मसाला मराठी सिनेमारहावले नाही म्हणून लगेचच सिनेमा शेअर करावासा वाटला. जो सिनेमा ऑस्कर ला जायला पाहिजे होता किंवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये जायला पाहिजे होता त्या २०१२ च्या दर्जेदार मराठी सिनेमाविषयी मला २०१६ मध्ये समजले आणि जेव्हा सिनेमा बघत होतो तेव्हा कलाकारांचा कलेचा दर्जा जाणवला तो अप्रतिम होता. जर तुम्हाला कमर्शियल सिनेमे आवडत असतील तर अशे फक्त आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोस्तवात दाखवले जाणारे सिनेमे तुम्हाला रुचणार नाही, अर्थात ज्याची त्याची आवड.
ज्याला खरच उद्योग धंदा करायचा आहे, ज्याला आयुष्य कसे असते हे बघायचे आहे, ज्याला जगण्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल त्यांनी हा सिनेमा जरूर बघावा.
उद्योजक बनणे हे फक्त कारखाना किंवा व्यवसाय सुरु करून त्यामधून नफा काढत बसने नसून सर्वांगीण व्यक्तिमत्व विकसित करून सतत काळानुसार बदलत, धाडस दाखवत जगणे होय.
व्यावसायिक, उद्योजकीय मनोवृत्तीचा, कमर्शियल सिनेमापेक्षा वास्तविक मराठी मनोवृत्तीच्या जगण्याची धडपड, महाराष्ट्रभर प्रवास, समजून घेण्यासाठी बघा.
http://www.hotstar.com/movies/masala/1000014536/watch

चला उद्योजक घडवूया
अश्विनुकुमार फुलझेले
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार