तुमची श्रीमंत, समृद्ध, उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार बनण्याची मानसिकता आहे का?समजा प्रत्येकाला एक एक कोंबडी देण्यात आली.

७५ % लोक विचार करतील कि ह्या कोंबडीची भाजी झणझणीत आणि चविष्ट होईल. मग ते कोंबडीला मारतात व त्या कोंबडीपासून विविध प्रकारचे व्यंजन बनवून खातात. एक दिवस तर ढकलला पण पुढील दिवसांचे काय? दुसऱ्या दिवशी परत भूक लागते पण खायला कोंबडी नसते.

२४ % लोक कोंबडीला अंडी देण्याचा कारखाना समजतात. जो पर्यंत कोंबडी मरत नाही तोपर्यंत ते अंड्यांचा आस्वाद घेतात.

१ % लोक विचार करतात जर त्यांनी कुक्कुटपालन करायला सुरवात केली तर? मग ते अजून एका कोंबडीमध्ये गुंतवणूक करतात किंवा कर्जाने घेतात. मग पिल्ल होतात, ती मोठी होतात, सुरवातीला ते कर्जात बुडालेले असतात.

एक कोंबडी आणि गुंतवणुकीपासून ते अनेक कोंबड्या करतात, वेळ जातो, तो वेळ ते तग धरून बसतात, त्यांच्या आजूबाजूला कोंबडीचे विविध व्यंजन खाणारी अंडी खावून जगणारी लोक त्यांना दिसत असतात त्या मधून ते स्वतःवर ताबा मिळवतात, लक्ष्य आपल्या ध्येयावर ठेवतात, आणि पुढे वाटचाल सुरु ठेवतात.

उरलेली अंडी विकली जातील हा टप्पा ते गाठतात. आता मुबलक प्रमाणात कोंबड्या असतात जेणेकरून त्यांना अंडी हि जास्त मिळतात ब बाजारत विकण्यासाठी तयार असतात.

इथून नफा सूर होतो.

आता त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात कोंबड्यांचे देखील उत्पादन होते जेणेकरून ते कोंबडी देखील बाजारात विकायला सुरवात करतात.

इथून त्यांचा श्रीमंत होण्याचा प्रवास सुरु होतो. कालावधी किती लागला असेल तो बघा. ५ ते १० वर्षे. काय काय सहन करावे लागते हे त्याच व्यक्तीला माहिती असते.

आता हे झाले सर्वसामान्य लोकांना प्रोस्ताहित करण्यासाठी सांगण्यात येणाऱ्या लघु कथा.

आता रक्तरंजित, गुन्ह्याने भरलेली काळी बाजू देखील मांडतो.

सर्वांना एक एक कोंबडी तर भेटली पण सर्वच काही इमानदारीने गुंतवण्यासाठी पैसे नाही शोधत तर काही चोरी करतात, इतरांना लुटतात, व्यवस्थेला लाच देतात.

पकडले गेले तर न्याय व्यवस्थेला लाच देवून, साक्षीदारांना धमकी देवून किंवा मारून टाकून न्याय आपल्या बाजूने वळवतात.

लोकांना जात, धर्म, प्रांत, देश अश्या विविध भावनिक मुद्द्यात गुंतवून त्यांना मानसिक दृष्ट्या त्यामध्ये गुंतवून आपली पोळी भाजतात व त्यांच्या कडील कोंबड्या स्वतःकडे ठेवून स्वतः श्रीमंत होतात.

समूह बनवतात व दुसर्या समूहावर हल्ला करतात. मार्गावर कर लावतात, शासन व्यवस्था बनवतात, सामान्य लोकांकडून कर गोळा करतात आणि श्रीमंतांना वाटतात.

जे घडून गेले आहे आणि जे घडत आहे ते सर्व मांडले आहे, सर्व प्रकारच्या मार्गांनी यशस्वी झालेली लोक बघितली आहे आणि समाजाचा त्यांच्या विषयी असलेला दृष्टीकोन देखील बघितला आहे.

तुम्ही ठरवले तर गरीब विचारांपासून श्रीमंत विचारांकडे वळू शकतात. आर्थिक दृष्ट्या साक्षर बना, वास्तवात रहा आणि नंतर वाटचाल करा.

आर्थिक मानसिकता घडवण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि त्यामधील समस्या दूर करण्यासाठी विशेष, समुपदेशन, सल्ला, मार्गदर्शन प्रशिक्षण उपलब्ध. ताण तणाव आणि नैराश्य दूर करण्यासाठी उपयोग होतो.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक पेज : https://www.facebook.com/chalaudyojakghadwuya/

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत व्हास्टएप ग्रुप लिंक (आत्मविकास आणि मानसिक समस्यांसाठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
Previous
Next Post »
0 आपले विचार