उद्योजक, व्यवसायिक आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत ह्या प्रशिक्षणासाठी जे उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार येवून गेले त्यामधील काही अपयशी झालेल्या लोकांचा अनुभव असा होता कि “आम्ही खूप कमी वेळेत यशस्वी झालो पण परत आम्ही यशस्वी होवूच शकलो नाही, कसे तरी आम्ही दिवस ढकलत आहोत.”
हे ऐकणे जरी सोपे असले तरी त्यांनी अनुभवलेले किंवा अनुभवत असलेले आयुष्य हे खरच खडतर आहे. आपले आयुष्य म्हणजे काय सिनेमा नाही कि इथे खोटे सुख दुख, जन्म मृत्यू, यश अपयश येते. इथे आकडा अनुभव आला कि काही वर्षे त्याची चटके सहन करावेच लागतात.
इथे जे यशस्वी झाले ते हे विसरले कि यश म्हणजे काही ध्येय नाही आहे, तो प्रवास आहे, ते ध्येयाला प्रवास संपला असे समजून चुकले आणि अपयशाच्या परतीला लागले. आणि ज्यांना यशाला प्रवास समजला त्यांनी यशाची नवनवीन शिखरे पदक्रांत केली.
इथे भावना खूप महत्वाच्या आहेत ज्या आपल्या विचारांना दिशा देतात आणि विचार कृती करवतात. जेव्हा तुम्ही ध्येय ठरवल्या बरोबर लगेच कमी कालावधीत साध्य केले तर तुमच्या मध्ये गर्वाची भावना वाढण्याची शक्यता हि ९९ टक्के असते, उरलेला १ टक्का हा वर्ग सतत, जन्मजात किंवा सतत च्या प्रयत्नाने आपल्या भावना ताब्यात ठेवतात त्यामुळे ते त्यांनी साध्य केलेले ध्येय टिकवून ठेवतात आणि नव नवीन ध्येय साध्यही करतात.
आयुष्य हे असेच असते. इथे पहिला निकाल दिला जातो त्यानंतर मनुष्य शिकतो. पण जो आत्मविकासाला महत्व देतो तो सततच्या अंतरमनाच्या निकालाने शिकत जात वास्तवात परीक्षा पास होत जातो. पुढचा ठेच मागचा शहाणा हि म्हण तर प्रत्येकला लागू होतेच पण ह्यासाठीही मन मेंदूने स्थिर असावे लागते.
हाच नियम तुमच्या खाजगी आयुष्यालाही लागू होतो. नियम सगळ्यांना एकसारखाच लागू होतो. ह्यामध्ये अनुभवी आणि विनानुभावी असा भेदभाव केला जात नाही.
कृती करा. तुमच्या कडे हाच क्षण आहे जगण्यासाठी. पुढच्या क्षणाला काय होईल ते सांगता येणार नाही. जगा आपल्या स्वप्नांचे आयुष्य.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार