पिंक हा सिनेमा समाजातील जळजळीत वास्तवावर प्रकाश टाकतो.



पिंक हा सिनेमा समाजातील जळजळीत वास्तवावर प्रकाश टाकतो. पहिली बाजू नामर्दांची पुरुष प्रधान संस्कृती, ज्यांचे बाहेर काही चालत नाही अशे आपल्या घरातील, शेजारील व समाजातील इतर स्त्रियांवर बंधने घालून देतो आणि हे हजारो वर्षांपासून चालू होते आणि आजही विकसनशील देशात हे चालू आहे.
दुसरी बाजू जात, धर्म, भाषा आणि प्रांत काहीही असो पोलीस, न्यायव्यवस्था कसे वागते हे जळजळीत सत्य देखील मांडले आहे मग तिथे सामान्य स्त्री असो किंवा पुरुष त्यांच्याशी पोलीस कसे वागतात, श्रीमंत, सत्ताधारी आणि ताकदवर लोकांसाठी कसे जलदगतीने काम केले जाते, आणि कसे त्यांच्यासाठी अतिशय मेहनतीने कायद्याच्या प्रत्येक कलमाचा वापर केला जातो हे उत्तम रित्या मांडले आहे.
समाजामध्ये काळी बाजू नेहमीच झाकून ठेवली जाते, का ते कारण अजून समजले नाही. सूर्यासमोर डोळे बंद केले तर रात्र होत नाही आणि सामान्य लोकांना लख्ख प्रकाशात दिसणारे सत्य बघवत नसते.
कितीही काहीही केले तरी तुम्हाला ह्याच वास्तवात रहायचे आहे, एकतर परिस्थितीनुसार बदला किंवा परिस्थिती तुम्हाला बदलेल.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार