ब्रँड च्या मायाजाल पासून लांब रहा



नव उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक ह्यांनी ब्रँड च्या जाळ्यात फसू नका.


जो तो येतो तो हे बोलतो कि आपल्या उत्पादनाचा किंवा व्यवसायाचा एक ब्रँड बनवून घ्या, ज्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल. आणि ह्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, वेळ जातो, पैसा जातो आणि मानसिक ताण येतो तो वेगळा,  इथे फक्त चार भिंतींमध्ये किंवा काही दिवस मार्केट चा अभ्यास ह्यामध्ये वेळ जातो.


साधे उदाहरण घ्या, भाकरवडी = चितळे, पहिले म्हणजे उत्पादनाचा दर्जा होता त्यावरून उद्योजक कसा आहे हे समजले आणि ते नाव स्थानिक प्रसिद्ध झाले आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत गेले. आपली भारतीय बाजारपेठच इतकी मोठी आहे कि परदेशात जायची गरज नाही, म्हणून परदेशी गुंतवणूकदार भारतात येतात.


अशी स्थानिक नावे किती सांगू? माझेच उदाहरण घ्या, चला उद्योजक घडवूया = अश्विनीकुमार, इथे माझे ध्येय मराठी समाज समृद्ध आणि शासनकर्ते बनवायचा आहे त्यामुळे चला उद्योजक घडवूया = मराठी समाज असे जगाच्या लक्ष्यात आले पाहिजे ह्या दिशेने प्रयत्न सुरु आहे. जसे ठराविक परप्रांतीय बघितले तर आपण कसे लगेच बोलतो कि हा नक्की उद्योजक व्यवसायिक असेल तसे.


भारताला, महाराष्ट्राला परदेशातून उद्योग व्यवसाय कसा करावा हे शिकायची गरज नाही, त्यांना भारतात पाठवा, आपण त्यांना विना ब्रँड चे उद्योग व्यवसाय यशस्वी करा करायचा हे शिकवू. हे मी असेच नाही बोलत तर थोडा अभ्यास केला तर तुम्हाला देखील माझे म्हणणे पटेल, आणि त्यामध्ये महाराष्ट्र हा भौगोलिकदृष्ट्या समृद्ध असल्यामुळे इथल्या लोकांना स्थलांतरित करण्याची गरज पडली नाही, हा कधी काळी प्रचंड दुष्काळ किंवा पूर आला असेल त्यामध्ये स्थलांतरित झाली असतील मराठी लोक.


विनाकारण कोणीही स्थलांतरित करत नाही, शिक्षण, उद्योग व्यवसाय, भ्रमंती आणि अनुभव ह्या कारणांसाठीबाहेर जाने ते वेगळे.


जे तुम्ही पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करत आहात त्यांनी तिथले स्थानिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व्यवसाय हे बंद पाडले आहेत व ठराविक बोटावर मोजता येणाऱ्या कंपन्यांना त्यांचे उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी प्रोस्ताहन दिले गेले आहे. म्हणून बघा जेव्हा कोणी परदेशातील अनुभव घेवून इथे उद्योग व्यवसाय करतो त्याच्या मध्ये आणि महाराष्ट्रात, भारतात अनुभव घेवून उद्योग व्यवसाय करतो ह्यामध्ये फरक जाणवतो.


परदेशातून आलेल्याला एका चित्राची गरज पडते, त्याला आपण लोगो म्हणू, त्यानंतर अतिशयोक्ती जाहिरातीची गरज पडते त्यानंतर तो ग्राहक खेचू शकतो. जो महाराष्ट्रीयन आहे स्थानिक आहे त्याचे नाव, काम आणि सर्वकाही समोरच असल्यामुळे ह्या स्थानिकाचा प्रभाव हा जास्त पडतो. परदेशी असोत तो खूप पैसा खर्च करतो आणि जो महाराष्ट्रीयन आहे तो कमी गुंतवणुकीत उद्योग व्यवसाय मोठा करतो.


जे मोठ मोठे ब्रँड आहेत ते कामगारांना नीट वागवतात का? कंत्राट पद्धतीचा ते किती गैरवापर करतात ह्याबद्दल कोण बोलणार? ज्या भारतात जे उत्पादन बनवणारे कामगार होते त्यांना कंत्राटी पद्धतीवर ठेवण्यात आले आणि १२ १२ तास आठवड्याची सुट्टी न देता काम करायला भाग पाडत आहे आणि ह्याविरुद्ध मालकाचे कंपनीचे चित्र यशस्वी म्हणून रंगवले जात आहे, त्यांच्याकडे पैसा जात आहे. नावावर जावू नका, वस्तव काय आहे ते बघण्याचा प्रयत्न करा.


जागतिक मंदी आली होती तेव्हा ह्या अतिशुक्ष्म, शुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व्यवसायांमुळेच आपली अर्थव्यवस्था हि टिकून राहिली होती ना कि कुठल्या मोठ्या ब्रँड किंवा कंपनीमुळे.


उद्योग व्यवसायाला एक पैसे कमावण्याचे मार्ग समजा, जिथे नोकरीमधून तुम्ही पन्नास हजार पगार घेत असाल तिथे तुम्ही उद्योग व्यवसाय करून एक लाख रुपये कमवाल. दुप्पट जास्त का? कारण इथे तुम्ही धोका पत्कारलेला असतो, आणि नोकरी मध्ये जे काम दिले ते करावे लागते त्यामुळे कमी पण फिक्स पगार भेटतो.


बिना ब्रँड चे कितीतरी उद्योग व्यवसाय मी दाखवू शकतो आणि बघितले आहेत. माझे म्हणणे इतकेच आहे कि जर उद्योग व्यवसाय करायचा असेल तर सुरवात करा, सर्वच काही करोडोंची गुंतवणूक करत नाहीत, त्याच्या आत देखील अनेक उद्योग व्यवसाय सुरु होतात, ५ लाख ते १ करोड चे असे कितीतरी उद्योग व्यवसाय दाखवू शकतो, आणि ५ हजार ते ५ लाखांपर्यंत देखील शेकडो हजारो उद्योग व्यवसाय सुरु आहेत. कुठे नाव दिसते? ब्रँड दिसतो? तरीही ग्राहक कसे जातात?


दिसण्यावर जावू नका. श्रीमंत शेतकरी आला होता, सफेद शर्ट खाकी पॅंट, चप्पल आणि सर्वसाधारण वापरात येणारा मोबाईल, एक स्त्री, साधा पंजाबी ड्रेस, साधा मोबाईल आणि दोघांच्या बोलण्यात ना गर्व ना काही पण उलाढाल ह्या करोडोच्या. महाराष्ट्रात फिरा, विना ब्रँड अनेक प्रसिद्ध उद्योजक व्यवसायिक भेटतील, ज्यांची उत्पादने, सेवा आणि ते स्वतः त्यांच्या परिसरात आणि क्षेत्रात प्रसिद्ध आहे.


भारतात देखील उत्पादनांवर संशोधन केले जाते, दर्जा वाढवायचा प्रयत्न केला जातो पण ते का हि अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून त्यांचे उत्पादने विकत नाहीत. नाहीतर परदेशी कंपन्या १० ची वस्तू १००० रुपयांची करून विकतात, आणि आपल्या कडे ठराविक मानसिकता परदेशी ते सर्व सोने अश्या मानसिकतेमुळे आपल्या भारतीय उत्पादनांवर नाके मुरडून बघितली जातात.


भारतातील उद्योजक व्यवसायिकाने जर हेरफार केली तरी तो पैसा हा भारतातच वापरला जाणार पण विदेशातील लोकांनी हेरफेर केली तर तो पैसा त्यांच्या त्यांच्या देशात जाणार.


किर्लोस्कर हे कधीही किर्लोस्कर चा क कसा असला पाहिजे ह्याच्या नादी लागले नव्हते, त्यांचे लक्ष्य हे फक्त उत्पादनावर होते, त्याच्या दर्ज्यावर होते, ग्राहकांवर होते.


पैसे कमावणे आणि फक्त पैसे कमावणे ह्यामध्ये फरक आहे.


काळानुसार बदलावेच लागते पण काळ काही स्थानिक उद्योजक व्यवसायिकांना मोठे करत नाही तर ते त्यांच्या स्थानिक ठिकाणी प्रसिद्धच असतात.


सांगण्याचा उद्देश इतकाच कि कृती करायला घ्या, पुढे काळानुसार आणि गरजेनुसार आपण निर्णय घेवू शकतो. ब्रँड ना चांगले आहे ना वाईट, तुम्ही ब्रँड निर्माण देखील करू शकता किंवा विना ब्रँड चा देखील उद्योग व्यवसाय करू शकता. महत्वाचे एकच आहे कि उद्योग व्यवसायाला सुरवात करणे आणि त्यामध्ये टिकून राहणे. बाकी सर्व बाबी नगण्य आहेत.


#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.


फेसबुक : https://www.facebook.com/chalaudyojakghadwuya/posts/2417228371669937?__tn__=K-R-R


चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf


मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत व्हास्टएप ग्रुप लिंक (आत्मविकास आणि मानसिक समस्यांसाठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5


धन्यवाद

अश्विनीकुमार



चला उद्योजक घडवूया



फोटो क्रेडीट : https://www.flickr.com/photos/rooreynolds/1981313654
Previous
Next Post »
0 आपले विचार