रात्री, एकांत अश्या ठिकाणी जिथे मनुष्यांची गर्दी नसते तिथे चित्र विचित्र भास किंवा अनुभव का येतात?



रात्री, एकांत अश्या ठिकाणी जिथे मनुष्यांची गर्दी नसते तिथे चित्र विचित्र भास किंवा अनुभव का येतात?

दोन प्रकारच्या उर्जा सतत कार्यरत असतात
१ सजीव उर्जा
२ निर्जीव उर्जा (मृत)

सजीव उर्जा जेव्हा दिवसा कार्यालये सुरु असतात तेव्हा ते संपूर्ण कार्यालय हे सजीव उर्जेने भरून गेलेले असते जिथे निर्जीव उर्जा हि थांबू शकत नाही तेव्हा त्यांचा वास हा एकांत ठिकाणी असतो जिथे सजीव उर्जेची नगण्य प्रमाणात किंवा शून्य असते.

अनेकांना दिवसा देखील अद्भुत शक्तींचा अनुभव येत असतो ते देखील अश्या एकांत ठिकाणी जिथे सजीव उर्जेचे वास्तव्य नसते तिथे.

सजीव आणि निर्जीव उर्जा एकमेकांवर हल्ला ह्यासाठी करतात कारण प्रत्येकाला आपले घर हे जपायचे असते. प्राणी देखील त्यांच्या हद्दी कोणी आला तरी ते हाकलून देतात किंवा हल्ला करतात असेच मनुष्य प्राण्याचे देखील आहे, इथे फक्त पोलीस बोलवावे लागतात.

जेव्हा सजीव उर्जा जिथे निर्जीव उर्जेचे वास्तव्य आहे तिथे जाते तेव्हा तिच्यावर हल्ला चढवला जातो किंवा त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केला जातो. ह्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो.

आपण ह्या उर्जांना आत्मा असे नाव देवू शकतो किंवा तुमच्या अंतर्मनाने तयार केलेले उर्जा, कंपने ह्याचे शरीर असे देखील म्हणू शकतो. जसे झोपेत आपल्याला आपण शरीर सोडून बाहेर आलो आहोत आणि जग बघत आहोत असा अनुभव येतो तो.

सजीव म्हणजे चांगले आणि निर्जीव म्हणजे वाईट. सजीव उजेडात वास्तव्यात असतात तर निर्जीव अंधारात किना घनदाट सावलीत अस्तित्वात असतात. ज्यांचे अस्तित्व जास्त ते जिंकतात.

जेव्हा आपण सकारात्मक विचार करत असतो तेव्हा सजीव उर्जा आपल्या शरीरात प्रवेश करून आपल्याला बळ देते व १००० पटीने आपली क्षमता वाढवते. निर्जीव उर्जा नकारात्मक विचार करतो तेव्हा आपल्या शरीरात प्रवेश करते व आपली प्राण उर्जा शोषून घेऊन आपली उर्जा निर्जीव करून टाकते ज्यामुळे विविध प्रकारची संकटे, समस्या तुमच्या आयुष्यात निर्माण होतात.

काही लोक अशी देखील निघाली कि ज्यांनी सजीव उर्जेचा वाईटासाठी आणि निर्जीव उर्जेचा चांगल्यासाठी वापर केला. उर्जा हि तिचा जो नियम आहे त्यानुसार काम करते, वापर करणाऱ्यावर सर्वकाही अवलंबून आहे.

जी मोठ मोठी कार्पोरेट ऑफिसेस आहेत तिथे सर्व पातळी घसरवून राजकारण चालते, लोक जीव घ्यायला देखील कमी करत नाही अश्या एक ऑफिसमध्ये एकाला आवाज एकू आले आणि उर्जा हि स्त्री च्या रुपात दिसली. तेव्हा तो प्रचंड घाबरलेला होता व तिथून पळाला होता.

कोण होती ती?

एका कार्यालयात काम करणारे, प्रेम होत, लग्न करतात, ती नवऱ्यापेक्षा उच्च पदावर असते, पद सोडते, ते पद नवऱ्याला मिळते, मुलं होतात, शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळ सूर होतो, सासरचे सून मानत नाही, नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असतात, व शेवटी कळते कि फक्त पद भेटावे, बढती भेटावी म्हणून प्रेमाचे नाटक करण्यात आले, शेवटी असह्य झाल्यावर आत्महत्या केली.

मुंबई ची लोकसंख्या अडीच करोड, आकड्यात २,५०,००,०००. कोण कोण कुठल्या समस्या मधून जात आहे हे आपल्याला कसे कळणार? टीव्ही, किंवा शासनमान्य जे काही मार्ग आहे त्याद्वारे मिळणारी माहिती हि त्यांच्या फायद्याची असते ना कि सर्वसामान्य लोकांच्या फायद्याची. पोटापाण्यासाठी इथे व्यक्ती धावपळ करत असतो, कधी कधी असे घडते कि बाजूला वाईट होत असेल तर घाईगडबडीत लक्ष्य जात नाही.

समस्या आहे तिथे समाधान देखील आहे, उपाय देखील आहेत, लोक मरण्याच्या दारातून परत आलेली आहेत जिथे डॉक्टर सुद्धा बोलले होते कि काहीही होऊ शकत नाही. तुमच्या प्रत्येक समस्येचे माझ्याकडे समाधान आहे कारण मी तुमच्या दृष्टीकोनातून तुमचे आयुष्य बघतो.

आपल्या आजूबाजूला विविध प्रकारच्या शक्त्यांचे अस्तित्व आहे मग त्यांचा वापर आपल्या फायद्यासाठी का नाही करावा? जिथे वाईट काम करायचे असते तिथे लोक विचार न करता कृती करतात व ह्या शक्त्यांचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेतात, चांगली लोक फक्त विचार करतात व वाईट लोकांच्या कृतीला बळी पडतात.

जे अनुभव आहेत तेच वास्तव आहे. अनुभव नाही ते वास्तव नाही. कुठलेही शास्त्र परिपूर्ण नाही, तुम्हाला तुमच्या गरजेनुसार शस्त्रांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायचा आहे. इथे मी समजावत बसणार नाही कारण माझे संपूर्ण लक्ष्य हे सर्वसामान्य लोकांना सर्व मार्ग वापरून समस्यांमधून बाहेर काढून त्यांना सुख, समृद्धी च्या मार्गांनी घेवून जायचे आहे.

फेसबुक पेज :

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
Previous
Next Post »
0 आपले विचार