कचरा वाहून नेणाऱ्या गाडीचा सिद्धांत
उत्तम संदेश, जेव्हा तुम्ही एकांतात असाल तेव्हा ह्या सिद्धांताचा विचार कराल. हे सत्य आहे.

आम्हाला विमानतळावर जायचे होते यासाठी आम्ही टेक्सी केली व विमानतळाच्या दिशेने निघालो. आम्ही बरोबर उजव्या बाजूने चाललो होतो, जशी पार्किंग जवळ येताच एक काळ्या रंगाची गाडी आली आणि जिथे आम्ही पार्क करणार होतो तिथे आमच्या समोर पार्क झाली.
आमच्या चालकाने जोरात ब्रेक दाबला, इंचांनी आमची गाडी त्या काळ्या गाडीपासून वाचवत पुढे गेली.
त्या काळ्या गाडीचा चालक आमच्या कडे बघत ओरडायला सुरवात केली. आमचा चालक हा चांगला होता, तो हसला आणि मान हलवली.
मी आमच्या चालकाला विचारले "तू असे का केलेस? त्याने जवळपास आपल्याला ठोकलेच असते आणि हॉस्पिटल ला पाठवले असते."
आमचा चालक स्पष्टीकरण देत म्हणाला खूप लोक हि कचऱ्याच्या गाडीसारखी असतात, त्यांच्या मध्ये कचरा भरून वाहत असतो, वैतागाने भरलेला कचरा, रागाने भरलेला कचरा आणि निराशेने भरलेला कचरा. जेव्हा ती कचऱ्याची गाडी पूर्णपणे भरून गेलेली असते तेव्हा त्यांना तो कचरा खाली करायचा असतो आणि कधी कधी ते तुमच्यावर तो कचरा खाली करतात.
हे कधीच मनावर घ्यायचे नाही. फक्त हसायचे, चांगल्या भावना त्यांना पोहचवायच्या आणि पुढे जायचे. त्यांनी आपल्यावर फेकलेला कचरा आपण घेवून पुढे कामावरच्या लोकांवर, घरी किंवा इतर रस्त्यावरील लोकांवर फेकत नाही जायचे. म्हणण्याचा उद्देश इतकाच आहे कि यशस्वी लोक कधीच कचऱ्याच्या गाडीमुळे आपला दिवस खराब जावू देत नाही.
सकाळी निराशेने उठण्यासाठी आयुष्य खूप छोटे आहे, म्हणून जे तुमच्याशी चांगले वागतात त्यांच्यावर प्रेम करा. जे तुमच्याशी नीट नाही वागत त्यांच्या साठी प्रार्थना करा.
आयुष्य म्हणजे १० % तुम्हाला काय मिळत आहे.

आणि

९० % म्हजे तुम्ही त्यातून काय घेत आहात हे आहे.

कचरामुक्त आयुष्य जागा.

चला उद्योजक घडवूया
अश्विनीकुमार फुलझेले
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार