संपूर्ण जगामध्ये तुम्हाला ९ प्रकारच्या मानसिकतेची लोक भेटतीलचसंपूर्ण जगामध्ये तुम्हाला ९ प्रकारच्या मानसिकतेची लोक भेटतीलच
१) अब्जो खरबोंची संपत्ती असलेले श्रीमंत
२) पिढीजात श्रीमंत
३) द्वितीय पिढी आणि त्यापुढील श्रीमंत
४) नव श्रीमंत
५) उच्च मध्यम वर्ग
६) मध्यम वर्ग
७) कनिष्ठ मध्य वर्ग
८) गरीब
९) अतिगरीब
हे काही फक्त पैश्यान बाबतीत नाही आहे, जेव्हा तुम्ही ह्यांचा जवळून अनुभव घ्याल तेव्हा तुम्हाला जाणवेल कि हा जो उतरता क्रम लागला हा तो त्यांच्या मानसिकतेमुळे लागला आहे. वरील २ ते ५ क्रमांकातील लोकांशी माझा दररोज चा परिचय होत असतो, त्यांचे प्रमाण अंदाजे आपण ९० % पकडू आणि बाकी १० टक्क्यांमध्ये येतात.
जस जसा क्रम चढत जातो तस तसे विचार, भावनांची स्थिरता आणि सकारात्मक विचार हे वाढत जातात. आयुष्याचा प्रत्येक भाग ते अमर्याद जगत असतात. आणि जस जसा क्रम खाली खाली येत जातो तस तसे विचार, भावनांची अस्थिरता आणि नकारात्मक विचार वाढत जातात.
असेच काहीसे आरोग्याच्या श्रीमंती विषयी आहे, वरील १ ते ५ क्रमांकातील लोक हि रोग झाल्यावर उपचारांसाठी जास्त खर्च नाही करत, त्यांचा जास्तीत जास्त खर्च हा मानसिक आणि शारीरिक आरोग्य तंदुरुस्त ठेवणे ह्यावर जास्त भर असतो.
खालील ६ ते ९ क्रमांकातील लोकांचा औषध उपचारांवर जास्त खर्च असतो आणि आरोग्यावर खूपच कमी असतो.
१ ते ५ क्रमांकातील लोक शारीरिक आरोग्यापेक्षा मानसिक आरोग्याला नेहमीच प्राधान्य देतात, ६ ते ९ क्रमांकातील लोक हि मानसिक आरोग्याकडे आत्मविकासाच्या दृष्टीकोनातून न बघता “मी काय वेडा आहे का?” असे बोलून ते टाळतात किंवा साफ दुर्लक्ष्य करतात.
१ ते ५ क्रमांकातील लोकांकडे स्वार्थी किंवा निस्वार्थी भावनेने बोला पण नातेवाईक आणि जवळच्या नात्यांचा लोकांचा जमवला हा खूप असतो आणि वेळ प्रसंगी जास्तीत जास्त ते कामालाही येतात. ६ ते ९ क्रमांकातील लोकांमध्ये जास्तीत जास्त भांडणे आणि एकमेकांचा हेवा हा दिसुन येतो. मदतीचे प्रमाणही खुप कमी असते.
१ ते ५ क्रमांकातील मुल हि लहानपणापासून तज्ञ लोकांच्या सहवासात प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष रित्या वाढलेली असतात म्हणून ती जीवन जगायला सुरवात करतात तेव्हा लग्न, आणि मुलबाळ होवून लवकर आयुष्यात जम बसवतात. त्याउलट ६ ते ९ क्रमांकांना खूप मेहनत करावी लागते, लग्न मुलबाळ ह्यासाठी हि ते वेळ घेतात किंवा हि जबाबदारी उचलताना त्यांना प्रचंड त्रास होत असतो.
ह्या प्रत्येकांची एक मानसिक सीमा रेषा असते ज्यामुळे तो तसेच आयुष्य जगत असतो, जो पर्यंत त्यांच्या पिढीमधील कोणीतरी ती सीमारेषा तोडत नाही तोपर्यंत. मानवी समाजत हालचाल तर होते पण ती काही काही क्षणात नाही होत, काही पिढ्यांचा कालावधी किंवा शेकडो वर्षे द्यावी लागतात.
हा एका पिरेमिड सारखा आकार आहे, वर जस जसे जात जाल तस तशी लोकसंख्या खूपच कमी कमी होत जाईल आणि जस जसे खाली येत जाल तस तशी लोकसंख्या हि प्रचंड वाढलेली दिसेल. वरच्या मजल्यावरून खाली यायचे प्रमाण खूपच कमी आहे आणि खालच्या मजल्यावरून वर जायचे प्रमाण तर अगदी नगण्य आहे.
वरील १ ते ५ क्रमांका मधील लोकांना जीवनशैली फक्त टिकवून ठेवायचे आहे तर ६ ते ९ मधील लोकांना जीवन शैली निर्माण करून मगच टिकवून ठेवायची आहे. वरील १ ते ५ क्रमांकामध्ये जे असतात त्यांची मुले यशस्वी होतात व सतत मिडिया मध्ये देखील येत असतात. खालील ६ ते ९ मधीलहि यशस्वी होतात पण इथे यश हे आर्थिक स्वरुपात कमी प्रमाणात असते आणि भांडवलशाही ला पोषक नसते म्हणून ते मिडिया मध्ये येत नाहीत आणि आले तरी एखाद दुसरा चुकून.
हे पिरेमिड फक्त आणि फक्त मानसिकतेमुळे तयार झाले आहेत. एकदा का तुम्ही तुमची मानसिकता बदलली कि त्यामुळे दृष्टीकोन बदलतो आणि मग प्रत्येक संधीचे सोने करत मनुष्य आपल्याच पिढीमध्ये यशस्वी होतो.
जागृत मनोवृत्तीचा मनुष्य हे चांगलेच ओळखून आहे, समस्या होते ती सामान्य मानसिकतेच्या लोकांची. ते भावनेच्या भरात इतके वाहून जातात कि ते पैश्यांना महत्व देत नाही आणि मग ते नकारात्मकता, मानसिक, शारीरिक गरिबीमध्ये जगायला लागतात.
जागृत मनोवृत्ती ची लोक हि आपल्या शारीरक आणि मानसिक गरजा ह्या पैश्याने पूर्ण करून घेतात. ह्यासाठी अगोदर ते आत्मविकासा द्वारे मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या दररोज किंवा वेळोवेळी स्वतःला मजबूत, सक्षम आणि साक्षर करून घेतात.
सामान्य मानसिकतेची लोक हि फक्त भावनेच्या भरत सतत इकडून तिकडे वाहत जातात. आणि इथे मानसिक आणि शारीरिक सक्षमतेच्या जागी आजार, अपघात त्यांच्या अनुभवास येतात. ह्यांच्या दररोजच्या पोटापाण्याचे कसे तरी भागून जाते त्यामध्ये ह्यांना छंद किंवा इतर आवडीचे करण्यासाठी वेळच नसतो.
जागृत मनोवृत्तीची लोक हि ध्येयाशी एकनिष्ठ असतात. ते पहिले महत्व ध्येयाला देतात व नंतर इतर बाबींना. त्यांना माहित असते कि आपल्यावर करोडो रुपये सांभाळायची जबाबदारी आहे, त्यासोबत अनेक कामगारांचे आणि त्यांच्या परिवाराचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या पोट भरायचे आहे. ह्यासाठी त्यांना आपल्या परिवारालाही वेळ देता येत नाही.
सामान्य मानसिकतेची लोक फक्त त्यांच्या जीवनशैलीकडे बघतात आणि बाकी वेळ हा त्याच्याच बद्दल चर्चा करत बसतात
उद्योजक व्यवसायिक आणि गुंतवणूकदार बनने, श्रीमंत आणि समृद्ध आयुष्य जगणे हि काही मोठी गोष्ट नाही आहे, ह्यासाठी सर्वात महत्वाचा गुण लागतो तो म्हणजे धाडस, ह्या पाठोपाठ गुणांची एक शृंखलाच सुरु होते. त्यानंतर सर्वात महत्वाचा गुण लागतो तो म्हणजे मर्यादा तोडताना परत पाठी न जाण्याची जिद्द, चिकाटी.
ह्या बरोबर सकारात्मक दृष्टीकोन, स्थिर, शांत आणि थंड मानसिकता, मधाळ भाषा शैली, धूर्तपणा (हा खूप महत्वाचा आहे, हा नसेल तर तुम्ही तुमचे स्वप्न किंवा ध्येय हे दुसर्यांना आरामत देवून टाकाल. जगही त्याच धुर्ताचे ऐकेल, ना की तुमच्यासारख्या इमानदाराचे.), परिस्थितीनुसार त्याच क्षणाला साम, दाम, दंड किंवा भेद ह्याचा वापर करणे, प्रचंड एकाग्रता आणि भावनांवर ताबा असे प्रमुख गुण असणे आवश्यकच आहे, त्यानंतर त्या मनुष्य प्राण्यानुसार आणि परिस्थितीनुसार वेगवेगळे असतात आणि गुण जाणून घेण्यासाठी तज्ञांची मदत घ्यावी लागते.
ह्या गुणांना पर्याय नाही आहे. हे तुमच्याकडे असलेच पाहिजे. सिनेमा आणि वास्तव आयुष्य ह्या मध्ये जमीन आसमान चा फरक आहे.
सुरवात करणारा काही सुरवातीलाच यशस्वी होत नाही आणि होतही असले तरी त्यांचे प्रमाण हे खूपच कमी आहे, सामान्यतः सुरवातीला जास्तीत जास्त लोक अपयशी होतात. त्यामधले तज्ञांची मदत घेतात ते कसे तरी किनारा गाठतात आणि हाच अनुभव त्यांना उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार बनवतो, बाकी बुडून जातात, म्हणजे परत आपल्या नोकरीच्या जुन्या मार्गाला लागतात, किंवा कमी धोके आहेत ते काम करतात.
जास्तीत जास्त उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणुकदार ह्यांना तुम्ही यशाचे रहस्य विचारले कि ते सगळीकडे पुस्तकात किंवा भाषणात एकसारखे रट्टा मारलेले मुद्दे सांगत बसत नाहि, ते एकच म्हणतील कि मला माहित नाही, मला हे काम करण्यात मजा येत होती, मला असे काही विशेष करावे लागले नाही, मला वाटले आणि मी करत गेलो आणि आज इथपर्यंत पोहचलो. जो अंतर्मनापासून काम करतो तो कधीच त्याला स्वतःला व्यक्त करू शकत नाही आणि तो खोटेही बोलू शकत नाही कारण त्याचे आयुष्य आणि तो करत असलेला उद्योग व्यवसाय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचा आवाज आणि त्याची देहबोली हे सर्वकाही बोलून जाते. मनुष्याच्या आयुष्याला आणि त्याच्या अंतर्मनाला कोणीच कागदावर उतरवू शकत नाही.
एक एक पाउल टाकायला सुरवात करा. पर्वताच्या शिखरावर पोहचल्यावरच तुम्हाला समजेल कि ते शिखर आहे ना कि पायथ्याशी बसून किंवा अर्धवट सोडून. एव्हरेस्ट चढणे हे खूप सोपे आहे पण त्यासाठी मनाला तयार करणे हे खूपच कठीण आहे, मानसिक क्षमतेची तर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत चाचणी सुरु असते आणि जो हि चाचणी पार करतो तोच शिखर गाठतो.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार