उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक, पैसा आणि आयुष्य समज गैरसमजउद्योग, व्यवसाय, गुंतवणूक आणि पैसा ह्याला आपन मनुष्य प्राण्याचे आर्थिक आयुष्य असे ह्या लेखामध्ये समजू. मनुष्याच्या आयुष्यातील भाग म्हणजे खाजगी, व्यवसायिक आणि सामाजिक हे आहेत, ह्यामधील आर्थिक आयुष्य हा एक भाग आहे.
मनुष्य प्राण्याच्या मुलभूत गरजा कुठल्या?
१) मानसिक नैसर्गिक गरजा
२) शारीरिक नैसर्गिक गरजा
इतके सोपे आहे. आता पुढे जाऊ. मनुष्य प्राण्याचा इतिहास जर तपासला तर तो जस जसा काळ पुढे जात राहिला तस तसा मनुष्य प्राणी हा निसर्गापासून लांब जात राहिला. आता तर इतका लांब गेला कि तो स्वतःला निसर्गापेक्षा स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागला.
निसर्ग जे पण देतो ते अमर्याद देतो पण त्यालाही मनुष्याने मर्यादित करून कृत्रिम निर्मितीवर भर देवू लागला. प्राणी फक्त दुष्काळ पडला कि मरायचे पण इथे सर्व मुबलक प्रमाणात असूनही मनुष्य प्राणी मरत आहे, का तर ते विकत घेण्यासाठी पैसा नाही. आणि हे दुष्काळ नसेल तेव्हाही घडत आहे.
आताही बघा जर कोठेही पक्षी किंवा प्राणी मेला तर इतर पक्षी प्राणी एक तर तिथे जवळ येवून आपल्या भावना व्यक्त करतात आणि लांब असेल तर आवाज काढून, इतक्या दूर पर्यंत ते जाणीवेच्या माध्यमातून एकमेकांशी जुळलेले असतात.
पण मनुष्य प्राणी हा जानिवेपासून खूप लांब गेला आहे. कसे ते तुम्हाला सांगायची गरज नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या इतर प्राण्यांमध्ये कुठेही कसला भेद नाही पण मनुष्य प्राण्यामध्ये अनेक प्रकारचे भेदभाव भरलेले आहेत.
आता मुद्द्यावर येतो, पैसा मानवी आयुष्यातील एक अविभाज्य घटक सध्याच्या काळामध्ये मध्ये आहे. तो अप्रत्यक्ष रित्या नैसर्गिक महत्वाचा गुणधर्म जगण्याशी निगडीत आहे.
जेव्हा जीवावर येते तेव्हा बिरबल ची कथा माकडीण आणि तिचे पिल्लू हे आठवले असेल, आणि हा जीव वाचवायचा गुणधर्म महत्वाचाच आहे नाहीतर तुम्ही संपून जाल.
आपण तीन मुलभूत गरजांबद्दल बोलू
१) अन्न
सर्वात महत्वाचे अगोदर मनुष्य अन्नासाठी शिकार करायचा आणि जंगलातून गोळा करायचा. आता हे बंद झाले आहे. आता तुम्हाला अन्न हे विकतच घ्यावे लागेल आणि तेही पैसे देवून. जर पैसे न देता घेतले तर त्याला चोरी समजली जाईल. ह्यासाठी तुम्हाला शिक्षाही होऊ शकते.
२) वस्त्र
नैसर्गिक ऋतू मधील बदलांनुसार त्याला शरीर गरम, सुके किंवा थंड ठेवायला वस्त्रांची गरज भासते. इतर प्राण्यांमध्ये त्यांच्या शरीरा मध्येच तशी संरचना करून ठेवली आहे पण मनुष्य जस जसा घडत गेला तेव्हा त्याच्या शरीरामधील हि संरचना बदलत गेली आता त्याला तशी तरतूद करावी लागते.
वस्त्र सुद्धा तुम्हाला दुकानातूनच पैसे देवून विकत घ्यावे लागतात. इथेही पैसा आला.
३) निवारा
सर्व प्राण्यांना सुरक्षित झोपता यावे व बदलणाऱ्या ऋतू पासून, हिंस्त्र पशू पासून आपले व आपल्या लहान मुला बाळांचे संरक्षण व्हावे ह्यासाठी निवार्याची सक्त गरज आहे. आताच्या काळात निवाराही विकत घ्यावा लागतो आणि ह्यासाठी पैसा लागतो.
मानसिक आणि शारीरिक गरजा ह्या प्रत्येकानुसार वेग वेगळे किंवा कमी जास्त प्रमाणात गरजेचे असतात. उदाहरणार्थ एखाद्याला ४ तासाची गाढ झोपही पुरेसी असते तर एखाद्याला ८ तासाची. हे दोघेही यशाच्या बाबतीत एकमेकांना पूरक असतात. ह्या मध्ये खाणे पिणे, वागणे बोलणे, राहणीमान आणि अति खाजगी आयुष्य हि आलेच.
बाकी अंबानी टाटा बनायचे सोडून द्या ह्या मुलभूत गरजांसाठी आपल्याकडे पैसे असणे किंवा ती गरज पूर्ण करण्याइतपत तरी पैसे कमावता आले पाहिजे. श्रद्धा करण्यासाठीही पैसा लागतोच, म्हणून आस्तीकांची देवस्थान हे समृद्ध असतात आणि नास्तीकांची प्रयोगशाळा हि समृद्ध लोक उभी करून देतात किंवा ते नवीन संशोधन करून पैसे उभे करतात.
आत्मज्ञान आणि श्रद्धा हि फक्त सर्वांगीण समृद्ध असलेल्या मनुष्याकडेच जाते. ते मन मेंदूने स्थिर असतात, प्रचंड आशावादी आणि सकारात्मक असतात. त्यांना आयुष्याच्या प्रत्येक भागात भरभरून भेटतच जाते.
*तुम्ही मर्यादित आयुष्य जगत आहात कि अमर्यादित?
*तुम्ही जे आयुष्य जगत आहात त्यामध्ये समाधानी आहात का?
जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य रित्या आयुष्य जगत आहात, आणि जर नाही असेल तर तुम्हाला आत्मविकासाची सक्त गरज आहे.
आयुष्याच्या कुठल्याही भागात जर समस्या असतील तर "nirvana.self.development@gmail.com" ह्या इमेल आयडी वर मैल कराल. समस्या जितकी नवीन तितके निदान लवकर होईल आणि जितकी जुनी तितका वेळ ती समस्या समूळ नष्ट करण्यासाठी लागेल.
सर्वकाही शक्य आहे.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
*समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार