मोठ मोठे उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार हे उशिरा बाजारपेठेत पाय का रोवतात? कौशल्य महत्वाचे कि रणनीती?

मोठ मोठे उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार हे उशिरा बाजारपेठेत पाय का रोवतात?


कौशल्य महत्वाचे कि रणनीती?
मोठ मोठे उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार हे उशिरा बाजारपेठेत पाय का रोवतात?

कौशल्य महत्वाचे कि रणनीती?

सिंह आणि चित्ता.

दोघे हिंसक प्राणी.

दोघांची क्षमता वेगवेगळी.

सिंहाची ताकद शक्ती तर चित्त्याची ताकद वेगाने पळणे.

अनेकदा सिंह हा दबा धरून बसतो. चित्त्याला शिकार करू देतो. चित्ता जेव्हा शिकार करतो त्याच वेळेस सिंह धावून येतो व चित्ते सिंहाला बघून पळून जातात. सिंहाला आयती शिकार नाही भेटत तर हा त्याच्या रणनीती चा भाग आहे.

हि रणनीती खाजगी आयुष्यात देखील लागू होते बर का?

पुढे जाण्या अगोदर वरील कथेनुसार मोठी कंपनी कुठची आणि छोट्या कंपन्या कुठच्या हे कमेंट मध्ये सांगाल. 

(ट्रोलर्स ला ब्लॉक करण्यात येईल. मी ह्याला एक मानसिक रोग समजतो.)

आता पुढे जाऊ.

लहान मोठे उद्योजक व्यवसायिक आणि गुंतवणूकदार हे सुरवात करतात, ज्या ज्या समस्या येतात त्याचा सामना करतात, त्यामधील त्रुटी दूर करतात. म्हणजे सुरवातीला को खराब रस्ता असतो तो पूर्ण साफ करतात व फक्त डांबर टाकून हायवे बनवण्याइतपत काम करून ठेवतात.

इथे घोडं कुठे अडल?

समजा एखाद्याला एका अवयवाची प्रत्यारोपणाची गरज आहे. जे त्या व्यक्तीला तो अवयव ठराविक काळात नाही भेटला तर ती व्यक्ती दगावण्याची शक्यता असते, आणि त्या अवयवाची देखील कालमर्यादा असते ज्यामुळे जर ती कालमर्यादा पार झाली तर तो अवयव देखील निकामा होतो.

हा वरील नियम उद्योग व्यवसाय आणि गुंतवणुकीला देखील लागू होतो. एका ठराविक कालावधी मध्ये सर्व कल्पना, उस्ताह संपतो, ह्या सोबत पैसे देखील संपतात आणि कर्जबाजारी होतात ह्यामुळे कोणीही पैसे द्यायला तयार होत नाही.

भेदभाव कसा होतो ते सांगतो.

एक जर लघु उद्योजक व्यवसायिक नवीन कल्पना घेवून बाजारपेठेत उतरला तर त्या नव कल्पनेला कोणीही महत्व देत नाहीत. पहिले ते कुठच्या विद्यापीठातून शिकले आहे हे तपासले जाते. जर जग प्रसिद्ध किंवा पहिल्या क्रमांकाचे विद्यापीठ असेल तर कर्ज काय आपल्या घरातील मुलामुलींसोबत लग्न देखील लावून देतील. जर गावातून असेल तर गावठी समजून दुर्लक्ष्य करतील आणि तेच शहरातून असेल तर विश्वास ठेवतील, आणि विदेशातून असेल तर त्यांचे पाय धुवून पाणी पितील व गुंतवणुकीला दुपट्टीने पैसे देतील ते देखील कुठलीही वस्तू गहाण न ठेवता.

तुम्हाला समाजाची, समुहाची काळी बाजू माहिती नाही म्हणून सांगितले, नंतर संकटात कुणाची मदत मागायला नको, स्वतः सामना केलेला बरा. जात, धर्म, प्रांत देश कुठलाही असो इथे काळी बाजू सर्वांची एकसारखी असते.

जे मोठ मोठे उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार असतात त्यांच्याकडे तज्ञांची एक फौज असते जी सतत बाजारपेठेवर लक्ष्य ठेवून असते. मग ते मालकाला एखादा उद्योज व्यवसाय किंवा गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात जिथे लघु उद्योजक आणि व्यवसायिकाने अगोदरच काम करून ठेवलेले असते. मग सिंहासारखे मोठ मोठे उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार उतरतात आणि बाजारपेठ काबीज करतात.

म्हणजे ह्या मोठ मोठ्या आर्थिक उलाढाल करणाऱ्यांसाठी जो रस्ता सर्व सपाट करून दिला असतो तो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यवसायिकांनी जिथे तुम्हाला मोठा हायवे दिसत आहे.

प्रोस्ताहन एका बाजूला आणि वास्तव एका बाजूला. आपले आयुष्य काही सिनेमा नाही अगोदरच कथा लिहून ठेवली किंवा नंतर बदल करू शकतो म्हणून. गरीब मध्यम वर्ग आणि श्रीमंताना वेगवेगळा न्याय असतो आणि त्यांच्या यशाचा प्रवास देखील वेगवेगळा असतो. जितकी मेहनत गरीब आणि मध्यम वर्गांना करावी लागते तितकी श्रीमंतांना करावी लागत नाही.

चित्ते म्हणजे गरीब आणि मध्यम वर्ग आणि सिंह म्हणजे श्रीमंत.

आता समजलेच असेल कि बाजारपेठ कशी काम करते ते?

जेव्हा तुम्ही वास्तव बाजारपेठ बघाल तेव्हाच तुमचे कौशल्य, अनुभव आणि रणनीती कामी येईल नाहीतर व्यर्थ.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप व कॉल वर फक्त फी भरल्यावर तारीख आणि वेळ निश्चित केली जाईल व त्या दिवशी तुम्हाला अटेंड केले जाईल. कृपया समस्या सांगण्यास सुरवात करू नका, अश्या वेळेस फोन कट केला जाईल व नंबर ब्लॉक केला जाईल.

फेसबुक पेज : https://www.facebook.com/chalaudyojakghadwuya/

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत व्हास्टएप ग्रुप लिंक (आत्मविकास आणि मानसिक समस्यांसाठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

धन्यवाद

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
Previous
Next Post »
0 आपले विचार