परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना खुले पत्र
मी परीक्षेत काही विषयांत नापास झालो होतो, पण माझा मित्र सगळ्या विषयात उत्तम गुणांनी पास झाला होता. आज तो मायक्रो सोफ्ट मध्ये इंजिनिअर आहे आणि मी मायक्रो सोफ्ट चा मालक आहे.
बिल गेट्स
बारावीच्या परीक्षेमध्ये काहीही निकला लागो, जगावर सर्व क्षेत्रात यशस्वी होणाऱ्यांमध्ये शाळा सोडलेले किंवा नापास झालेलेच आहे. एकच आयुष्य भेटले आहे, तुम्हाला जे आवडते तेच करा, जग नुसते नाव ठेवायला आहे, त्याला तुम्ही असाल काय आणि नसाल काय ह्याने काहीच फरक पडत नाही. डॉक्टर, इंजीनिअर, सरकारी, खाजगी नोकरी ह्या पलीकडे खूप मोठे जग आहे ज्यांना तुमची नितांत गरज आहे.
तुमची आत्महत्या हि आता असलेल्या समाजाला दिलेली एक प्रकारची शिवी आहे, विद्यार्थी हा काही मंगळावरून नाही आलेला, तो ह्याच समाजातून बनलेला आहे, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हि समाजातील असलेल्या मानसिकतेची घाण दाखवत असते. जिथे समजूतदार पण संपतो तिथे कायदा आणि आत्महत्या ह्यांचे राज्य सुरु होते.
कोणीही तुमच्या पाठीशी असो व नसो मी एकटा तुमच्या पाठीशी आहे, वेळ प्रसंगी कोणीच कामी येत नाही, सुशिक्षित तर बिलकुल नाही, ह्याचा अर्थ असा नाही कि तुम्ही एकटे आहात, माझ्यासारखी अनेक मित्र मैत्रिणी आहेत जे तुमच्या बाजूने आहे, असे अनेक पालक आहेत जे आपल्या मुलांना मुक्त पने जगू देतात व असे अनेक विद्यार्थी आहेत जे नापास होवूनही गुगल, मायक्रो सोफ्ट, एपल साठी काम करत आहेत व विदेशात गेले आहेत.
शैक्षणिक परीक्षेत नापास झाले तर चालेल, आयुष्याच्या परीक्षेत कधीच नापास होऊ नका.
संपूर्ण जग तुमच्यासाठीच आहे, कल्पनेचे, कौष्यल्याचे पंख लावा आणि घ्या भरारी.

नकारात्मक विचार आले कि लगेच फोन कराल.

अश्विनीकुमार चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार