इन्फोसिस सोफ्टवेअर कोडर ते पाणीपुरी विकण्या पर्यंतचा प्रशांत कुलकर्णीचा प्रवास


प्रशांत कुलकर्णी हा जेव्हा इन्फोसिस मध्ये काम करत होते तेव्हा त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात पाणीपुरी खाल्ली आणि फूड पोईजन होवून आजारी पडला, ह्यामुळे त्याला अनेक महिने त्याचे आवडते आणि अनेक लोकांचे आवडते खाद्यपदार्थ पाणीपुरी ह्यापासून वंचित रहावे लागले.
ह्या घटनेने त्याचे आयुष्य बदलले, माहिती काढायला सुरवात केली, संशोधन केले तेव्हा त्यांना ह्या संपूर्ण भारतदेशातील पाणीपुरी खाद्यपदार्थाच्या व्यवसायामध्ये एकही ब्रँड आढळून नाही आला. इथेच त्यांनी भारतातील पहिले गपागप पाणीपुरी खाद्यपदार्थाचे ब्रँड सुरु केले.
प्रशांत कुलकर्णीला जाणीव होती कि नोकरी सोबत स्वतःचे विश्व उभे करणे काही सोपे नाही आहे. प्रशांतकडे करोडोची कल्पना होती. त्याचे व्यवसायिक साथीदार आरती शिरसाट आणि पल्लवी कुलकर्णी सोबत तो गपागप ब्रँड आणि इतर खाद्यपदार्थ जसे ८० प्रकारच्या भेळ, २७ प्रकारचे चाट, पोहे इत्यादींचे व्यवस्थापन करतो.
त्याने बिग बाझार शॉप सोबत करार केला आहे ज्यामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान मध्ये फ्रेन्चायझी सुरु झाली आहे. त्याच्या महत्वाकांक्षेबद्दल विचारले असता प्रशांत बोलला “आमचा स्वप्न बघणार्यांचा समूह आहे, आम्हाला चटरपटर ब्रँड हा आंतरराष्ट्रीय स्तरावर घेवून जायचा आहे. भारतीय बाजारपेठेत पाय पसरल्यानंतर आम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाय पसरायला आवडेल.” त्याला आतापासूनच लंडन, ऑस्ट्रेलिया मधून फोन आले आहेत.
जलद सेवा रेस्टॉरंट हा प्रकार भारतामध्ये जलद गतीने वाढत आहे. २०११ मध्ये ह्याची बाजारपेठ हि १३६ करोडची होती, ३५ टक्क्यांनी वाढत ती २०१५ मध्ये ४५० करोड पर्त्य्न जावून पोहचली. ह्याचे मुख्य कारण हे जोडप्यांची जीवन जगण्याची शैली बदलली आहे आणि सोबत खर्च करण्याची क्षमता वाढलेली आहे म्हणू ह्या व्यवसायामध्ये भरभराट दिसून येत आहे.
प्रशांतचा ऑटोमोबाईल ला ट्यूब बनवून द्यायचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. एम बी ए झाल्यावर प्रशांत जेव्हा चटर पटर हि संकल्पना सुरु करायचा विचार करत होता तेव्हा त्याच्या जवळील व्यक्तींना तो वेडा झाला आहे असे वाटत होते, ह्या सगळ्या परिस्थितीवर मात करत यशस्वी पणे त्याचा व्यवसाय सुरु आहे.
शांतपणे सगळी परिस्थिती सांभाळत त्याने आतापर्यंत १५,००,००० (एक लाख पन्नास हजार) लाखांच्यावर पाणीपुरी विकल्या आहेत.
जर तुम्हाला पुढच्या वेळेस स्वच्छ आणि चांगल्या पदार्थांनी बनवलेली पाणीपुरी खायची असेल तेही आजारी न पडता तर चटर पटर ला नक्की भेट द्याल.
फ्रेंचायझी साठी खालील लिंक वर संपर्क करा
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार