मानसिक गुलामाचे आयुष्य
सोमवार : सकाळी लवकर उठणे, कामावर जाने (जायची वेळ फिक्स आहे), तेच एकसारखे काम करणे, त्याच नकारात्मक लोकांमध्ये राहणे, त्याच सामान्य गोष्टी करणे, जगावर चर्चा करणे, निघण्याच्या वेळेवर अजून काम येणे, रात्री उशिरा घरी जायला निघणे, ट्रेन मध्ये गर्दी असणे, सामान्य मानसिकतेची लोक, सामान्य चर्चा, जाती धर्माच्या, तेढ निर्माण करणाऱ्या, कट्टर वादाच्या गोष्टी करत बसने, स्त्रियांबद्दल खालच्या दर्ज्याच्या गोष्टी करणे, दुसऱ्या समाजातील किं जातीतील असेल अजून खाली जावून चर्चा करणे, बसण्याच्या जागेवरून भांडण, घरी पोहचणे, IPL क्रिकेट मध्ये जे खेळाडून गुंतवणूकदार करोडो कमवत आहेत तो सामना केबल भाडे भरून आपण बघणे, ते जिंकल्यावर असे वाटते कि आपण जिंकलो आणि आपल्या आयुष्यत सपशेल पराभूत असतो, ते करोडो घेवून घरी जातात, आपण शून्य पण आत्मविकासासाठी असलेले वेळ नको त्या गोष्टीला देवून परत झोपून जातो.
सारांश : मानसिक गुलाम आपली सर्व इच्छाशक्ती मानसिक गुलाम बनून राहण्यातच घालवतो.

मंगळवार : सोमवारची पुनरावृत्ती. प्रगती शून्य.

बुधवार : मंगळवारची पुनरावृत्ती. प्रगती शून्य.

गुरुवार : बुधवारची पुनरावृत्ती. प्रगती शून्य.

शुक्रवार : गुरुवारची पुनरावृत्ती. प्रगती शून्य.

शनीवार : शुक्रवारची पुनरावृत्ती. प्रगती शून्य.

रविवार : अगदी कोणी मेलाच तर बाहेर जाने, जवळपास पैसे बघून फिरायला जाने, फिरण्यापेक्षा खर्चावर लक्ष्य, मुलांना ओरडणे, प्रत्येक गोष्टीला नाही बोलणे व मुर्खांसारखे कारणे देणे जे फक्त तुमच्या घरचीच मंडळी ऐकू शकतात, थोडे जास्त पैसे खर्च करून गेलात तर जास्तीत जास्त आठवड्याभराच्या गुलामीच्या आयुष्याला विसरायचा प्रयत्न करण्यात उर्जा घालवणे, कधीतरी केलेल्या पिकनिक चे विषय काही वर्ष काढणे, भूतकाळ सतत उकरत राहणे, स्वतःचे शहाणपण सांगत राहणे, चांगले, सकारात्मक किंवा प्रगतीशील सल्ले, चर्चा नाकारणे, आत्मविकास आर्थिक विकास मोफत किंवा फी भरून असलेल्या प्रशिक्षणाला न जाने व नावे ठेवणे, नाहीतर शनीवारची पुनरावृत्ती. प्रगती शून्य.

जानेवारी : वरील सर्व आठवड्याची पुनरावृत्ती, महिना संपला.

फेब्रुवारी : जानेवारीची पुनरावृत्ती

मार्च : फेब्रुवारीची पुनरावृत्ती

एप्रिल : मार्चची पुनरावृत्ती

मे : एप्रिलची पुनरावृत्ती

जून : मेची पुनरावृत्ती

जुलै : जूनची पुनरावृत्ती

ऑगस्ट : जुलैची पुनरावृत्ती

सप्टेंबर : ऑगस्टची पुनरावृत्ती

ऑक्टोबर : सप्टेंबरची पुनरावृत्ती

नोव्हेंबर : ऑक्टोबरची पुनरावृत्ती

डिसेंबर : नोव्हेंबरची पुनरावृत्ती

२०१६ वर्ष : वरील पुनरावृत्तीत संपले

ते सरासरी वयोमर्यादा अंदाजे १०० पकडूया जर आता वय २० असेल तर

२०९६ : मरण्याच्या काही सेकंद अगोदर आठवणार कि आपण एक सारखेच आयुष्य का जगात होतो जेव्हा आपल्या मध्ये अपार क्षमता होती, फक्त ती व्यक्त करता नाही आली म्हणजे व्यक्त करण्यासाठी फक्त १० सेकंद हा कालावधी पुरेसा होता ज्यामुळे तुमचे तुमच्या पुढील पिढीचे संपूर्ण आयुष्य बदलून जाणार होते, ते दुख कोणीच सहन करू शकणार नाही.

स्वर्ग पण इकडेच आहे आणि नर्क पण.
तुम्हाला कसे जगायचे आहे ते तुम्ही ठरवायचे आहे.

अश्विनीकुमार चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार