पदवीधर चायवाला
लखनऊ मध्ये राम मनोहर लोहिया हॉस्पिटल च्या बाहेर एक चाय वाला आहे आणि त्याच्या दुकानाचे नाव असे आहे कि सर्वांचे लक्ष्य वेधून घेते. हे चाय चे दुकान आहे गोविंद आणि त्याच्या ३ भावांचे, ह्यांचे सरासरी वय हे २० ते २५ च्या दरम्यान आहे. दुकानाचे नाव आहे ग्रज्युएट चाय वाला.
पदवी घेतल्यानंतर भावांमध्ये सगळ्यात मोठ्या गोविंद ने एका कॉल सेंटर मध्ये नोकरी करायला सुरवात केली, पण मनासारखा पगार आणि समाधान न झाल्यामुळे त्याने ती नोकरी सोडून दिली. अनेक वर्षांपूर्वी वडील सतीश चंद्रा ह्यांची नोकरी गेली होती व ते कोर्ट कचेर्यांमध्ये अडकले होते.
“पदवीची जास्त काही मदत नाही होत. चांगल्या पदाच्या कामासाठी तुम्हाला इंग्लिश येणे गरजेचे आहे ह्यासाठी आमची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी नव्हती” असे गोविंद सांगत होता.
ह्या चाय च्या दुकानामधून आम्ही माल, व्यवस्थापन आणि कामकाजाचा खर्च वजा करून आम्ही दिवसाला ३५० ते ४०० रुपये निव्वळ नफा कमावतो, हि कमाई कॉल सेंटर च्या नोकरीपेक्षा जास्त होती. गोविंद सांगतो कि “कॉल सेंटर मध्ये मला फक्त ५००० पगार भेटत होता, कामाचा ताणही खूप होता आणि पगार हा वेळेवर भेटत नव्हता.”
जेव्हा त्याची भावंड गोपाल वय २३ आणि माधव वय २१ हे एएसबीडी मेमोरियल कोलेज हरदोई मधून ह्याच वर्षी पास झेल तेव्हा त्यांना नोकरीचा आणि आर्थिक परिस्थिती चा सारखाच अनुभव आला. “मी त्यांना चाय च्या दुकानाची कल्पना सांगितली, सुरवातीला ते नाखूष होते, मी कसे तरी त्यांना राजी केले, आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही वाईट कल्पना नाही आहे.” गोविंद म्हणाला.
ग्रज्युएट दुकानाचे नाव हे दर्शवते कि हि पदवीधर भावंडे आणि त्यांची कल्पना सुष्म-लघु व्यवसायामध्ये काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न करत आहेत, आणि पुढील एका मोठ्या व्यवसायाची पायाभरणी करत आहे, ह्यासोबत त्यांनी चांगली नोकरी न भेटण्याची निराशा अशी दूर केली.
हि तरून नवशिक्षित पदवीधर भावंड मिळून दुकान चालवतात. जेव्हा आमच्याकडे पुरेसा पैसा येईल तेव्हा आम्ही अजून शहरभर चाय च्या दुकानांची शृंखला सुरु करू, सकारत्मक गोविंद सांगत होता.
अनेक वर्षांपूर्वी गुजरात मध्ये एका अति सामान्य घरातील तरून रेल्वे वर चाय विकत होता त्यावेळेस तोही अशीच सकारात्मक मोठी स्वप्न बघत होता. नरेंद्र मोदि हे आपल्या भारताचे आज पंतप्रधान आहेत, त्याअगोदर त्यांनी ३ वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री पद भूषवले. काळच सांगेन कि हा ग्रज्युएट चाय वाला यशाचे किती शिखर गाठेल ते.
चला उद्योजक घडवूया
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार