इलेक्शन ड्युटी मुळे आलेला ताण तणाव कसा दूर करायचा?
इलेक्शन ड्युट्या जेव्हा लागतात तेव्हा काही दिवस अगोदरपासून ते संपल्यानंतर काही दिवस किंवा महिने सुरवातीला मानसिक ताणाला सरुवात होते. जे छोटे वाटणारे आजार आहेत ते देखील मोठे होत जातात आणि त्या आजारांचे शारीरिक आजारात रुपांतर होते.

आपला मेंदू किंव अंतर्मन हे नेहमी पहिले भूतकाळात डोकावते, काय चांगले वाईट घडले त्याचे चलचित्र अंतर्मनात सुरु होते, काहींचे तर चलचित्र नसून ते भूतकाळात वास्तवात जावून येतात ह्याला आपण जिवंत चलचित्र बोलू शकतो व ज्या बऱ्या झालेल्या जखमा असतात त्या परत ताज्या होतात.

इलेक्शन ड्युटी मध्ये ताण तणाव हा खूप असतो. अनेकदा घरापासून खूप लांब ड्युटी दिली जाते, जास्त वय किंवा आजारपण हे बघितले जात नाही. तिथे नीट व्यवस्था देखील नसते त्यामुळे अजून मानसिक आणि शारीरिक त्रास होतो व त्याचे रुपांतर शारीरिक आजारात होते.

व्यवस्थापनाचा अभाव, त्यामुळे सतत चे नकारात्मक अनुभवांचे चक्र, नाही बोलू शकत नाही कारण ज्यांची ओळख नसते त्यांना जावेच लागते, वाईट अनुभव, कामाचा लोड, सतत लोकांची गर्दी, थोडा गोंगाट आणि विचित्र शांतता आशयामुळे मानसिक आणि शारीरिक आजार जडतात.

आता मानसिक आजार बोलले कि असे वाटते कि त्या व्यक्तीला झोपेत हृदय विकाराचा झटका तर नाही येणार ना? वय २० ते ४० वयोगटातील लोकांना हृदय विकाराचा झटका आणि आणि ते मरण पावले अश्या अनेक बातम्या नाही तर मी ज्या परिसरात राहतो तेथील वास्तव देखील आहे. मग विचार करा संपूर्ण महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल ते?

ज्यांचा जितका वाईट अनुभव तितके उपचार जास्त करावे लागतील पण आपण ह्या ताण तणावामुळे येणाऱ्या मानसिक आणि मनोशारीरिक आजारांपासून कायमचे मुक्त होऊ शकतो आणि निरोगी जीवन आनंद घेत जगू शकतो.

जेव्हा तुम्ही आपले काम संपवून घरी याल तेव्हा जास्तीत जास्त वेळ हा मनातील विचार काढून टाकण्यावर द्या. जे जे महत्वाचे आहे ते ते लिहून ठेवा व बाकीच्या स्मृती ह्या कायमच्या मिटवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही श्वासावर नियंत्रण ठेवता ठेवता स्मृती मिटवण्याचे काम करू शकता.

तुम्हाला काही दिवस हा सराव करत राहावाच लागेल. अगदी सोपे आहे आणि तुम्हाला लगेच सवय देखील होईल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ऑफिस च्या वेळेत व्यस्त रहावे लागेल. जशी विचारांची पोकळी निर्माण होईल तशी ती नकारात्मक भूतकाळ भरण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही कामात व्यस्त असल्यामुळे किंवा इतर ठिकाणी लक्ष्य गुंतवल्यामुळे नकारात्मक भूतकाळातील अनुभव आठवणार नाही व ते तुमच्या स्मृतीमधून कायमस्वरूपी पुसले जातील.

बातम्या बघू नका, पेपर वाचू नका, संध्यानंद सारखा पेपर वाचला तर चालेल पण बाकी कुठलेही भीती दाखवणारे, ओरडणारे आणि भांडण करणारे चेनल बघू नका आणी पेपर वाचू का.

मागच्या आठवणींना उजाळा देवू नका मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक. झाले गेले ते झाल आता पुढे चला. परत तुम्ही भूतकाळात पाठी जावू शकत नाही आणि भले तुम्हाला सकारात्मक अनुभव आलेला असेल पण दुसर्यांना कदाचित आला नसेल किंवा मागच्या वर्षी तुम्हाला वाईट अनुभव आला असेल ते उगाळण्याचे काम तुम्ही कराल. स्थिर पाणी स्वच्छ असते आणि ते जर ढवळले तर मग गढूळ होवून जाईल.

जर पोलीस असाल तर तुम्हाला जास्त वेळ ध्यान करावे लागेल. कारण तुमच्या कामात जास्त शारीरिक आणि मानसिक मेहनत असते, सोबत ताण फक्त मन मेंदू आणि अंतर्मनावर नाही तर शरीरवर देखील येतो. जर हाच मेंदू तुम्हाला आजारपण देवू शकतो तर हाच मेंदू तुमच्यावर उपचार का नाही करू शकणार? सर्वकाही शक्य आहे.

तुम्ही हा प्रभावशाली उपाय करून बघा मग मला कळवा आणि मला खात्री आहे कि नेहमीप्रमाणे अनेकांचे फोन येतील कि १०० % फरक पडला आहे. जर काहींना फरक नाही पडला तर त्यांच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवा उपलब्ध आहे त्याचा लाभ घ्याल.

माझ्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रमंडळी हे विवध सरकारी खात्यात काम करत होते आणि काही काम करत आहेत त्यामुळे त्यांना काय त्रास होतो हे मला चांगलेच माहिती आहे. तुम्ही एकता नाही आहात मी तुमच्या पाठीशी आहे. खाली वेबसाईट लिंक दिली आहे त्यामध्ये जावून तुम्ही माझे अगोदरचे लेख वाचू शकता त्यांचा देखील तुम्हाला प्रचंड फायदा होईल.

घरगुती उपचार हे समस्या जो पर्यंत वाढत नाही किंवा जास्तीत जास्त तीन महिने करायचे. जर तीन महिन्यात मानसिक आजार दूर झाला नाही तर लगेच तज्ञांची मदत घ्यावी. त्यापुढील प्रत्येक दिवस तुमचा मानसिक आजार, मनोशारीरिक आजार हा वाढत जातो. हा आजार वाढत जाने हो धोक्याची सूचना आहे. आयुष्यात जीवाशी प्रयोग करू शकत नाही.

आपला
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH
Previous
Next Post »
0 आपले विचार