मुलांच्या शैक्षणिक खर्चामुळे कर्जाच्या बोझ्याखाली दबलेले पालक आणि संपूर्ण कुटुंब. कर्ज घेवून शिक्षण घ्यायचे कि उद्योग व्यवसाय करायचा?



मुलांच्या शैक्षणिक खर्चामुळे कर्जाच्या बोझ्याखाली दबलेले पालक आणि संपूर्ण कुटुंब
कर्ज घेवून शिक्षण घ्यायचे कि उद्योग व्यवसाय करायचा?

मुलांच्या शैक्षणिक खर्चामुळे पालक आणि पूर्ण कुटुंब हे कर्जबाजारी होत आहे. जर मुलांना शिकवायचे असेल तर त्यांना कमवा आणि शिका ह्या तत्वावर शिक्षण घेऊ द्या, जर तुम्ही कर्ज काढत असाल तर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी हि मुलांना उचलू द्या. जर मुलं मानसिक दृष्ट्या सक्षम असतील तरच ते जबाबदारी उचलू शकतील, विनाकारण त्यांच्यावर दबाव टाकू नका.

बँक काही तुमचा नातेवाईक नाही आहे, तो पैसे वसूल करणारच. तुम्ही सरळ मार्गाने जगणारे आहात आणि बँक जेव्हा कर्ज देते तेव्हा ती तिचा सभ्य चेहरा समोर आणते पण जेव्हा वसूल करते तेव्हा ती तिचा वाईट चेहरा हा आउटसोर्स च्या नावाखाली पैसे वसून करणाऱ्या कंपनीला देते जिथे तुम्हाला शिव्या एकाव्या लागू शकतात.

उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार बनायला शिक्षण चार भिंतीमधील नाही तर चार भिंतीच्या बाहेरचे लागते. इथे तुम्हाला दर्जेदार शिक्षण भेटेल. जिथे चार भिंतीमध्ये तुम्ही शाळेत जितके शिकू शकणार नाही तिथे चार भिंतीबाहेर एका क्षणात शिकाल.

ज्या परप्रांतीयांची दुकाने आहेत ती मुल शाळा देखील शिकतात व घरी आल्यास दुकानावर उद्योग, व्यवसाय कसा करावा हे देखील शिकतात. आणि मराठी घरात शिक्षण देवून बोलतात कि काम कर, कुठे हे दुकान वगैरे सांभाळतोय. ह्यासाठी पदवी उच्च पदवी घेतली का? असे बोलून दुकान भाड्याने देतात किंवा परप्रांतीयांना विकून टाकतात.

परप्रांतीयांची मुलं हि शिक्षणात नापास झाली तरी त्यांना टेन्शन नसते कारण नोकरी नसली तरी ते त्यांच्या पिढीजात दुकान, उद्योग आणि व्यवसाय करतात.

परप्रांतीयांनी शिक्षण घेतले तरी त्याचे कारण हुंडा असू शकते जिथे त्यांना पदवीचा फायदा होतो किंवा ती पदवी असली तरच ते एखादा काळानुसार नफा देणारा उद्योग व्यवसाय करू शकतात, नाहीतर ते पदवीला महत्व देत नाही.

नोकरी असो वा उद्योग व्यवसाय शेवटी तुम्हाला पैसेच कमवायचे आहे. उच्च शिक्षण घेऊन कोणी समाजसेवा करणार नाही. समजा जर डॉक्टर बनण्याचा खर्च हा २५ लाख ते करोड च्या घरात गेला तर त्या डॉक्टरांनी करायचे तरी काय?

दोष व्यवस्थेत आहे, कृत्रिम व्यवस्था निर्माण करून पैसे काढण्याचे नाही तर उकळण्याचे काम सुरु आहे.

अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि सुरक्षा ह्यासारख्या मुलभूत गरजांसाठी पैसा लागतो त्यामुळे पैश्याला महत्व द्या. तरी देखील पैश्याला महत्व देता येत नसेल तर गरीब म्हणून आयुष्य जगा, तुम्हाला समाजाची काळी बाजू निदर्शनात येईल.

शिक्षण झाल्यावर तुम्हाला लगेच नोकरी भेटेल ह्याची शाश्वती काय? जोपर्यंत कर्ज फेडत नाही तोपर्यंत तुम्ही जिथून कर्ज घेतले त्यांचे गुलामच राहणार आहात. म्हणजे शिक्षण घेताना देखील गुलाम आणि घेतल्यावर देखील गुलाम, अशी किती वर्षे तुम्ही गुलामीत काढाल? आणि जर घर दार जमीन जुमल्यावर शिक्षणाचे कर्ज घेतले असेल तर?

जिथे फायदा आहे तिथेच बँक कर्ज देते.

मग कर्ज हे उद्योग, व्यवसायासाठी का नाही घेत? जर तुम्हाला कर्जच घ्यायचे आहे तर उद्योग व्यवसायासाठी का नाही?

शैक्षणिक कर्जातून तुम्हाला पदवी भेटेल व त्यानंतर नोकरी आणि पगार. उद्योग व्यवसायातील कर्जातून तुम्हाला जी रक्कम गुंतवली त्याचा परतावा सुरु होईल.

नाही शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच तुम्हाला नोकरी लागते आणि नाही उद्योग व्यवसाय सुरु केल्या केल्या तुम्हाला फायदा व्हायला सुरवात होतो.

शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी लागण्याचा जो कालावधी असतो त्यामध्ये तुम्ही तितकी वर्षे उद्योगातील नफ्या तोट्यामुळे, अनुभव गाठीशी घेवून नफा मिळवायला सुरवात करता.

काही संस्थांमधून तुम्हाला पदवी भेटल्या भेटल्या किंवा शिकतानाच गलेगठ्ठ पगार भेटेल पण ह्या विद्यार्थ्यांची संख्या हि खूप कमी असते, सर्वसामान्य विद्यार्थ्यांची संख्या हि जास्त असते त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल बोलू. असेच काही लोक उद्योग व्यवसायात लवकर जम बसवतात पण हि अपवादाची उदाहरणे झाली, सरासरी इतक्या लवकर कोणी उद्योग व्यवसायात जम बसवून नफा कमवू शकत नाही.

आपले आर्थिक निर्णय हे आपल्या आर्थिक कुवतीनुसार आणि तुम्हाला फायदा होईल असेच घ्या ना कि महागडे शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि बँक ह्यांना फायदा पोहचवा.

जर तुम्ही अश्या समस्येमधून जात असाल तर आजच संपर्क करा, कारण एकदा पैसा गेला कि गेला आणि कर्ज चालू झाले कि व्याजासकट हफ्ते हे भरावेच लागतील. त्यानंतर मी देखील काहीही करू शकत नाही.

जो काही निर्णय घेणार तो विचारपूर्वक घ्या. त्यानंतर सर्व जबाबदारी हि तुमचीच असते. पैश्याचे सोंग कोणी घेवू शकत नाही.

कुठल्याही प्रकारच्या आर्थिक व्यवसायिक समस्येमुळे तणाव, नैराश्य अति चिंता आणि आत्महत्येचे विचार येत आहेत तर आजच संपर्क करा.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.


धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

झेप समृद्धीकडे
Previous
Next Post »
0 आपले विचार