तुमच्या घरात नकारात्मक घटनांची शृंखला तर सुरु झाली नाही ना?अनेकदा हि नकारात्मक घटनांची शृंखला समजून येत नाही कारण आपण आपले आयुष्य जगण्यातच व्यस्त असतो. एका कुटुंबात जेव्हा त्याची आई मेली तेव्हाच हि शृंखला सुरु झाली होती पण ३ व्यक्ती गेल्यावर समजले कि नकारात्मक घटनांची शृंखला हि सूर झाली आहे. अनेकदा हि इतर नकारात्मक घटना नाही घडवत तर सरळ घरातील व्यक्तींचा जीव घेत जाते. मग कारण आत्महत्या का असेना.

एक वयामानानुसार मृत्यू झाला पण असे कुणालाच वाटले नव्हते,, चला ठीक आहे एक मृत्यू मान्य केला त्या पाठोपाठ तरून मुलगा, दोनदा योगायोग? ठीक आहे मान्य करू पण एक लहान मुलगा पण?

हे बघा जर नकारात्मक शृंखला जर आर्थिक असेल, किंवा इतर कुठलीही असेल ते मान्य आहे पण नकारात्मक शृंखला हि जीव घेत असेल तर ती नकारात्मकता हि खूपच खोलवर रुजली आहे आणि हि एकप्रकारे कौटुंबिक समस्या आहे, कुणा एकाच्या अंतर्मनाची, स्वप्नांची, कंपनाची किवा उर्जेची नाही तर संपूर्ण कुटुंब ह्यासाठी जबाबदार आहे.

आपण विविध जाळ्यांनी एकमेकांशी जुळलेलो आहोत, त्यातल्या त्यात जर जर कौटुंबिक असेल तर आपण त्या कौटुंबिक व्यक्तीला आपल्या अंतर्मनात, भावनेत, स्वप्नात, कंपनांत आणि उर्जेत स्थान देतो किंवा ते दरवाजे उघडे करतो पण सहसा बाहेरील लोकांसाठी हे असे काही करत नाही त्यामुळे बाहेरील उर्जा सहसा आपल्या आयुष्यात प्रवेश करून आपले आयुष्य उध्वस्त करत नाही.

मन मोकळेपणाने जगा पण ह्याचा अर्थ असा नाही कि बेसावध होवून जगा म्हणून. सर्वच समस्या ह्या दिसून येत नाही तर काही न दिसणाऱ्या समस्या आतमध्ये वाढत जावून शेवटी आयुष्य कायमचे उध्वस्त करतात. भले तुम्ही आज भाग्यशाली आयुष्य जगत असाल, चमत्कारिक आयुष्य जगत असाल पण जर एखादी समस्या अगदी आयुष्याच्या खोलवर रुजली असेल तर ती आनंदाने जगण्याच्या नादात आपण विसरून जातो मग शेवटी ती एकदाच आक्राळ विक्राळ स्वरूप घेवून डोके वर काढते आणि सर्व उध्वस्त करते.

जो पर्यंत आपण प्रेक्षक असतो तोपर्यंत आपल्याला अनुभव नसतो किंवा असला तरी हळहळ व्यक्त करतो पण जर जेव्हा स्वतःवर येते तेव्हा समजते कि काय तीव्रता असते ते आणि कसे हतबल असतो. सकारात्मक रहा बोलणे सोपे असते पण ज्याचे जळते त्यालाच कळते. आणि जेव्हा ह्यावर घरगुती उपचार केले जातात तेव्हा अनेकदा समस्या अजून वाढत जातात.

तुमची वर्तमान परिस्थिती तुमचे वास्तव आहे, तुम्हाला हॉस्पिटल, अपघात, न बरे होणारे आजार किंवा इतर संकटांचा अनुभव नाही किंवा तुमच्या संपर्कातील कुठल्याही व्यक्तीला अश्या समस्या आयुष्यात आल्या नसतील ह्याचा अर्थ असा नाही कि ह्या समस्या अस्तित्वात नाही म्हणून. जेव्हा तुम्हाला गरज पडते तेव्हा तुमचा एक भ्रम तुटला जातो आणि तुम्हाला दुसरे जग देखील दिसून येते जिथे दुख, संकटे आणि समस्या आहेत.

सर्वांचे अस्तित्व इथेच आहे. देव देखील इथेच आहे आणी दानव देखील. ज्याला ज्याचा अनुभव आला त्यासाठी ते वास्तव आहे आणि ज्याला नाही आला त्यासाठी नाही ह्याचा अर्थ असा नाही कि तुम्हाला अनुभव नाही म्हणून अस्तित्वच नाही. उलट तुम्ही ह्या अब्जोंच्या लोकसंख्येतील एक आहात, तुमच्या अस्तित्वाने कुणालाच काही फरक नाही पडत, प्रत्येकाला अस्तित्व असते ते प्रत्येकासाठी महत्वाचे असते.

आयुष्यात समस्या असणे वेगळे आहे समस्यांची शृंखला सुरु होणे वेगळे. समस्या एक येते, ती तात्पुरती, कायमस्वरूपी किंवा तुम्ही जो पर्यंत उपाय करत नाही तोपर्यंत राहते पण जर शृंखला असेल तर मग विचार करा कि ती किती नुकसान करू जाईल ते, आणी जर शृंखला हि सुप्त स्वरुपात असेल तर ति एकदाच म्हणजे वाढल्यावर डोके बाहेर काढते आणि सर्व संपवून टाकते.

मी दररोज अश्या समस्यांनी ग्रस्त लोकांच्या अध्यात्मिक आणि वैज्ञानिक मार्गाने मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि ह्यामध्ये यश येते देखील त्यामुळे मला वास्तवाची चांगलीच जाणीव आहे. तुम्ही देखील समस्यांची शृंखला निर्माण होण्याअगोदर तिला कायमस्वरूपी तुमच्या आयुष्यातून किंवा कुटुंबातून काढू शकता आणि जर समस्या सुप्त असेल, खोल वर रुजत जात असेल तिचे शृंखलेत रुपांतर होत असेल तर ती किंवा तश्या समस्या शोधून अगोदरच त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करू शकता.

अश्या समस्यांमध्ये कृपा करून तज्ञांची मदत घेत जा, कारण अनेकदा लोक समस्या न बरी होई पर्यंत मोठी होते तेव्हा लोक धावपळ करतात मग अश्या वेळेस खूप कमी लोकांना यश येते बाकी उरलेल्यांना फरकच पडत नाही. आहे ते वास्तव सांगत आहे. जर काही अध्यात्मिक उपाय काम करत असतील तर ते करून बघा, पण मनापासून करा, जर वैज्ञानिक मार्गांचा अवलंब करत असाल तर तो देखील करू शकता, हे सर्व शास्त्र तुमच्या भल्यासाठीच बनलेले आहे.

मी जो पर्यंत समुपदेशन करत नाही, तपासत नाही तोपर्यंत काहीही बोलू शकत नाही, कारण समस्या एक असेल आणि उपचार अस्तित्वात नसलेल्या समस्येवर होत असेल तर ती नसलेली समस्या तर निर्माण होतेच पण सोबत असलेली समस्या देखील वाढलेली असते.

एक लक्ष्यात ठेवा कि तुमची क्षमता अमर्याद आहे, तुम्ही पाहिजे ते करू शकता, हि क्षमता तपासण्यासाठी तुम्हला विनाकारण संकटात पडण्याची गरज नाही तर तुम्ही हुशार बनून सर्वकाही ठीक असताना आत्मविकास करत येणाऱ्या सर्व समस्या ह्या टाळू शकता किंवा जर त्या निर्माण झाल्या कि मग कितीही मोठी समस्या का असेना तिच्या वर अगदी आरामात मात करू शकता. निर्णय तुमचा, आयुष्य तुमचे आणि जबाबदारही तुम्हीच.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy
Previous
Next Post »
0 आपले विचार