UPSC , MPSC, IIT, IIM

जे UPSC , MPSC, IIT, IIM परीक्षेमध्ये पास झालेत पण प्रकाशझोतात नाही आले, जे नापास झालेत, ज्यांनी प्रयत्न केला पण काही
कारणास्तव परीक्षा नाही देवू शकले अश्या विद्यार्थ्यांच्या धाडसिपनाला,
दृढ इच्छाशक्तीला, प्रामाणिक पने केलेल्या प्रयत्नाला माझा सलाम.
संपूर्ण जगामध्ये जे पहिले आले आहेत, विजेते आहेत, उच्च पदावर आहेत,
श्रीमंत व शक्तिशाली आहेत, अशी लोक नगण्य प्रमाणात आहेत, ते ह्या
जगातून नाहीशे झाले तरी मनुष्य जात संपणार नाही. पण जर जे दुसऱ्या
क्रमांकापासून खाली येतात, जे पराभूत आहेत, जे सामान्य आहेत अशी लोक जर पृथ्वीतलावरून नाहीशे झाले तर संपूर्ण मानवजातच नष्ट होवून जाईल.
जाता जाता एकच मोलाचा सल्ला देवून जातो,
माणसाची इच्छाशक्ती हि प्रत्येकवेळेस यशस्वी ठरली आहे,
प्रचंड इच्छाशक्ती असलेले, ध्येयाने झपाटलेल्या स्त्री किंवा पुरुषाचा नाद करायचा नाही.
तुमच्या मनात कधीही नकारात्मक विचार आलेत कि लगेच फोन कराल.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार