तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या कारणांनी लोक आकर्षित केली तेच जर कारण नसेल तर ती लोक तुम्हाला सोडून जातात मग ती घरची असो किंवा बाहेरची.



जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांनी लोकांना आकर्षित केले ती लोक तेव्हा तुम्हाला सोडून जातात जेव्हा भावना ह्या दुभंगतात, अडथळे निर्माण होतात, भावनांची गरज संपते तेव्हा लोक तुम्हाला सोडून जातात.

जेव्हा तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीने लोकांना आकर्षित केलेले असते किंवा ते झालेले असतात ते तुम्हाला तेव्हा सोडून जातात जेव्हा तुम्ही कंगाल होता, कुठल्या आर्थिक संकटात सापडतात किंवा त्यांची गरज संपते तेव्हा ते तुम्हाला सोडून जातात.

जेव्हा तुम्ही तुमच्या यशाने लोकांना आकर्षित केलेले असते किंवा ते झालेले असतात ती लोक त्या वेळेस तुम्हाला सोडून जातात जेव्हा तुम्ही सपशेल अपयशी होतात किंवा त्यांची गरज संपते.

जेव्हा तुम्ही सुंदरतेने देखणेपणाने लोकांना आकर्षित केलेले असते किंवा ते झालेले असतात ती लोक त्या वेळेस तुम्हाला सोडून जातात जेव्हा तुम्ही सपशेल अपयशी होतात किंवा त्यांची गरज संपते.

तुम्ही कुठल्याही कारणांनी आकर्षित केलेले असाल किंवा ते झालेले असतील तर ती लोक त्या वेळेस तुम्हाला सोडून जातील जेव्हा त्या आकर्षित गुणांमध्ये समस्या निर्माण झालेली असेल किंवा त्यांची गरज संपली असेल.

संकटात सापडल्यावर सोडून जाणार्यांमध्ये घरच्या व्यक्तींचा देखील समावेश आहे. कुठलेही नातेसंबंध तोडायला पाठीपुढे बघत नाही.

जे गरजेपुरते आकर्षित झालेले असतात ते जर जास्त वापर न करता निघून गेले तर ठीक आहे पण जर पार तुमचा आणि तुमच्या आयुष्याचा चोथा करून टाकला असेल तर कोणीही काहीही करू शकत नाही.

ज्यांच्या आयुष्याचा लोक वापरून वापरून चोथा करतात त्यांना आयुष्यभर गुरु किंवा तज्ञ लोकांच्या सानिध्यात रहावे लागेल, जर ५० % आयुष्याचा चोथा झाला असेल तर गुरु किंवा तज्ञ ह्यांची दीक्षा घ्यावीच लागेल. कुठलाही पर्याय नाही.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक पेज :

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
Previous
Next Post »
0 आपले विचार