उर्जा शास्त्र वास्तू उर्जा आणि मालकाची उर्जा


अनेकदा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या घरात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला विशिष्ट प्रकारची जाणीव होते कारण वास्तू मध्ये असलेली ऊर्जा हि आपल्याला काहीतरी सांगत असते किंवा त्या व्यक्तीमुळे वास्तूमध्ये गेलेली ऊर्जा हि आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. असे फक्त घरातच नाही तर कार्यालय, दुकान, कारखाना, सार्वजनिक ठिकाणे किंवा पुरातन ठिकाणे हे बरेच काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात.

अनेकदा हि ऊर्जा वास्तू मधून व्यक्तीकडे किंवा व्यक्तीमधून वास्तू कडे जात असते. ज्याची ऊर्जा शक्तिशाली ती समोरच्याच्या ऊर्जेचा ताबा घेते व त्याचे आयुष्य आपल्यानुसार चांगले किंवा वाईट घडवत जाते.

सकारात्मक, तटस्थ आणि नकारात्मक अश्या ऊर्जा असतात.

सकारात्मक ऊर्जा हि सकारात्मक परिणाम देत जाते, तटस्थ ऊर्जा हि आहे तसे चालू ठेवते मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक. नकारात्मक ऊर्जा हि नकारात्मक परिणाम देते.

साधे तुम्ही एक प्रयोग करून बघा. काही वेळ एका सकारात्मक व्यक्ती सोबत रहा आणि काही वेळ एका नकारात्मक व्यक्तीसोबत रहा मग बघा कसा तुमच्यात बदल घडतो ते. तुम्हाला सकारात्मक व्यक्तीसोबत राहताना सकारात्मक जाणीव निर्माण होईल आणि नकारात्मक व्यक्तीसोबत राहताना नकारात्मक जाणीव निर्माण होईल. तुम्ही ऊर्जेचा अनुभव घ्याल, तुमची ऊर्जा सकारात्मक होताना आणि नकारात्मक होताना अनुभवाल. असेच काही सकारात्मक व्यक्तीच्या घरात गेल्यावर सकारात्मक ऊर्जेची जाणीव होईल आणि नकारात्मक व्यक्तीच्या घरात गेल्यावर नकारात्मक जाणीव निर्माण होईल. कोणीही हा प्रयोग करून बघू शकते आणि तुम्हाला विश्वास देखील बसेल कि कसे ह्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यावर परिणाम करतात ते.

नजर लागू नये म्हणून बाळाला काळा टीका लावताना बघितले असेलच कारण प्रत्येकाच्या अंतर्मनात बाळाला बघून चांगले वाईट विचार मनात येत असतात त्यामधील तर चांगले विचार सोडले कि वाईट विचार व ऊर्जा बाळाच्या ऊर्जेला दुषित करू शकते व अगदी लहानपणापासून त्याला विध संकटे व समस्यांचा सामना करावा लागू शकतो म्हणून त्याला काळा टीका लावला जातो जेणेकरून व्यक्तीची नजर पहिले तिथे जाते व तो काळा टीका फक्त नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो त्यानंतर बाळाला फक्त सकारात्मक ऊर्जा मिळते.

आता वरील ऊदाहरण हे बाळाचे झाले आता आपण घराचे बघू. बाळाच्या जागी घराचे चित्र च्या आणि मुंबई मध्ये इमारतीचे. अश्या किती लोकांच्या नजरा लागत असतील? ज्यांनी नकारात्मक ऊर्जा शोषण्यासाठी काही ऊपाय केले असतील ते ठीक आहेत पण ज्यांनी नसेल केले त्यांचे काय? त्यांना किती समस्यांमधून जावे लागत असेल? जे कर्मचारी नोकरदार वर्ग आहेत त्यांना असे वाटत असेल कि मालक किती श्रीमंत आहे म्हणून त्यांना एक वास्तव पुढच्या परिच्छेद मध्ये सांगतो ते वाचा.

एकदा एक श्रीमंत व्यवसायिक माझ्याकडे आला होता, त्याच्या व्यवसायाची ऊलाढाल हि करोडो मध्ये होती, घर आलिशान, गाड्या अश्या सर्व ऐषारामाच्या वस्तू होत्या. हि झाली एक बाजू पण त्या व्यक्तीचे किती रुपये बाजारपेठेत अडकले होते हे माहिती आहे का? ती व्यक्ती ज्या लोकांच्या संपर्कात येते त्यासाठी तिला श्रीमंत वस्तीत रहायचेच आहे, त्यांच्यासारखे आयुष्य हे जगायचेच आहे ह्यामध्ये काही गैर नाही, साधी राहणीमान हे सिनेमामध्ये ठीक आहे पण वास्तवात हा नियम जबरदस्तीने सर्वांना लागू करू शकत नाही. जेव्हा त्या व्यक्तीची अचानक करोडो रुपयांची येणारी कमाई हि ठप्प होवून जाते तेव्हा त्याने काय करावे? त्याच्या हाताखाली काम करत असलेल्या कायमस्वरूपी, कंत्राटी रोजंदारीवर असलेल्या लोकांना पगार कसा द्यायचा? स्वतःचे घर कसे चालवायचे? कुटुंबाचा खर्च, मुलांचा जर घरी कोण आजारी असेल तो खर्च भागवायचा कसा? लोकांकडे पैसे मागायचे तरी कसे? असे एक न अनेक प्रश्न अंतर्मनात वादळ ऊठवतात.

सर्वकाही ठीक असताना असे झाले कसे? कारण बायकोची बहीण जी नकारात्मक होती आणि तिला आपल्या बहिणीची प्रगती बघवत नव्हती, तीची नजर हि जिजाजी वर पण होती, ती विविध मार्ग वापरून त्यांचे वाईट कसे होईल हा विचार करत असायची असे करत एकदा तिच्या जाळ्यात जिजाजी अडकतात व त्यांचे शारीरिक संबंध प्रस्थापित होतात, आणि तुम्हाला माहितीच असेल कि किती प्रचंड ऊर्जा हि मुक्त होते आणि तिची देवाणघेवाण होते ते, मग तिची नकारात्मक ऊर्जा हि जीजाजींमध्ये जाते व तिथून त्यांच्या आयुष्यात व्यवसायात प्रचंड मोठी ऊतरती कळा लागते. हीच ऊर्जा मग वास्तू शोषून घेते त्यामधील वस्तू शोषून घेतात.

म्हणजे विचार करा कि कसे लोकांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते ते. आपल्याला निर्माण निसर्गाने केलेले आहे ब्रम्हांडाने केलेले आहे. त्यामुळे आपण जेवढे समजू तितके कमी आहे कारण इतक्या प्रचंड मोठ्या ब्रम्हांडात आपण एक ग्रहावर आहोत अजून आपल्याला बरेच काही शोधायचे आहे जे कधीच शक्य होणार नाही पण मानसशास्त्र आणि अध्यात्म ह्याचा शोध लावू शकतो, क्वांटम फिजिक्स देखील ऊपयोगी येवू शकतो, आता आपण भौतिक पासून एनर्जी म्हणजे ऊर्जा शास्त्राकडे जाणार आहोत.

अध्यात्मामध्ये सांगितले आहे आणि मानसशास्त्राने देखील विविध प्रयोगानी सिद्ध केलेले आहे कि नकारात्मक विचार किंवा लोकांचा प्रभाव हा आल्यावर नकारात्मक पडतो म्हणून. जितके तुम्ही नकारात्मक लोक परिस्थिती विचार आणि भावनांपासून लांब रहाल तितके तुम्ही समृद्ध आयुष्य जगाल ज्यामध्ये सुख समाधान आणि श्रीमंती देखील आली.

जर ह्या श्रीमंत व्यवसायिकाने एखादी नकारात्मक माहिती बाहेरच्या जगात पसरवली असती तरी लोकांचे लक्ष विचलित झाले असते व नजर नसती लागली आणि नाही नकारात्मक ऊर्जेने प्रवेश केला असता. नशीब चांगले कि कुणाला मोठा न बरा होणारा आजार झाला नाही किंवा इतर कारणाने कुणाच्या जीवावर बेतले नाही नाहीतर कधीही न भरून निघणारे नुकसान झाले असते तात्पुरते किंवा कायमस्वरूपी. नंतर शेवटी घराची आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची ऊर्जा शुद्ध करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागलेच. म्हणून आयुष्य जगताना थोडी काळजी घेतलेली बरी कारण नंतर होणारे सर्व नुकसान टाळले जातात किंवा त्यांची तीव्रता हि कमी करतात.

साधे नकारात्मक विचार बोलून एक छोटासा खिळा जरी ठोकला तरी पुरेसे सर्व बरबाद करायला जसे एक नकारात्मक विचार आपल्या अंतर्मनात शिरतो व सर्व बरबाद करून टाकतो तसे. मग जसे तो खिळा शोधायला कठीण असतो तसे तो एक नकारात्मक विचार तुमच्या अंतर्मनात शोधणे देखील तितकेच कठीण असते.

म्हणून बोलतो आयुष्य जगताना १०० % सकारात्मक जगा पण लोकांना ९९ % दाखवा आणि १ % नकारात्मक दाखवा जेणेकरून ते तुम्हाला जास्त त्रास देणार नाहीत आणि नाही कोणी तुमचे आयुष्य ऊध्वस्त करण्याचा प्रयत्न करतील.

मी इथे जे ऊदाहरण दिले आहे तिथे तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या ठेवून वाचू शकतात जेणेकरून तुम्हाला समजायला सोपे जाईल. इथे कुठलेही ऊपाय सांगितले नाही कारण जो पर्यंत समस्या काय आहे त्याचे मूळ कुठे आहे हे समजत नाही तोपर्यंत कुठलेही ऊपाय करू नका, अगदी लहान समस्या दूर होतील पण मोठ्या समस्या अजून चिघळत जातील. लोकांनी अशीच पुस्तके वाचून ऊपाय वाचून स्वतःला आजारी पडले होते. वेळोवेळी तज्ञांची मदत घेतलेली केव्हाही ऊत्तम.

जर तुम्हाला देखील असे अनुभव आले असतील तर ते मेसेज द्वारे, व्हास्टएप द्वारे शेअर कराल. appointment बुक करण्यासाठी पूर्ण नाव आणि जिल्हा टाईप करून पाठवा. फी पेड झाल्यावरच  appointment बुक केली जाईल.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #ऊपचार ऊपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
Previous
Next Post »
0 आपले विचार