आजारपणामुळे येणाऱ्या ताण तणावावर मात आजारपण दूर कसे करायचे किंवा त्याची तीव्रता कमी कशी करायची?आजारपणामुळे येणाऱ्या ताण तणावावर मात आजारपण दूर कसे करायचे किंवा त्याची तीव्रता कमी कशी करायची?

मी सहज वृत्तपत्रावरून नजर फिरवत होतो तेव्हा एक बातमीने माझे लक्ष्य वेधून घेतले. हेडलाईन होती "निरंजनी आखाड्याच्या महतांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली." आत्महत्या करण्याचा अंदाजा हा वर्तवण्यात आला कि ते काही दिवसांपासून उच्च रक्तदाब आणि पोटाच्या आजाराने ग्रस्त होते.

अगोदर देखील अशीच एका अध्यात्मिक जगतातील प्रसिद्ध गुरु ने आत्महत्या केली होती त्यांचे नाव आहे भय्यूजी महाराज आणि त्यानंतर हि बातमी. ह्या जगात कोणीही जन्माला येवू दे त्याला जन्मजात निसर्गनियम हे लागू होतात म्हणजे होतातच मग ती व्यक्ती कोणी का असेना.

कोणीही कितीही बोलो कि त्याचा भावनांवर ताबा आहे वगैरे पण काही नैसर्गिक गरजा असतात त्याला सहसा ताब्यात ठेवू शकत नाही, अगदी नगण्य लोक असतील नैसर्गिक भावना ताब्यात ठेवणारे कदाचित एकप्रकारे जन्मजात काही दोष असू शकतात म्हणून असे शक्य आहे किंवा दोन चेहरे वावरून व्यक्ती जगत असेल तर शक्य आहे, चार भिंतींमध्ये कोण कोण काय काय करते हे कोणीही रेकोर्ड करत नाही. प्रत्येकाला खाजगीपणा जपण्याचा हक्क आहे.

हे बघा वास्तव सांगतो जे बोलतात कि आत्महत्या करणे हा काही मार्ग नाही त्यांना एकच सांगतो कि प्रत्येकाची मानसिक क्षमता वेगवेगळी असते, स्वतःच्या मानसिक क्षमतेतून तुम्ही समोरच्याला सल्ला देवू शकत नाही, आणि ज्याचे जळते त्यालाच कळते त्यामुळे अश्या कमेंट विरांपासून लांब रहा आणि तज्ञांची मदत घ्या.

साधे लहान न बरे होणारे आजार देखील खूप मानसिक ताण देवून जातात. व्यक्ती सतत त्याच विचारात असते व त्या आजारासोबत जगत जात असते. आणि जे मोठे आजार असतात त्यामध्ये मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास हा खूप होत असतो. पैसा असो किंवा नसो इथे हे महत्वाचे नाही तर जो मानसिक त्रास होत त्यावर लक्ष्य केंद्रित निकडीचे आहे.

आत्महत्या फक्त गरीब नाही तर जो समस्येमधून जात असतो तोच करतो मग ती गरीब असो किंवा श्रीमंत, मानसिक ताण जात धर्म, पंथ प्रांत राज्य आणि देश काही मानत नाही. मानसिक ताणाची तीव्रता एकसारखीच असते.

आता तुम्हाला तुमची क्षमता दाखवून देतो. तुम्हाला माहिती आहे का कि आपले शरीर हे अब्जो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर असे बनलेले आहे? तुम्हाला माहिती आहे का कि अजून संपूर्ण जमीन आपण पालथी घातली नाही, समुद्र तर अजून बघितलाच नाही जिथे अब्जो किंवा त्यापेक्षा अगोदरपासूनचे जीव राहत असतील जे आपण बघितलेले नाही, आणि ब्रम्हांड तर सोडूनच द्या. हीच क्षमता तुमची आहे ज्यामध्ये अनेक चमत्कारिक शक्य लपलेल्या आहे ज्या तुम्हाला पाहिजे ते साध्य करून देवू शकतात, आजारपण पण अगदी नगण्य आहे.

जेव्हा तुम्ही आजारी पडाल तेव्हा जितका होईल तितका मेंदू शांत ठेवायचा, जितका तुमचा मेंदू शांत राहील तितकेच मेंदू आजार बरा करण्यासाठी प्रयत्न करेल. इथे तुम्ही मेंदू शांत ठेवल्यामुळे काय होते कि तुम्ही नकारात्मक विचार मेंदूकडे पोहचवत नाही आणि मेंदू ते विचार पुढे पोहचवत नाही जेणे करून आजरपण वाढत नाही किंवा त्याची तीव्रता जाणवत नाही ज्यामुळे तुम्ही आरामात दैनदिन जे काही काम असेल ते करू शकता.

त्यानंतर तुम्हाला ज्या काही नैसर्गिक तुमच्या गरजा आहे त्या पूर्ण करत जायच्या आहेत. तुमचा आहार एकसारखाच ठेवायचा आहे. वेळ पाळायच्या आहेत. जर जास्त काम असेल तर ते काम कमी करायचे किंवा दुसरे काम शोधायचे. तुमचे जिवंत राहणे हे काम करण्यापेक्षा महत्वाचे आहे. बंगल्यातून तुम्ही झोपडीत देखील राहू शकता जर जिंवत राहिलात तर आणि तिथून परत प्रगती करू शकता. अपयश इतकेही वाईट नाही आहे.

सकारात्मक विचारांमध्ये नकारात्मक विचारांमध्ये शक्ती जास्त असते त्यामुळे जितका तुम्ही सकारात्मक विचार कराल तितके लवकर तुम्ही बरे व्हाल किंवा आजाराची तीव्रता कमी कराल. हे सकारात्मक विचार औषधांसारखे घ्यायचे असतात आणि बाकी वेळ तुम्ही तुमच्या जीवनात पथ्य पाळून जगायचे. अगदी सोपे आहे, आज आता ह्या क्षणी तुम्ही प्रयत्न केला कि पुढील क्षणी तुम्हाला बरे वाटायला सुरवात होईल.

जरा प्रोस्ताहित करणाऱ्या पुस्तकांपासून लाबं रहा, वाचन वेगळे आणि जेव्हा जीवावर बेतते तेव्हा कृती करणे वेगळे. काही पुस्तके हि जास्त खरेदी होण्यासाठी लिहिली गेलेली आहेत जी लोकांनी विकत घेतली तरीही ते माझ्याकडे समुपदेशन, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि उपचारासाठी येतात. आणि जर पुस्तकांचा वाचून कोणी तुमच्यावर उपचार करत असेल तर कृपया स्वतःचा जीव सांभाळा, तुम्हे शरीर आणि आयुष्य काही प्रयोग करण्यासाठी नाही. माझ्या घरी देखील एक व्यक्ती आणि लाखो रुपये गमावून बसलो आहोत आम्ही. आयुष्यात पास नापास शेरा मारून गुणपत्रिका पहिली मिळते आणि नंतर शिकवले जाते.

माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे, जे तज्ञ डॉक्टर आहेत त्यांनी अनेक वर्षे प्रत्यक्ष रुग्णालयामध्ये काम केलेले असते म्हणून मी प्रत्येक लेखात बोलत असतो कि अनुभवला पर्याय नाही आणि हाच अनुभव मी लोकांना अनुभवायला सांगतो जेणेकरून त्यांना भ्रम आणि वास्तव मधील फरक कळतो आणि त्यांचे आजरपण दूर होते व आयुष्य पूर्णपणे बदलून जाते.

तुम्ही सुरवातीला घरी प्रयत्न करू शकता पण जर ३ महिन्यात बरे नसेल वाटत तर माझी मदत घेवू शकता. स्वतःच कुठेतरी मर्यादा घातलेली बरी. ८० वर्षांचे ज्येष्ठ नागरीक बघितले आहे जे विविध आजारांवर गोळ्या खात जगतात, अनेकदा हृदयाची शस्त्रक्रिया होवून जगतात आणि सर्व ताण तणावाची कामे आरामात करतात. हो हे वास्तव आहे, तुम्ही देखील कितीही मोठा न बरा होणारा आजार क असेना त्यासोबत आरामात जगू शकतात आणि तेही तुमचे ध्येय आणि स्वप्ने साध्य करून.

एकदा प्रयत्न करा. मी तुमच्या पाठीशी आहे.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy
Previous
Next Post »
0 आपले विचार