शारिरीक जखमा भरता येतात, मात्र मानसिक जखमा या सहजासहजी भरत नाहीत, आणि त्या भरल्या नाहीत की अशा (आत्महत्येच्या) घटना घडतात. त्यामुळे मानसिक छळ हा जास्त भयानक असतो'शारिरीक जखमा भरता येतात, मात्र मानसिक जखमा या सहजासहजी भरत नाहीत, आणि त्या भरल्या नाहीत की अशा (आत्महत्येच्या) घटना घडतात. त्यामुळे मानसिक छळ हा जास्त भयानक असतो'.
उच्च न्यायालय मुंबई
डॉक्टर पायल तडवी आत्महत्या खटला

हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हंटले आहे. मानसिक जखमांचे स्वरूप किती घातक असू शकते ह्याकडे लक्ष्य वेधले आहे. मानसिक जखमा देणारे सर्व जाती, धर्मात, प्रांतात, समाजात आणि देशात असतात.

एका विद्यार्थ्याला मानसिक जखम होते ती शाळेत, खाजगी शिकवणीत, घरी किंवा परिसरात कुणाकडूनही होऊ शकते. एक कर्मचारी मग तो खाजगी, सरकारी, निमसरकारी किंवा कंत्राटी असो त्याला देखील होते. वैवाहिक जोडीदाराकडून देखील होते. मित्रांच्या समुहात देखील होते. अनोळखी व्यक्तींकडून देखील होते.

इथे मुख्य मुद्दा हाच आहे कि जर एखाद्या व्यक्तीला सतत मानसिक जखमा कोणी देत गेले आणि त्यावर उपचार नाही केले गेले तर त्याचे परिणाम हे तो स्वतःचा जीव घेण्यापर्यंत म्हणजे आत्महत्या करेपर्यंत होतो.

कोर्टात खोट्या केसेस दाखल करणे, कर्ज देताना गोड गोड बोलणे आणि वसूल करताना शिव्यांची लाखोली वाहने, त्याच्या घरी जावून मुलाबाळांसमोर अपमानित करणे, इमारतीतील इतर रहिवाश्यांसमोर अपमानित करणे.

मुलींना छेडणे, विनयभंग करणे, तिच्या शरीरावरून अश्लील बोलणे, विधवेला अविवाहित महिलेला, गरीब महिलेला, पाश्चिमात्य कपडे घालणाऱ्या मुली आणि स्त्रियांना, रात्री फिरणाऱ्या, धुम्रपान आणि मद्यपण करणाऱ्या मुली आणि स्त्रियांना पातळी सोडून अपमानित करणे.

मालकाकडून, वरिष्ठांकडून सतत अपमानित करणे, कंत्राटी कामगारांना नोकरासारखे वागवणे, नोकरी जावू शकते ह्यामुळे अपमानास्पद वागणूक सहन करणे असे विविध प्रकारे लोकांना सतत मानसिक जखम दिली जाते आणि देणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही, मग त्यांनी करायचे तरी काय?

त्यांचे पायल तडवी होवून जाते.

पायल तडवी प्रत्येक व्यक्तीमध्ये असते पण जेव्हा सर्व मर्यादा ओलांडल्या जातात आणि कुठूनही मदत भेटत नाही तेव्हा करायचे काय? आपले आयुष्य काय सिनेमा नाही कि ३ तासात तुम्ही तुमचे आयुष्य बदलाल, इथे जर विरोधात श्रीमंत, सत्ताधारी आणि प्रस्थापित असेल तर त्याला काहीही फरक पडत नाही फरक पडतो तो फक्त तुम्हाला.

मानसिक आजार हा दिसून येत नाही, तो आपल्या आत जखम करत जातो, आयुष्य बेरंगी करून टाकतो. त्याला न्याय भेटत नाही, त्याला समजूतदारपणा दाखवायला सांगतात आणि जो गुन्हेगार असतो त्याच्याकडे दुर्लक्ष्य करून त्याला प्रोस्ताहन दिले जाते.

शारीरिक जखम असो किंवा मानसिक ती काय जात धर्म बघून नाही होत, सर्व जाती धर्म आणि पंथांच्या व्यक्तींना मानसिक जखमा झाल्या आहे आणि त्या अनेकदा जवळच्या किंवा परिचयातील व्यक्तीकडून देण्यात आल्या आहेत म्हणजे एकाच जाती धर्माच्या व्यक्तीने स्वतःच्याच जातीधर्माच्या व्यक्तीला मानसिक जखम दिली आहे आणि त्या व्यक्तीला आत्महत्येसाठी मजबूर केले गेले.

वास्तवात रहा, जवळच्या पोलीस स्टेशन आणि कोर्टामध्ये मध्ये तुम्हाला अधिक पुराव्यासकट माहिती भेटेल. सत्य तुम्ही लपवू शकत नाही.

मानसिक दृष्ट्या कमजोर असणे गुन्हा नाही, सर्वांची मानसिकता वेगवेगळी असते त्यानुसार इतर व्यक्तींनी देखील समजूतदारपणा दाखवला पाहिजे, थोडी तडजोड केली पाहिजे.

समाज बोला किंवा व्यवस्था बोला हि काही बदलणार नाही त्यामुळे तुम्ही बदला, जर सतत मानसिक छळ होत असेल तर समुपदेशन करा व ती वेळ निभवून नेण्याचा प्रयत्न करा. तुमचे काहीही करून जिवंत राहणे हे महत्वाचे आहे.

वास्तवात रहा.

जर तुम्ही देखील अश्या कुठल्याही मानसिक जखमा झाल्या असतील किंवा होत असतील, आत्महत्येचे विचार मनात येत असतील तर तुम्ही आजच संपर्क करा.

समुपदेशन, मार्गदर्शन आणि उपचाराने खूप फायदा होता.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
Previous
Next Post »
0 आपले विचार