तुम्हाला माहित आहे का कि आपली नाश्ता करायची पद्धत बदलली आहे म्हणून?

तुम्हाला माहित आहे का कि आपली नाश्ता करायची पद्धत बदलली आहे म्हणून?
भाजी, भाकरी, चपाती, पोहे, उपमा आणि इतर पदार्थ जे आपण नाश्त्यासाठी वापरायचो त्यांची जागा आता ब्रेड, बटर, मेगी सारखे नुडल्स, पास्ता अश्या अश्या विदेशी किंवा जे आपल्या वातावरणात शरीराला लागणार नाहीत अश्या डबाबंद पदार्थांनी घेतलेली आहेत?
तुम्ही कधी विचार केला आहे का कि आपण भारतासारख्या शेतीप्रधान देशात राहतो जिथे आरामात ताजा भारतीय नाश्ता दुकानात, हातगाडीवर किंवा घरपोच भेटू शकतो?
पिझ्झा वाले जर ३० मिनटात पिझ्झाची डिलिव्हरी देतात मग आपण का नाही देवू शकत? आपणच त्यांची फ्रेंचायझी चालवतो ना?
वडापाव खाताना मराठीत बोलतो आणि मॅकडोनाल्ड मधला बर्गर खाताना इंग्लिश शब्द कसे बाहेर पडतात? काय फरक आहे दोघांत?
आपला कमी आत्मविश्वास, नैतृत्व क्षमतेचा अभाव, गुलामगिरीची ची मानसिकता, आपापसात जात, धर्म, प्रांत, भाषा इतर विविध फालतू विषयांवरची भांडणे ह्यामध्ये इतके गुंतले होते कि परदेशी कंपन्यांनी ह्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि आपले पाय पसरवले. इंग्रजांनी आपल्यामध्ये फुट पडली नव्हती, आपणच अगोदरपासून फुटलेलो होतो.
परदेशी कंपन्यांनी धंदा करायला कधीच विरोध करायचा नाही कारण आपल्या कंपन्याही त्यांच्या इथे धंदा करतात, उद्या कदाचित तुमची कंपनीही वाढून तुम्हीहि त्यांच्या देशात पैसा गुंतवाल. स्पर्धेत उतरल्याशिवाय कोणीच प्रगती करू शकत नाही.
कोण बोलतो संधी नव्हत्या म्हणून? हार्ले डेव्हिडसन, बेंटली ५,००,००० ते ४०,००,००० लाखांपर्यंतच्या दुचाकी भारतात येवून विकल्याही जात आहेत, मग त्यावेळेस आपण काय करत होतो? होता का कुठला आपला ब्रँड?
आपण स्पर्धेतच नव्हतो कधीच हे कधी मान्य करणार?
साध उदाहरण घ्या, जो आत्मविश्वास आयफोन दाखवताना दाखवतो, जो आत्मविश्वास रोलेक्स घडी दाखवताना दाखवतो तो कधी भारतीय उत्पादन दाखवतांना दाखवतो का?
स्वतःचे आत्मपरीक्षण करा उत्तर आपोआप भेटेल. आजचा मराठी युवक आणि युवतीला लाचारीचे जगणे मान्य नाही, ना हि दुसर्याच्या हाताखाली नोकरी करत जगणे, त्यामुळे आजच्या तरुण पिढीमध्ये नैतृत्व क्षमता दिसून येते आणि हेच तरून मग मुलगा असो वा मुलगी धाडसाने पाउल उचलताना नैतृत्व करताना दिसून येतात.
धन्यवाद,
चला उद्योजक घडवूया
अश्विनीकुमार फुलझेले
Previous
Next Post »
0 आपले विचार