रेंट ए मोजो हि सेवा पुरवणारी कंपनी ग्राहकांना घरचे फर्निचर भाड्याने देते. खाजगी सरकारी कर्मचारी ज्यांच्यामध्ये उच्च पदावर काम करणाऱ्यांची संख्या जास्त असते आणि त्याचा पगारही जास्त असतो आणि ज्यांची सतत कामानिमित्त देश किंवा विदेशात बदली होवून इथे येतात त्या ग्राहकांसाठी हि सेवा सुरु केली आहे.
सुरवातील त्यांनी फक्त मोठ्या शहरांसाठी हि सेवा सुरु केली आहे. कारण हा ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात फक्त मेट्रो शहरांमध्येच सापडतो. हे ग्राहक जास्तीत जास्त काळानुसार बदलणारे असतात, त्यांना इंटरनेटचे उत्तम ज्ञान असते आणि कामाचा ताण इतका असतो कि त्यांना बाहेर जावून एखाद दुसरे सामान घेणे ह्यासाठी वेळच नसतो. ह्यांचे ग्राहक कार्यालय, इव्हेंट करणाऱ्या कंपन्या अशे व्यावसायिक देखील आहेत.
हा ग्राहक वर्ग जास्ती जास्त सेवा ह्या इंटरनेट च्या माध्यमातून शोधत असतो कारण ह्याच्यासाठी वेळ म्हणजे पैसा असतो. हा ग्राहक वर्ग त्याला जितके सोयीस्कर होईल अश्या नवीन आणि जुन्या व्यवसायांकडे आपोआप आकर्षित होतो.
ह्या कंपनीने बीज भांडवल एका युके (इग्लंड) येथील एका गुंतवणुकदाराकडून घेतले. सध्या त्यांनी १३ करोड रुपये हे आयडीजी वेंचर इंडिया आणि एसेल इंडिकेटिंग वेंचर केपिटल इव्हेस्टर ह्या गुंतवणुकदारांकडून घेतली आहे.
जुने व्यवसायही चालू आहेत आणि नव नवीन कल्पनानाही वाव आहे. फक्त करणारा पाहिजे. आहे हिम्मत तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवायची? आणि हो तुमच्या अगोदरपासून मराठी माणूस उद्योग व्यवसाय करत आहे आणि करोडोंची गुंतवणूक देखील करत आहे.
धन्यवाद,
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार