महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांपेक्षा मुंबई मध्ये मराठी पाठोपाठ गुजराती लोकसंख्या जास्त का आहे?

कारण ते कोळी समाजापाठोपाठ गुजराती आणि पारसी हे समाज वसले गेले होते. गुजराती समाज हा धाडसी आणि उद्योग, व्यवसाय करणारा समाज म्हणून शतकानुशतके ओळखला जात आहे. जेव्हा इस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय हे सुरत वरून मुंबई ला हलवल्यावर अनेक गुजराती आणि पारसी उद्योजक आणि व्यवसायिक हे संधीच्या शोधात मुंबई ला स्थलांतरीत झाले.
जुने नाम बॉम्बे आणि आताचे मुंबई हे त्या काळापासून ते आतापर्यंत आर्थिक उलाढालीचे, उद्योग, व्यवसायिक शहर म्हणून ओळखले जाते. आणि गुजराती हे जिथे संधी आणि आर्थिक नफा हा जास्त असतो तिथे स्थलांतरीत होत असतात, भारताच्या विभाजनाअगोदर ते कराचीला सुद्धा स्थायिक झाले होते. गुजरात्यांची मोठी लोकसंख्या हि मुंबई मध्ये उच्चभ्रू वस्तीत राहते.
एनडीटीव्ही ह्या वृत्त वाहिनीच्या वेबसाईटवर २०१५ साली लिहिलेला लेख सापडला, त्यामध्ये मराठी लेखक मधु मंगेश कर्णिक हे म्हणतात कि “मराठी माणसांची लोकसंख्या हि मुंबई मध्ये झपाट्याने कमी होत चालली आहे. १९६० साली मराठी समाजाची लोकसंख्या हि ५२ टक्के होती ती आता २२ टक्क्यांपर्यंत कमी होत आली आहे. मराठी माध्यमांच्या शाळादेखील बंद होत चालल्या आहेत, जर असेच सुरु राहिल्यास येत्या २० वर्षात फक्त ५ टक्के मराठी बोलणारी लोक उरतील मुंबई मध्ये.”
इतिहास आणि आजची परिस्थिती ह्यावर मी प्रकाश टाकायचा प्रयत्न करत आहे. इतर समाजाला नावे ठेवून काही फायदा नाही, चुकत कुठे असू तर फक्त आणि फक्त आपणच. खरच आपण जिथे संधी आहे तिथे स्थायिक होतो का? आपल्या समाजाला आर्थिक विकासाचा इतिहास आहे का? आपल्या पिढ्या ह्या काय करत होत्या?
ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मुक्त मनाने शोधायची आहेत. जिथे पिढ्या ह्या उद्योग व्यवसायात असतात तिथे थोडे तरी कमी पडले जाणार आहोत, पण जर प्रयत्न केला तर नक्कीच तिसऱ्या पिढीनंतर समाजाचे चित्र हे बदलले दिसेल. त्यावेळेस मराठी हा एकमेकांना मदत करताना दिसेल.
म्हणून मी प्रत्येक लेख किंवा माझ्या विचारात सतत मानसिकता आणि संस्कार हे शब्द वापरत असतो त्याचे उत्तर हे तुम्हाला आता भेटले असेल. नोकरी करणार्यांच्या मानसिकतेमुळे दृष्टीकोन हाही तसाच होवून जातो, मग सगळीकडे त्याला फक्त आणि फक्त नोकर्याच दिसू लागतात, पण जर उद्योग, व्यवसाय किंवा आर्थिक विकासाची मानसिकता ठेवली कि फक्त आणि फक्त श्रीमंती आणि समृद्धीच दिसून येते.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार