घरगुती निर्माण होणारे ताण तणाव व त्यामुळे होणारे गंभीर गुन्हे - भाग १



पतीने दारूच्या नशेत पत्नीचा खून केला आणि कारण होते कि पत्नी मुलाची शाळेची फी भरण्यासाठी पती कडे पैसे मागत होती.

हे कारण शुल्लक वाटत आहे पण ह्यामागे स्वभाव आणि सवय देखील लपलेली आहे.

पती रिक्षाचालक आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. लग्नाला ११ वर्षे होवून गेली. पती सर्व पैसे दारूत घालवायचा. घरखर्चाला पैसे देत नव्हता. पैश्यांवरून इतकी वर्षे भांडणे होत होती.

खुनाच्या अगोदर जेव्हा पती दारू पिऊन घरी आला तेव्हा पत्नी ने मुलाच्या शाळेच्या फी साठी पैसे मागितले व ह्यावरून परत भांडण सुरु झाले. पती ला राग अनावर झाला व त्याने पत्नी चा गळा आवळून खून केला.

पतीला काही पश्चाताप नाही झाला, उलट त्याने हत्येला आत्महत्येत बदलण्याचा प्रयत्न केला, मृतदेह हा छताला लटकवून फरार झाला.

शेवटी सत्य हे बाहेर आलेच, शवविच्छेदनात मृत्यूचे खरे कारण समोर आले आणि पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पती पत्नी मध्ये भांडणे होतात व नाही देखील, असा काही नियम अहि कि लग्न झाल्यावर भांडणे हि झालीच पाहिजे, हे प्रेमाचे प्रतिक आहे वगैरे, हा शुद्ध मुर्खपणा आहे.

जर वरील घटनेतील स्त्री ने स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवत वेगळे रहायचा निर्णय घेतला असता तर तिला आयुष्याची ११ वर्षे वाया घालवावी नसती लागली.

पती ना परमेश्वर असतो, ना पत्नी लक्ष्मी आणि ना हि विवाह कायमस्वरूपी बंधन असते. हे सर्व मानसिक बंधने, आणि खोटे विश्वास असतात.

शेवटी पत्नील जीव गमवावाच लागला ना? जिवापेक्षा महत्वाचे काहीही नाही. आणि किती वर्षे भांडण करण्यात घालवायचे? मग जगायचे कधी? ह्यालाच आयुष्य बोलतात का? कोणी समाज तरी आला का जीव वाचवायला? समाजानेच कठोर नियम बनवले आहे ना?

स्त्रियांसाठी कठोर कायदे बनवले आहे पण त्याचा दुरुपयोग जास्त होतो आन ज्यांना गरज आहे अश्या स्त्रियांना न्याय देखील भेटत नाही आणि उशिरा न्याय भेटल्याचा काहीही फायदा नाही.

हे गरीब ते श्रीमंत अश्या सर्व घरात आढळून येते, एड्स सारखे विचार करू नका कि एड्स फक्त विशिष्ट वर्गांच्या लोकांना होतो असे बोलत गरीब, मध्यम वर्ग आणि श्रीमंत एकमेकांकडे बोट दाखवत बसतात.

लग्नानंतर ३ महिने ते ३ वर्ष पुरेसी आहेत निर्णय घ्यायला, आणि मुल होण्याच्या अगोदर जो निर्णय घ्यायचा तो घ्यायचा, कारण एकदा का तुम्ही मुल वाढवण्यात व्यस्त झालात तर अजून काही वर्षे भुरकन उडून जातात व समस्या हि आक्राळ विक्राळ रूप घेते.

दारू तर अनेक लोक पितात पण सर्व काही बायकोला मारत नाही किंवा खून करत नाही, जर व्यक्ती खुनशी स्वभावाची असेल तर तर ती खून करणारच.

११ वर्षे पती चा अत्याचार सहन करण्याची क्षमता होती तर मग वेगळे होवून तीच सहनशक्ती आयुष्य परत सुरु करण्यासाठी का नाही वापरली? उलट तुमच्या आयुष्याची नवीन सुरवात चांगली झाली असती.

स्त्रियांनी मानसिक गुलामीतून बाहेर पडणे गरजेचे आहे. जग तुमच्यासाठी बनलेले आहे, तुम्ही रपत सुरवात करू शकता, अश्या अनेक स्त्रिया आहे ज्यांना नवर्यानी सोडले पण त्यांनी प्रगती केली. चौकटीतून बाहेर पडा.

वैवाहिक जोडीदार फक्त पुरुष नाही तर महिला देखील स्वभावाने वाईट असू शकतात त्यामुळे तुम्ही तुमच्या परिस्थिती नुसार अदलाबदल करून लेख वाचू शकतात, नाण्याच्या दोन्ही बाजू बघत जा.

ज्या स्त्रिया अश्या किंवा इतर कुठल्याही मानसिक आणि शारीरिक त्रासातून जात आहे त्यांच्यासाठी विशेष समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध आहेत, ह्याचा फायदा घेवून स्त्रिया नकारात्मक आयुष्यातून बाहेर पडून आपले नवीन आयुष्य घडवू शकतात.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

फेसबुक पेज : https://www.facebook.com/Balak-Palak-Children-Parents-1642953812639963/

धन्यवाद
अश्विनीकुमार

बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध
Previous
Next Post »
0 आपले विचार