घर हि मनुष्य प्राण्याची मुलभूत गरज आहे ना कि बँकांना व्याजाच्या स्वरुपात नफा मिळवून द्यायची


जर तुम्ही घर, किंवा इतर स्थावर मालमत्ता जर गुंतवणूक म्हणून घेत किंवा सर्व गुंतणूक झाल्यावर जो जास्तचा पैसा उरतो तो तुम्ही घरामध्ये टाकत आहात तर त्याला माझा विरोध नाही पण जर घर तुम्ही आताच्या परिस्थितीनुसार राहण्यासाठी कर्ज काढून घेत असाल मग तर तुम्ही बँक आणि जिथे काम करत आहात त्या कंपनीचे २० किंवा त्या पेक्षा जास्त वर्ष तुम्ही गुलाम बनून जातात. आणि हि तुम्ही निर्माण केलेली परिस्थिती म्हणजे ह्या आधुनिक जगापासून दूर आदिवासी राहत आहात त्या पातळीपर्यंत तुमची आर्थिक निरक्षरता गेलेली आहे.
गुंतवणूक बाबतीत मार्गदर्शन करतानाही भविष्याची स्वप्ने दाखवली जातात, पण एक लक्ष्यात ठेवा “भविष्य कोणीही बघितले नाही आहे. पुढच्या क्षणी काय होईल हे हि आपण नाही सांगू शकत तर मग पुढील १० वर्षात काय होईल हे कसे सांगू शकू?”. सहसा मानसिक दृष्ट्या कमजोर आणि भित्रा मनुष्य हा भूतकाळ आणि भविष्य काळात रममाण असतो, जो धाडसी असतो तो ह्या वर्तमानात आयुष्य जगत असतो. म्हजे जिथे तुम्ही स्वप्न बघत असत कि भविष्यात माझ्या कडे हे हे ते ते असेल तिथे धाडसी मनुष्य मग तो स्त्री असो किंवा पुरुष ते प्रत्यक्षात जगत असतो, अनुभवत असतो.
चला मान्य केले कि बँक कर्ज देते. पण इतके वर्ष ते फेडण्यासाठी? इतके व्याज? म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा ह्या नैसर्गिक मुलभूत गरजांपैकी निवारा घ्यायची वेळ आली तर तुम्ही मनुष्याला कर्जाच्या तुरुंगात व्याजाच्या बेड्या घालून गुलाम बनवणार? आणि समजा तो मनुष्य मेला तर त्याच्या मुलांना सोडतात का? तर नाही हे उत्तर आहे.
भांडवलशाही आणि सत्ताधारी ह्यांना भावना नसते, ते फक्त भावनेचा वापर करून घेतात. इथे फक्त नफा महत्वाचा आहे आणि जास्तीत जास्त अडकला जातो तो इमानदार आणि सरळ मार्गाने चालणारा मनुष्य. त्याचे मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे खच्ची करण झालेले असते. १०० टक्के इमानदार हा कोणीच नसतो, आणि शक्यही नाही, कधी ना कधी, कुठे न कुठे लाच द्यावीच लागते.
बँकेचा स्वतःचा काही पैसा जेव्हा पहिली बँक चालू झाली तेव्हा हि नव्हता, बँक संपूर्ण पणे कुठल्याही देशाच्या सरकार सारखी चालते, लोकांच्या पैश्यांवर. मनुष्य प्राण्याला गुलाम करून ठेवणारी व्यवस्था म्हणजे धर्म, राजसत्ता, सरकार शासन आणि चौथी बँक. ह्या चारही व्यवस्थेमध्ये श्रीमंतांचे पालन पोषण आहे तर गरीब मध्यमवर्गाचे शोषण. इतिहास ते काळ परवापर्यंत तुम्हाला पुरावे सापडून येतील. इतिहासात पुरावे शोधण्यापेक्षा आता वर्तमानातील पुरावे शोधा, ते तुम्हाला जास्त सांगू शकतील.
ज्या सामान्य लोकांना बँकिंग क्षेत्रातील तकनिकी बाबी, मुद्दे माहित नसतात त्यांना ते सांगून का बँकेचे महत्व पटवून देतात? परिपूर्ण कुठचीच व्यवस्था नसते तर का बँकेचे गुणगान केले जाते? इकोनोमी वर बीए एमए झालेला पण तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतो, ह्यासाठी काय पीएचडी किंवा डॉक्टरेट झालेल्याची गरज नाही आहे. ह्या लोकांनी अगोदरच उच्च पद भूषवली आहे आणि त्याचे परिणाम हे आता दिसून येत आहेत.
बँकेला तोडीस तोड अजून २ ४ प्रणाली किंवा व्यवस्था पाहिजे. पण इथेही असे होते कि जिथे भांडवलशाही म्हणजे श्रीमंत आणि सत्ताधार्यांचा पैसा आणि फायदा गुंतलेला असतो ते अश्या प्रणाली मोडून काढतात. त्यासाठी विवीध तज्ञांची मदत घेतली जाते.
तुम्ही जेव्हा निवृत्त होता, जेव्हा तुम्ही बँकेकडून कर्ज घेत त्याचे हफ्ते फेडलेले असतात ते सर्व विसरून बांका तुम्हाला म्हतारपणी कर्ज देत नाही. अश्या स्वार्थी दुनियेत आपण राहत आहोत. जोपर्यंत तुम्ही पैसे कमवत आहे तोपर्यंत तुम्हाला इज्जत आहे आणि जेव्हा नाही कमवत वरून वयही होते तेव्हा तुम्हाला इज्जत राहत नाही. त्यांचे वागणे आणि बोलणेही बदलून जाते.
आर्थीक दृष्ट्या साक्षर व्हा. जंगलात राहताना परिस्थितीनुसार वागा. उगाचच कुणाचा फायदा करून देवू नका. कर्ज नावाचे विविध प्रकारचे हिंसक प्राणी हे तुमच्या आयुष्याचा मोठा भाग खायला बसले आहेत. जर मुलभूत गरजेवर ते त्यांच्या व्यवसायाचा डोलारा उभारतात तर आता बोलायला काही उरले नाही.
मी माझाच लेख हा अनेक तकनिकी कारणे देवून खोडूनही काढू शकतो आणि समर्थनहि करू शकतो, ह्याला महत्व नाही आहे, तुम्ही शेवटचा परिणाम तुमच्यावर कसा होतो ते बघा, तो तुमच्या आयुष्यावर झालेला परिणाम हा काही तुमच्याशी खोटे बोलू शकणार नाही. स्वतःवर जास्त प्रयोग करू नका, पुढचा ठेच आणि मागचा शहाणा ह्या म्हणीप्रमाणे वागा.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार