AMAZON १२००० करोड गुंतवणूक आणि तुम्ही
AMAZON ची सुरवात भारतामध्ये २०१३ मध्ये झाली.
सुरवातीला ते फक्त इलेक्ट्रॉनिक सामान विकत होते.
भारतामध्ये उद्योग वाढवायला त्यांनी १२,००० करोड गुंतवले.
जगातील कुठल्याही मोठ्या उद्योगामागे मागे हजारो छोटे उद्योग गुंतलेले असतात.

माझा प्रश्न सोपा आहे.
तुम्ही ह्या १२,००० करोड पैकी काही आपल्याला भेटावे ह्यासाठी काय केले?

१) कच्चा माल पक्का करून विकला?
२) स्वतःचे उत्पादन ऑनलाईन नेले?
३) असंघटीत उद्योग उत्पादनाला संघटीत करून ऑनलाईन बाजारात विकायला ठेवले?
४) गोडाऊन बांधून, विकत किंवा भाड्याने घेवून कंपनीला लावले?
५) ट्रक, टेम्पो किंवा इतर माल वाहतूक गाड्या घेवून ट्रानस्पोर्ट व्यवसायिक म्हणून स्वतः किंवा भाड्याने गाड्या लावल्या?
६) माल साठी लागणारे कव्हर व इतर वस्तू बनवून व्यवसायिकांना पुरवल्या?
७) इमेज एडिटिंग, डाटा एन्ट्री, अपलोडिंग, कंटेंट रायटिंग व इतर संगणकीय सर्विस पूरवल्यात?
८) उत्पादन डिलेव्हरी करणारी सर्विस पुरवलीत?
९) ह्याच वेबसाईट ची नक्कल करून आपली एक वेबसाईट सुरु करून ह्या वेबसाईट वरील उत्पादन तुमच्या वेबसाईट वर विकलेत का?
१०) त्यांना लागणार कामगार वर्ग पुरवण्याची सर्विस तुम्ही दिली का?

असे अनेक प्रश्न आहेत जे तुम्ही स्वतःला विचारायचे आहे.कृतीशील माणस कारणे नाही ऐकत, ते कृती करण्यात, पैसे कमावण्यात आणि घर सांभाळण्यात मग्न असतात. इंटरनेटचा हा नवीन व्यवसायिक ओळख होण्यासाठी, किंवा आपले उत्पादन, सेवा हि नेट द्वारे ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी करत असतात. थोडक्यात त्यांचा विकास चालू असतो, काम संपल्यावर ते त्यांच्या खाजगी आयुष्यात काय करतात ह्याच्याशी मला काही देणे घेणे नाही.

ह्या १२००० करोड मध्ये नाही बोलले तरी २००० ते ५००० सुषम, मध्यम आणि लघु उद्योग चालत असतील.

विचार करा आणि योग्य कमेंट्स द्या.

अश्विनीकुमार चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार