गॉड नॉट डेड God's Not Deadगॉड नॉट डेड हा हॉलीवूड सिनेमा २०१६ साली प्रदर्शित झाला, ह्यामध्ये पश्चिमेकडील शिक्षक कसे शिकवतात ह अधोरेखित केले आहे. एक क्षण सिनेमामधला असा होता जिथे शिक्षिका संदर्भाविना उदाहरण देते ज्यामुळे ते छोटेसे प्रकरण न्यायालयापर्यंत जाते.
तुम्ही विचार करा कि ज्यांच्या संपर्कात तुम्ही आहात किंवा ज्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेता ते खरच संदर्भ देवून सांगतात कि तुम्ही संशोधन न करता आहे तसे मान्य करता? जिज्ञासू आणि चीकीस्तक वृत्तीच समृद्ध आयुष्य देते.
जर नसेल तर तुम्ही तणावाचे आयुष्य जगत आहात आणि हेच जर तुम्ही तुमच्या मुलांपर्यंत संस्कार देत नेले तर त्यांचे आयुष्य लहानपणापासून तणावात जाण्याची संभावना आहे, व पुढील आयुष्य फक्त ते गुलामांसारखे काही न प्रश्न करता जगतील मग ते उच्च पदावर असो, किंवा कुठेवी नोकरी करत जगत असतो.
ह्यावर उपाय एकच नेहमी चीकीस्तक जिज्ञासू वृत्ती ठेवा. मुक्त मनाने जगा, तश्याच लोकांसोबत नातेसंबंध ठेवा. विना संदर्भ कुठल्याही ऐकलेले, लिहिलेले ह्यावर विश्वास ठेवू नका. मुलांनाही हेच संस्कार द्या. मी तुम्हाला बोललो कि २० व्या मजल्यावरून विना पेरेशुट ने उडी टाका तर तुम्ही इतके शहाणे आहात कि तुम्ही उडी नाही टाकणार ह्यालाच म्हणतात जगण्याचा सिद्धांत जो निर्सगाने निर्माण केलेल्या सर्व प्राण्यांमध्ये आहे, त्यामध्ये मनुष्य प्राणी देखील आलाच.
अश्विनीकुमार फुलझेले
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार