आपल्या अंतर्मनातील तीन प्राण्यांची कथा



एक चित्रकार असतो, त्याला देवाचे चित्र बनवायचे असते. तो त्याच्या मित्राला विचारतो “मला एक परमेश्वराचे चित्र बनवायचे आहे, मी काय करू?”. त्याचा मित्र उत्तर देतो “एक ५ किंवा ६ वर्षांचा गोड मुलगा घे आणि त्याचे चित्र बनव.” चित्रकार ऐकतो आणि चित्र बनवायला घेतो आणि एक सुंदर चित्र बनवतो, ते चित्र खूप किमतीला विकले जाते. २० वर्षांनंतर पुन्हा त्याची इच्छा एका राक्षसाचे चित्र बनवायची इच्छा होते. तो त्याच्या मित्राल पुन्हा विचारतो, मित्र बोलतो कि “तू जेल मध्ये जा, तिथे तुला ज्यांनी गुन्हे केलेले आहे, खून, बलात्कार, चोरी, दंगली घडविलेले आहेत अश्या आरोपीला निवड आणि त्याचे चित्र बनव.” तो परवानगी घेवून जेल मध्ये जातो आणि तिथे दाढी, केस वाढलेला भयंकर दिसणारा, डोळे लाल असणारा असा आरोपी निवडतो आणि त्याला समोर बसवतो. त्याला समोर बसवून त्याचे चित्र बनवत असताना त्या गुन्हेगाराकडे पाहतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून घळा घळा अश्रू वाहत असतात. चित्रकाराला आश्चर्य वाटते, हा इतका मोठा गुन्हेगार आणि तो रडत का आहे?, तो चित्रकार त्याला कुतुहलाने विचारतो “मी तुमचे चित्र बनवत आहे. तूमच्या डोळ्यातून अश्रू का वाहत आहे?” तो गुन्हेगार जे चित्रकाराला सांगतो ते आत्मपरीक्षण करण्यासारखे आहे, चित्रकार महोदय २० वर्षांपूर्वी ज्या मुलाचे तुम्ही परमेश्वराचे चित्र बनवले होते तो मीच आहे. ह्या २० वर्षांमध्ये माझ्यातला देव हळू हळू मरत गेला आणि राक्षस हळू हळू मोठा होत गेला.
बोध:- आपल्या आतमध्ये ३ प्राणी दडलेले असतात, त्यापैकी २ प्राणी दररोज प्रत्येक क्षणाला देव – दानव, चांगले – वाईट, पाप पुण्याची अशी विविध रूपे घेवून लढत असतात, दोघांनाही आपणच पोसत असतो, दोघांनाही आपणच खायला घालत असतो. आपल्याला प्रत्येक क्षणाला ठरवायचे असते कि कुणाला खायला घालायचे कुणाला नाही. तिसरा हा निसर्ग निर्मित प्राणी असतो, त्यामध्ये अफाट क्षमता असते, तो जागृत करायचा असेल तर ह्या दोन प्राण्यांना खायला घालणे बंद करावे लागेल. ह्याच प्राण्याला अंतर्मन, देव, निसर्ग आकर्षणाचा सिद्धांत असे बोलतो, अमर्याद.
अश्विनीकुमार फुलझेले
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार