नव उद्योजक, व्यवसायिक, अपयश, तणाव आणि आत्महत्या


हजारो तरून तरुणी नव उद्योजक, व्यवसायिक टाटा, अंबानी बनायचे स्वप्न घेवून उद्योग व्यवसायात उतरतात, पण सगळ्यांचेच स्वप्न काही पूर्ण होत नाहीत. आणि जेव्हा त्यांची स्वप्ने पूर्ण होत नाही, जेव्हा त्यांचा अपयशाशी सामना होतो तेव्हा त्यांचे आयुष्य हे खूप दुख दायी आणि तणावपूर्ण होवून जाते.
हि घटना आहे एप्रिल २०१६ ची. एका अश्याच नव उद्योजकाची, त्याचे नाव आहे लकी अग्रवाल, वय फक्त ३३ वर्षे. लकी हा टेकी (ज्याला कंप्यूटर आणि टेक्नोलोजीची आवड असते तो) होता. त्याने त्याची जेव्हा सोशल नेटवर्किंग वेबसाईट २ वर्षे अथक परिश्रम करूनही अपयशी ठरली तेव्हा त्याने आत्महत्या केली. आत्महत्या हि नायट्रोजन गॅस चे सिलेंडर घेवून मास्क द्वारे त्याने नायट्रोजन वायू आपल्या शरीरात घेवून आत्महत्या केली.
लकीने आपले इंजिनीरिंग हैद्राबाद मधून केले. त्याने २०१४ साली “KQingdom” नावाचे सोशल नेटवर्किंग एप सुरु केले होते. ह्या एका एप मध्ये तुम्ही चॅट आणि फोटो ब्लोग करू शकत होता, ह्यासोबत तुम्हाला बक्षीस म्हणून गुणही भेटणार होते. हे वैशिष्ट्य फेसबुक आणि बाकीच्या वेबसाईट आणि एप मध्ये नव्हते.
बाकीच्या सोशल नेट्वर्किंग साईट आणि एप आपल्या प्रमोटर्स न जास्त नफा मिळवून देत होती तिथे “KQingdom” युजर्सना प्रत्यक्ष नफा देणार होती. लकी आपल्या पालकांना दररोज सांगायचा कि त्याचे एप हे व्हास्टएप पेक्षा जास्त प्रसिद्ध आणि यशस्वी होणार आहे, त्याचे मित्र हि त्याच्या ह्या बोलण्याला प्रतिसाद द्यायचे. त्याचे हे एप आणि स्वप्न अपयशी झाल्यामुळे लकी हा आत्महत्या करण्यापूर्वी तणावात गेला होता, आणि योग्य मार्गदर्शन न झाल्यामुळे शेवटी त्याने आत्महत्या केली.
भारतातील नव उद्योजक व्यवसायीकांमध्ये इतक्या टोकाचे पाउल उचलण्याचे कारण म्हणजे “अपयशाची भीती”, ह्यामुळे नव उद्योजक आणि व्यवसायिकांच्या कथा उदयास येत नाही.
नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ च्या नुसार डिप्रेशन, उदासीनता ह्याची अनेक लक्षणे आहेत, जसे कि लक्ष्य केंद्रित न होणे, स्मरणशक्ती कमजोर होणे, निर्णय घेता न येणे, थकवा आणि उर्जेची कमतरता, अपराधीपणाची भावना, स्वतःला लायक न समजणे, असहाय वाटणे, निराशावादी आणि नकारात्मक विचार, भावना निर्माण होणे, निद्रानाश, एकदम सकाळी जाग येणे, आळशीपणा, जास्त वेळ झोपणे, आत्महत्येचे विचार येणे, आत्महत्येचे प्रयत्न करून होणे आणि इतर बरेच.
जेव्हा तुमच्या आयुष्यात डिप्रेशन उदासीनतेला चालना मिळते तेव्हा तुमची उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक कोसळायला सुरवात होते किंवा कोसळलेली असते. तुम्ही कर्जात बुडता, घरचे आणि बाहेरचे नातेसंबंध बिघडतात, आयुष्य पूर्ण अंधकारमय वाटते, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला असे वाटते कि कोणीच तुमच्या समस्या ह्या समजून घेवू शकत नाही म्हणून त्या समस्या ह्या कुणालाही सांगत नाही.
तुम्ही नवउद्योजक असाल आणि जर तुमचे मित्र परिवार हे नोकरदार असतील असतील तर ते तुमची समस्या हे कधीच समजू शकत नाही. तुमच्या जीवनशैली बद्दल तुमच्या नोकरी करणाऱ्या मित्रांना थोडाही अंदाज नसेल. अपयशाला तुम्ही स्वतःलाच जबाबदार धरत असता, तुम्हाला सतत तुमच्या जुन्या साहेबांनी दिलेली नोकरीची ऑफर आठवायला लागते, ज्यामध्ये तुम्ही निवृत्त होईपर्यंत आरामत काम करू शकणार होते.
तुम्हाला स्वतःचीच लाज वाटायला लागते, तुम्ही सतत विचार करता कि तुमचे अपयशी असण्याचे कारण हे तुम्ही स्वतःला कमजोर समजायची भावना हि होय, आणि हीच अपयशाची भावना हि तुम्ही सपशेल अपयशी आहात असे समजता म्हणून येते.
जेव्हा तुम्ही डिप्रेशन किंवा उदासीनता ह्यामधून बाहेर पडता तेव्हा हे सगळे तुमचे वागणे हे मूर्खपणाचे वाटते. खालील ६ मार्ग जर एखाद्याला डिप्रेशन मधून बाहेर काढू शकतात तर तुम्हालाही बाहेर काढू शकतात.
६ मार्ग खालीलप्रमाणे :
१) मित्रांमध्ये उठणे बसने करा :
महत्वाचा सागायचे झाल्यास जे समविचारी असतात त्यांच्यासोबत मैत्री करा, त्यांच्यासोबत वेळ घालवा, ह्या मध्ये तेही मित्र जमा करू शकतात जे तुम्हाला वेळेवर कमी येतील किंवा तुम्हाला प्रोस्ताहित करतील. जर असे नसतील तर ज्या मित्रांमध्ये उठणे बसने करत आहात त्यांच्यासोबत सामान्य गोष्टीवर चर्चा कराल, जेणे करून नकारात्मक चर्चा होणार नाही.
२) तज्ञांची मदत घ्या :
जेव्हा तुम्हाला घरचे किंवा मित्रांसोबतहि आपले मन मोकळे करावेसे वाटत नसेल तेव्हा मानसोपचार तज्ञांची, आत्मविकास प्रशिक्षकांची मदत घ्या. हे एखाद्या चमत्कारासारखे आयुशाय्त काम करते. तुम्ही डिप्रेशन च्या भावना वाटल्यामुळे त्याचे ओझे कमी झाल्यासारखे वाटते त्यामुळे तुम्हाला खूप हलके वाटते. जे त्रास तुम्हाला घरच्या लोकांसमोर, मित्रांसमोर सांगायचे धाडस होत नव्हते ते सगळे तुम्ही मानसोपचार आणि आत्मविकास तज्ञांना सांगून टाकल्यामुळे तुम्हाला हलके झाल्यासारखे वाटते. काही शारीरिक घडामोळी जसे हार्मोन डीस बेलेन्स मुळे जे त्रास होतात ते तुम्ही विना तज्ञांच्या मार्गदर्शनाने प्रशिक्षणाने बरे करू शकत नाहीत. (कृपया तज्ञांचे जसे टीव्ही आणि सिनेमा मध्ये चकाचक ऑफिस दाखवतात तसे वास्तव मध्ये नसते हि बाब नमूद करावी.
३) आपल्या आयुष्याचा आराखडा मुद्दाम बदलत रहा, दुरुस्त करत राहा :
तज्ञ जे काही दिवसभरातील काम किंवा कृती करायचे वेळापत्रक देतात त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. अगदी लहान सहान बदल सुद्धा चमत्कार घडवतात, जसे कि सकाळी एकाच वेळेला नाश्ता करणे, दुपारचे आणि रात्रीचे जेवण करणे, आणि एकदा का तुम्ही हे अंगवळणी पडले कि ते अजून काय काय करायचे ते वाढवत जातात आणि कठीण करत जातात. जसे कि आता त्यामध्ये थोडा वेळ हा वाचनासाठी देणे, आपल्या छंदासाठी देणे, घरच्यांसोबत वेळ घालवणे, गाणी ऐकणे आणि दररोज प्रार्थना किंवा मंत्रा बोलणे असे वाढवत जातात (प्रार्थना किंवा मंत्रा म्हणजे माझ्या भाषेत शब्दांचा समूह, हा तुम्ही तुमच्या प्रमाणे बनवून घेतलेला बरा). आयुष्यात बदल घडवून आण्यासाठी काही एकदम मोठे बदल करायची गरज नाही, हे लहान सहान बदल आयुष्यात मोठ मोठे बदल घडवून आणतात.
४) जास्तीत जास्त सकारात्मक आणि प्रोस्ताहन देणारे वाचन करा, सिरीयल, सिनेमे, डोक्युमेंट्री बघा, ऐका आणि त्यांचा आनंद घ्या :
हे खूप महत्वाचे आहे. कारण तुम्ही फक्त हसत नाही तर जे काही तुमच्या जीवनात बदल करायचे आहे ते वेळापत्रक सुद्धा तुम्ही आनंदाने पळत जाता व बदल करत जाता. ह्यामुळे तुमचे मनही शांत आणि तुमच्या ताब्यात राहते. ह्यामुळे’ तुमच्या जीवनात अमुलाग्र बदल घडून येतात.
५) व्यसनांपासून दूर रहा :
व्यसन म्हणेज एखादी गोष्ट किंवा कृती तुम्ही त्याच वेळेस दररोज न चुकता करता त्याला म्हणतात. म्हणजे ती गोष्ट किवान कृती तुम्हाला लागतेच, त्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही. व्यसन मग कसलेही असो, सकारात्मक किंवा नकारात्मक हे घातकच आहे. तुम्ही जग नाही बदलू शकत, तुम्ही स्वतः बदलता, मग नकारात्मक परिस्थितीकडे व्यक्तीकडे हुशारीने तुमच्या वर फरक न पाडता हाताळता.
६) उज्वल भविष्याकडे बघा
तुमचा उज्वल भविष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा तुम्हाला आजच्या मर्यादा तोडायला मदत करतो आणि उज्वल भविष्य वर्तमानात जगवतो. प्रत्येक क्षणी तुम्ही सकारात्मक विचार करत आताची वेळ निभावून नेत शिकत अनुभव घेत जुने दिवस घालवून नवीन उज्वल दिवस तुमच्या आयुष्यात घेवून येतात.
शेवटचे सांगायचे झाल्यास डिप्रेशन तणाव हे तुमचे नोकरी, व्यवसाय आणि तुमची क्षमता बघून नाही येत. हि सामान्य परिस्थिती आहे, ह्यामुळे तुम्हाला आत्महत्या करण्याअगोदर बाहेर निघायचे आहे ह्याची जाणीव होते. डिप्रेशन असले तरी तुम्ही सामान्य स्त्री आणि पुरुषच राहणार आहे, सगळ्यांच्या आयुष्यात हि स्टेज येवून गेली आहे.
डिप्रेशन म्हणजे रात्री नंतर दिवस उजाडणे हे होय. ह्या मुळे तुम्ही अधिक नव्या दृष्टीकोनातून आयुष्यात अमर्याद भरारी घ्यायला लागतात. तुमचा उद्योजक आणि व्यवसायिकां कडे बघ्नायचा दृष्टीकोन हा अधिक संवेदनशील होतो, त्यांना तुम्ही एक सामान्य मनुष्याप्रमाणे बघतात. आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःला यश, अपयश, उद्योग, व्यवसाय आणि नोकरी ह्यापासून स्वतःला वेगळे करतात. तुम्ही स्वतःला ह्या बाकीच्या तार्किक आयुष्यापेक्षा जस्त महत्व देता. कारण तुम्ही आहे म्हणून हा तुमचा आयुष्याचा डोलारा आहे.
एकदा का तुम्ही हा अनुभव घेतला कि भविष्यात तुम्ही आरामत सामना करू शकता आणि मोठ मोठी आव्हाहने हि पार पडू शकता आणि अपयश आले तरी ते फार काल टिकत नाही. तुमचे खाजगी आयुष्य हे संपूर्ण पणे तुमच्या ताब्यात येते, यशाची नव नवीन शिखरे तुम्ही पार करू लागता, नव नवीन उद्योग, व्यवसाय सुरु करू लागता आणि गुंतवणुकीत नवीन भरारी घेत जाता.
तुमच्या उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीपेक्षा तुमचे मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत असणे आणि सगळ्यात महत्वाचे जिवंत असणे महत्वाचे आहे. तुम्ही आहात म्हणून जग आहे
जर तुम्ही ह्या परिस्थितीमधून जात असाल तर आजच संपर्क कराल. हि परिस्थिती उंच भरारी आणि नवीन दृष्टीकोनातून आयुष्य जगायची असते.
अपयशाची लाज वाटायचे काहीही कारण नाही आहे. आपण मानसिक समस्येने ग्रस्त आहोत हेही सागायला लाज वाटायचे काही कारण नाही आहे. जर तुम्ही अश्या परिस्थितींना तोंड देवून बाहेर निघाला असाल तर आपली स्टोरी मला मेसेज कराल, ती मी ह्या पेज वर पोस्ट करेन.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार