जगप्रसिद्ध मुष्ठीयोद्ध "मुहोम्मद अली" ची प्रोस्ताहन देणारी कथामुहोम्मद अली हा जगप्रसिद्ध मुष्ठीयोद्धा होता. तो जेव्हापण रिंग मध्ये जायचा तेव्हा तो स्वतःशीच बडबडायचा "मी श्रेष्ठ आहे, मी विजेता आहे", "मी श्रेष्ठ आहे, मी विजेता आहे", "मी श्रेष्ठ आहे, मी विजेता आहे", "मी श्रेष्ठ आहे, मी विजेता आहे", तो कधीच "मला आशा आहे मी जिंकणार", "मला आशा आहे मी जिंकणार", "मला आशा आहे मी जिंकणार" असे नव्हता बोलत. तो "मी श्रेष्ठ आहे, मी विजेता आहे" हेच बोलायचा. जेव्हा पण तो रिंग मध्ये जायचा आणि आपल्या प्रतीस्पर्धीला बोलायचा "बेल्ट (पारितोषिक) जरी तुझ्याकडे असला तरी विजेता मीच आहे", मुहोम्मद अली हा रिंग मध्ये विजेता बनण्याआधी बाहेर विजेता बनलेला होता. तो "मी श्रेष्ठ आहे, मी विजेता आहे" असे का सतत म्हणत होता? ह्यालाच बोलतात सकारात्मक विचार, मानसिक दृष्ट्या तो स्वतःला झपाटून टाकत होता, ह्याचा काय अर्थ आहे? सकारात्मक विचार हे जीवनामध्ये सर्व काही शक्य करून टाकतात, हे किती लोकांना मान्य आहे? जर मान्य असेल तर हे साफ खोटे आहे. मी कितीही सकारात्मक असलो तरी मी तुमची किडनी बदलू शकत नाही, जर बदलली तर तो माणूस मरून जाईल, सकारात्मक विचार हे काही यशाची हमी नाही घेत, सकारात्मक विचार हे सकारात्मक कृतीसोबत आणि सकारात्मक प्रयत्नांसोबत तुमच्या यशाच्या समभावनांना वाढवतात. जेव्हा मुहोम्मद अली स्वतःशीच बोलायचा "मी श्रेष्ठ आहे, मी विजेता आहे", "मी श्रेष्ठ आहे, मी विजेता आहे" तेव्हा तो नुसता सोफ्यावर बसून टीव्ही बघता बघता, वडा पाव खाता खाता नव्हता बोलत, जेव्हा पण तो "मी श्रेष्ठ आहे, मी विजेता आहे" बोलायचा तेव्हा तो सराव करताना पंचिंग बैग ला मुक्का मारत बोलत असायचा. म्हणजे सकारात्मक विचार हे सकारात्मक कृतीसोबत चालत होते, नाहीतर नुसत्या सकारात्मक विचारांना काहीच महत्व नाही. खूप लोकांना एक गैरसमज असतो कि सकारात्मक विचारांसोबत आपण खूप काही करून जावू शकतो, जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर सकारात्मक कृती बरोबर त्याच्या मागे सकारात्मक विचार आलेच पाहिजे, ह्यामुळे तुमच्या यश मिळवण्याचा संभावना वाढत जातात. मुहोम्मद अली नुसार तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो गोष्टी पाहिजे पहिली पात्रता आणि दुसरी इच्छा, एकाशिवाय दुसरी काम नाही करणार, तुम्हाला दोन्ही गोष्टी म्हणजे पात्रता आणि इच्छा पाहिजेतच. ह्या दोन्ही गोष्टींपैकी इच्छा म्हणजेच इच्छाशक्ती हि तुमच्या कौशल्यापेक्षा थोडी जास्त महत्वाची आहे. जेव्हा मी विजेतेपदासाठी मुश्ठीयुद्ध खेळत होतो तेव्हा माझ्या प्रतिस्पर्धीने मला जोरदार मुक्का मारुन मला खाली पडले होते, विजेत्याने सर्व प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त मार बॉक्सिंग रिंग मध्ये खाल्ला असतो. जेव्हा माझ्या प्रतिस्पर्ध्याने मला मारुन खाली पडले होते, मी जमिनीवर पडलेला होतो, पंचानी आकडे मोजायला सुरु केले होते, तेव्हा काही माझ्या कौशल्याने माझी मदत नाही केली, कसले कौशल्य, माझ्या प्रतिस्पर्धीने तर मला मारुन खाली पडले होते. त्यावेळेस फक्त माझी इच्छाशक्ती मला सतत बोलत होती कि "एकदा परत उठून उभा राहा", "एकदा परत उठून उभा राहा", "एकदा परत उठून उभा राहा", मी परत एकदा उठून उभा राहिलो ते माझ्या इच्छा शक्ती मुळे, न कि कौशल्यामुळे. चला उद्योजक घडवूया अश्विनीकुमार फुलझेले ८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार