नैतृत्व गर्दीमधून कधीच तयार होत नाही. नैतृत्व एकट्या मध्ये सतत च्या मानसिक आणि शारीरिक सरावाने, तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, गाजावाजा न करता सतत घडत असते. ते स्वतः वर प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक क्षण इतकी मेहनत घेतात कि त्याच्या दुसर्याच क्षणी ते त्यांचे ध्येय प्राप्त करतात.
काही जन्मजात असतात आणि काही घडवलेले असतात, ह्यामध्ये साम्य एकच त्यांच्या ध्येय आणि स्वप्नांशी एकनिष्ठता. लीडर म्हणजे कोण, जो स्वतः चे ध्येय आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचेच नैतृत्व करतो त्याला लीडर म्हणतात. लीडर कधीच जगाला घडवत नाही, ते स्वतः घडतात आणि ते बघून जग घडत जाते. तो नेहमीच एकटा चालतो नाहीतर ५ ७ समविचारी आणि धाडसी लोक त्याच्यासोबत असतात आणि जेव्हा यश भेटत जाते त्यानंतर समूह च्या समूह त्याला जुळत जातो.
एकट्यात निर्माण झालेले नैतृत्व वर्तमानात काम करतो आणि भविष्य घडवतो. समुहात निर्माण झालेले नैतृत्व हे भूतकाळात रममाण असते, तो वर्तमान हा दुषित करतो आणि भविष्य अंधारात ठेवतो. जर तुमचे वर्तमान सुखकर आहे आणि भविष्य उज्वल तर तुमच्यामध्ये नैतृत्व करण्याची क्षमता आहे किंवा तुम्ही योग्य नैतृत्व च्या पाठी जात आहात, आणि नाही तर तुम्हाला तुमचे नैतृत्व बदलावे लागेल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार