाली हत्ती ती लहानशी दोरी तोडू शकत नाही.
हा मानसिक दोरखंड कायमस्वरूपी तोडून टाका. प्रत्येक परिस्थितीवर स्वतः संशोधन करा, स्वतः प्रयोग करा आणि करा स्वतः ला ह्या मानसिक दोरखंडापासून मुक्त.
तार्किक शक्तीवर मानसिक शक्ती नेहमीच विजय मिळवते, कारण मानसिक शक्ती हि ध्येय आणि स्वप्नांमध्ये कुणालाही येवू देत नाही, तुमच्या स्वतःच्या नकारात्मक विचार आणि कृतीलासुद्धा.
संपूर्ण माहिती हि खालील लिंक मध्ये दिली आहे.
Is the magic of brand IIT-IIM waning? - The Economic Times
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार