समुपदेशन : मानसिक, शारीरिक आरोग्यावर होणारे फायदे आणि सर्वांगीण विकासआयुष्यात अनेकदा आपण अडकतो तिथे कुठलाही मार्ग दिसत नाही, आपण दररोज एकसारखे आयुष्य जगण्यात अडकून पडतो, सतत नकारात्मक, निराशाजनक विचार मनात येतात, तणाव, नैराश्य आणि डिप्रेशन ने ग्रस्त होतो आणि हीच नकारात्मक मानसिकता नंतर विविध प्रकारची समस्या घेवून येते.

ह्या नकारात्मक मानसिकतेमुळे आपण आपल्या नकारात्मक विचारांना मनोशारीरिक आजारात रुपांतरीत करतो त्यानंतर त्या आजाराचे शारीरिक आजारात रुपांतर होते.

हे असे का होते?

कारण तुम्ही जे वैचारिक पातळीवर नकारात्मक विचार करत होता त्याचे रुपांतर तुम्ही आजारात करता पण त्या आजाराला उर्जा हि विचारातूनच मिळते. पण जेव्हा तुम्ही भावनेच्या स्तरावर आजार घेवून जाता आणि त्यानंतर पेशीस्तरावर आजार घेवून जाता तेव्हा त्या आजाराला पेशीपासून उर्जा भेटते आणि इथे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भारती होवून ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय उरत नाही.

जेव्हा कुठलाही आजार हा सुरवातीच्या पायरीवर असतो तेव्हाच त्यावर उपचार करून घेणे चांगले आहे, तुमचा कौटुंबिक डॉक्टर आरामात त्या आजारावर उपाय करून तुम्हाला बरे करून टाकतो, हे स्वस्तात होते पण जेव्हा तुम्ही नकारात्मक विचारांमुळे त्या आजाराला उर्जा देता, डॉक्टरचे औषध काम करत नाही त्यानंतर हॉस्पिटलमध्ये भरती होता तेव्हा जास्त पैसे भरून तुम्ही बरे होता.

आपल्या खाजगी आयुष्याचे देखील असेच आहे, मुलांमध्ये निर्माण झालेले नकारात्मक विचार हे पालक काढून टाकत नाही त्यामुळे शेवटी मुल हि नकारात्मक आयुष्य जगायला लागतात, त्यांचे अभ्यासत लक्ष्य लागत नाही, वाईट वळणावर जातात, पदवी पूर्ण झाली तरी नोकरी लागत नाही, आणि लग्न देखील होत नाही.

व्यवसायिक आयुष्य किंवा इतर कुठलेही आर्थिक आयुष्य किंवा जो तुमचा पैसे कमावण्याचा मार्ग आहे तो, ह्या आर्थिक आयुष्यात देखील समुपदेशन हे खूप कामी येते, उद्योजक व्यवसायिकाला नैराश्यातून बाहेर काढते, त्याला नवसंजीवनी देते, आर्थिक घडी सुधरू लागते, ग्राहक यायला लागतात आणि उद्योग व्यवसाय परत भरभराटीला येतो. अनेकांच्या संपत्तीच्या समस्या, कर्ज, आणि इतर समस्या ह्या दूर होतात व ते भरभराटीच्या, श्रीमंती आणि समृद्धी च्या मार्गाला लागतात.

वैवाहिक जीवनाच्या समस्या सुटतात, जोडीदारासोबत नातेसंबंध सुधारते, कौटुंबिक, सासरी, माहेरी अश्या सर्व समस्या दूर होवून नातेसंबंध प्रस्थापित होतात. दररोजची भांडणे कमी होतात, निर्णय घेण्याची क्षमता वाढते, नकारात्मक वैवाहिक आयुष्यातून बाहेर पडण्याची हिंमत येते, एक नाही अश्या अनेक समस्या सुटतात.

लैंगिक समस्या दूर होतात, जोडीदारासोबतचे संबंध सुधारतात, आत्मविश्वास वाढतो, लोकांमध्ये प्रभाव पडायला सुरवात होते आणि हे सर्व होते फक्त ते समुपदेशनामुळे.

भीती फोबियावर मात करता येते. आत्मविश्वास वाढतो. चार चौघात मिसळून राहण्याची हिम्मत आणि विश्वास वाढतो. लक्ष्य केंद्रित होते, नकारात्मक विचार आणि भावनांवर ताबा मिळवता येतो. राग, मस्तर द्वेष लोभ अश्या नकारात्मक भावनांवर ताबा मिळवता येतो. लैंगिक समस्या दूर होतात.

समुपदेशनात नक्की होते तरी काय? लोकांना बोलते केले जाते, त्यांच्या भावना ह्या बाहेर काढल्या जातात, समस्येचे मूळ पकडले जाते व त्यानुसार सल्ला दिला जातो, मार्गदर्शन केले जाते आणि गरज पडली तरच उपचार केले जातात.

मी जेव्हा समुपदेशन करतो तेव्हा त्यांचा को मूळ स्वभाव आहे तो त्यांना दाखवायला सांगतो आणि आश्चर्य म्हणजे लोक त्यांचा मूळ स्वभाव दाखवून देतात आणि मूळ भावना देखील व्यक्त करतात. ह्याच मूळ स्वभावामध्ये सर्वकाही दडले आहे. कारण हा कुठल्याही मनुष्य प्राण्याने निर्माण केलेल्या कायदे व नियमांना जुमानत नाही, ह्यावर ताबा ठेवू शकतो पण हा मूळ स्वभाव बाहेर येतोच. आणि एकदा हा व्यक्त झाला कि अनेक समस्या ह्या टाळल्या जातात.

माझ्याकडे भेदभाव केला जात नाही. गरीब असो किंवा श्रीमंत ह्या सर्वांना एकसाखीच वागणूक मिळते, हो फक्त फी मध्ये तफावत असू शकते पण समुपदेशनात नाही. निसर्ग भेदभाव करत नाही, देव भेदभाव करत नाही तसे मी देखील करत नाही.

आता इंटरनेट मुळे समुपदेशन करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झाले आहे, तुम्ही त्या मार्गांचा वापर करून तुमच्या समस्या लगेच सोडवून घेवू शकता, ह्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. व्हास्टएप, फेसबुक फोन ह्या सर्व मार्गांचा वापर तुम्ही करू शकता.

जर तुम्ही देखील समस्यांनी ग्रस्त असाल तर आजच संपर्क करा.

फेसबुक :

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

Image by mohamed Hassan from Pixabay
Previous
Next Post »
1 आपले विचार
avatar

WhatsApp group join hot nahiye karan to full zala aahe. Krupaya dusari link share kara

Balas