कुठल्या प्रकारची लोक श्रीमंत बनू शकतात? तुम्ही त्या प्रकारात येता का?



श्रीमंत बनायला लोकांनी किंमत मोजली, अनेक वर्षे धीर धरला, अनेक समस्यांना तोंड दिले आणि जे जगले ते आज श्रीमंत आणि समृद्ध आयुष्य जगत आहत. हि लोक काही दिवस किंवा महिन्यात पैसे दुप्पट तिप्पट च्या मागे नाही लागले तर सरासरी ६० ते १०० वर्षांच्या आयुष्यात ते किती वर्षे येतात ज्यामध्ये योग्य पैसे गुंतवले तर प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात परतावा मिळतो.

२००२ ते २००७ ह्या कालावधी मध्ये ज्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली त्या सोन्याचा भाव आता ३०,००० च्या पार आहे. २००२ ते २००७ अजून किती मोठा संधी असलेला कालावधी पाहिजे? ज्यांच्याकडे पैसे होते दूरदृष्टी होती त्यांनी तर सोन्यामध्ये गुंतवणूक केलीच पण ज्यांच्याकडे जेमतेम पैसे होते त्यांनी पोटाला चिमटा काढून गुंतवणूक केली त्यांचे बलिदान व्यर्थ नाही गेले.

० ते २ वर्षात श्रीमंत होणारे २ % पेक्षा कमी लोक असतात पण कमीत कमी ५ ते ३० वर्षात श्रीमंत होणारे ९८ % श्रीमंत लोक असतात असतात ज्यांनी हा प्रवास पूर्ण केला असतो.

हा जो अनेक वर्षांचा प्रवास असतो न श्रीमंत बनण्याचा हाच मजबूत पाया बनवतो व दीर्घ काळ श्रीमंती आणि समृद्धी चे फळे चाखायला मिळतात, एकदा का श्रीमंत झाले कि विषयच संपला, मग टिकवून ठेवणे सोपे आहे. आणि तोच टिकवून ठेवतो ज्याच्यामध्ये श्रीमंतीची हवा नसेल गेली. नाहीतर करोडपती पासून ते रोडपती होण्याची उदाहरणे देखील आहेत.

१०० पैकी ९९ क्षणिक कालावधी च्या यशापेक्षा एकच दीर्घकालीन यश गाठलेले चांगले, कारण ह्यानंतर नुसती यशाची मालिकाच सुरु होते. मग हि व्यक्ती जिथे नुसता एक इंच जरी खड्डा खोदेल तिथे तिला प्रत्येक वेळेस खजिना सापडेल.

अनेकांना वाटत असेल कि हा दीर्घ कालावधी आहे पण ह्या दीर्घ कालावधी मध्ये अनेक छोटेमोठे यश तुम्हाला भेटत जातात ज्यामुळे तुम्ही टप्प्याटप्प्याने अब्जोपती होत जातात, शिकत जातात व मानसिकता घडवत जातात जेणेकरून तुमच्या दीर्घकाळाने भेटणाऱ्या यशावर कुठलेही संकट येत नाही कारण तुम्ही अगोदरच लहान यश संपादित करण्याच्या नादात संकटांचा सामना करून त्यांना परतवले असते.

आता बोलू नका हा काळ वेगळा आणि तो काळ वेगळा म्हणून. ज्याला यशस्वी बनायचे आहे तो पुराण काळातही यशस्वी होईल, इतिहासातही, भूतकाळातहि, वर्तमानातहि आणि भविष्यातही.

असेच काही घराचे देखील होते, जमिनीचे देखील होते, विविध सरकारी आणि खाजगी कंपनी व खात्यांचे देखील होते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैसा हा कमी कालावधीत प्रचंड वाढत गेला मग तो पैसा सरळ मार्गाने कमावलेला असो किंवा गैरमार्गाने.

माझ्याकडे सतत समुपदेश, मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी १०, १५ वर्षांपासून सातत्याने काही विद्यार्थी येत असतात. हे जर लिहिले आहे त्याचे जिवंत उदाहरण मी बघितले आहे, हि कुठलीही काल्पनिक कथा नाही कारण ह्यापैकी काही आज जिवंत नाही आहे पण मृत्युपूर्वी ते श्रीमन झाले होते. त्यांनी श्रीमंतीची आयुष्य जगले.

माझ्या अनेक विद्यार्थ्यांपैकी काही असे होते ज्यांना मी बोललो होतो कि तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही, श्रीमंत होऊ शकत नाही पण माझ्या बाकीच्या लेखांचा त्यांच्यावर इतका सकारात्मक चमत्कारिक परिणाम होता कि जिद्दीने ते माझ्याकडे समुपदेशन, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घ्यायला येत होते, ऑनलाईन घेत होते. त्यांनी दाखवून दिले कि जग जरी तुमच्या बाजूने असले तरी तुम्ही कितीही मोठे यश का असेना ते गाठू शकतात.

अनुभवला पर्याय नाही. ह्यासाठी धाडस दाखवून कृती हि करावीच लागते. संकटांचा सामना करावा लागतो, किनारा सोडून खोल समुद्रात जाते लागते. हे बोलून नाही तर कृतीने होते. इथे कोणी तुमची पदवी नाही विचारत, संकटे सर्वांच्या आयुष्यात एकसारखेच येतात.

आणि एक समाधान देणारी गोष्ट म्हणजे हि क्षमता तुमच्यात जन्मजात आहे, ती तुम्हाला जागृत करायची आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि श्रीमंत बनण्याच्या दीर्घकालीन प्रवासाला सुरवात करा, मी आहे तुमच्या पाठीशी. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे भले जग तुमच्या विरोधात का असेना तुम्ही तुमची ध्येय गाठू शकता, तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक पेज : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf
Previous
Next Post »
0 आपले विचार