आर्थिक समस्यांमुळे आलेला तणाव हा जीवघेणा ठरू शकतो



आर्थिक समस्यांमुळे आलेला तणाव हा जीवघेणा ठरू शकतो. ह्यामुळे अनेक आजारपण उद्भवू शकतात. ह्यामुळे होणारे आर्थिक नुकसान हे कोणीही भरून देवू शकत नाही कारण सरळ संबंध हा स्पष्ट होवून देखील कायदे किंवा नियमांनुसार मान्य केले जाणार नाही.

पीएमसी बँक वर निर्बंध लादण्यात आले त्याचवेळेस अनेकांना मानसिक समस्या ह्या निर्माण झाल्या असतील कारण सहसा इमानदारीने पैसे कमावणारे आपला पैसा इतरत्र हलवत नाही तर ते एकाच ठिकाणी ठेवतात.

जो मेहनतीने कमावलेला पैसा आहे तो अचानक निर्बंध आल्यामुळे काढू शकत नाही आणि सहसा मध्यम वर्गांचे दिवसाचे, महिन्याचे आणि वर्षाचे गणित ठरलेले असते ते संपूर्ण बिघडते.

पैसे कमावण्याचे मार्ग वापरून झाल्यावर जेव्हा निवृत्त होतो तेव्हा कुठलाही मार्ग नसतो आणि नाही शरीरात ताकद असते अश्यांना तर पहिले मानसिक आजार जडतो आन त्यामध्ये न ऐकणारी व्यवस्था असल्यामुळे हृद्य विकाराचा झटका येवून मनुष्य मृत पावण्याची शक्यता बळावते.

व्यवस्थेमुळे येणारे आलेले आघात ह्यावर कोणीही लक्ष्य देत नाही आणि ह्याचे दूरगामी परिणाम देखील होतात. नैसर्गिक आपत्ती कोणीही स्वीकारतो पण मानवनिर्मित कृत्रिम आपत्ती नाही. भीती कायमस्वरूपी जन्म करते. व्यक्ती फोबिया ने ग्रस्त होते.

आर्थिक तणावाची तीव्रता इतकी का असते?

ऐषारामाचे जगणे सोडा पण मुलभूत गरजा जसे कि अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध उपचार ह्याला पैसा लागतो ना कि बाकी काही. उद्या तुम्ही एक पोते धान्य देतो बोलला तरी तुमच्यावर कोणीही उपचार करणार नाही. पैसे हे लागतीलच. एक महिना फक्त सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल मध्ये घालवा तुम्हाला अनुभव येईल तो देखील कायमस्वरूपी.

जे जगण्याशी निगडीत आहे ते वित्त जर अडकून पडले तर काय होणार? दररोज चा खर्च तरी निघणार कसा? पूर्ण पैसे भेटणार की नाही? काही दिवसात ज्यांचे पैसे गेले ते नाही विसरणार पण ज्यांचे नाही गेले ते विसरून जातील.

१०० पैकी अनेकांना न्याय भेटणारच नाही. ह्यामध्ये आता सध्या पैसा महत्वाचा नसून तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळणे महत्वाचे आहे. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, निरोगी आहात तो पर्यंत तुम्ही आजारी पडून डॉक्टर किंवा हॉस्पिटल मध्ये जाणारा पैसा वाचवू शकता आणि जिवंत असल्यामुळे आयुष्याची अजून जोमाने अनुभवापासून शिकून सुरवात करू शकता.

इथे खरच तुमचे चुकलेले नाही पण असे घडतच जाणार त्यासाठी तुम्हाला हुशार, जागृत होणे गरजेचे आहे. बँक बंद होते किंवा निर्बंध येणे हे काही जात धर्म बघून येत नाही तर त्यामध्ये ज्यांचे ज्यांचे खाते आहे त्या सर्वांवर येते. सर्व जाती धर्मातील सामान्य जनता त्यामध्ये भरडून जाते. कोणीही सुटत नाही.

माझा मुद्दा फक्त आणि फक्त इतकाच आहे कि कुठलेही टोकाचे पाउल उचलू नका, कुठलेही आजारपण बळकावून घेवू नका. तुमचा जीव माझ्यासाठी महत्वाचा आहे बाकी काही नाही. पैसा आज आहे उद्या नाही आणि जिवंत असला तर त्याच्यापेक्षा जास्त पैसा कमवू शकतो.

जगामध्ये कुठेही जा तुम्हाला शासन व्यवस्था अशीच काम करताना दिसेल. तुम्ही हुशार व्हा. नियम व कायदे सर्वसामान्य लोकांसाठी असतात ना कि सत्ताधारी, श्रीमंत आणि गुन्हेगारांसाठी.

जर तुम्हाला कुठल्याही आर्थिक समस्यांमुळे मानसिक ताण तणाव आले असेल, किंवा ह्या ताण तणावाचे हृदय विकार आणि इतर आजारांमध्ये रुपांतर झाले असेल तर आजच संपर्क करा. मानसिक समस्या लहान आहे तो पर्यंत आपण तिला लगेच मुळापासून काढून फेकू देवू शकतो.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH
Previous
Next Post »
0 आपले विचार