जे दर्जेदार आयुष्य अगोदर संपूर्ण जगात जगले जात होते त्याचा दर्जा घसरत चालला आहे किंवा अतिशय खालच्या पातळीवर आहे.

जे दर्जेदार आयुष्य अगोदर संपूर्ण जगात जगले जात होते त्याचा दर्जा घसरत चालला आहे किंवा अतिशय खालच्या पातळीवर आहे.
मनुष्य हा सकाळी कामाला बरोबर वेळेत जातो पण येण्याची वेळ निश्चित नाही.
पगार वाढतो त्यापेक्षा दुप्पट महागाई वाढत जाते.
कंपनी इतके काम करून घेते कि तो ४० व्या वर्षी निवृत्त जरी झाला तरी तो त्याचे आयुष्य सुख समाधानाने जगू शकत नाही इतकी मानसिक उर्जा त्याची किंवा तिची संपवली जाते.
लहान मोठे उद्योग तीतके सुपर मार्केट मुळे नाही संपले जितके ओनलाईन मार्केट मुळे संपले.
म्हातारे आई वडील हे घर काम करण्यासाठी वापरू लागले कारण खर्च परवडत नाही कामवाली किंवा घर सांभाळणारी बाई चा.
लहान मुल हि खेळाची मैदाने विसरून घरी मोबाईल आणि इंटरनेट अश्या काल्पनिक विश्वात रममाण होऊ लागलीत.
कौटुंबिक, मैत्री आणि शेजाऱ्यासोबत नाते कमी होऊ लागलेत.
कार्यालयातील नातेसंबधांना मजबुती येवू लागली आहे ती देखील कामापुरती.
घर, समाज आणि सार्वजनिक ठिकाणी माणसांची गर्दी असूनही एकटे असल्यासारखे वाटत आहे.
उत्पादनांचे तंत्रज्ञान हे प्रगत होत चालले आहे, सतत च्या नवीन बदलांमुळे आणि मर्यादित ग्राहकांमुळे आहे ते उत्पादन त्यांनी विकून त्यांचेच नव तंत्रज्ञानाने सज्ज उत्पादन घ्यायला ग्राहकांना भाग पाडले जात आहे.
उदाहरणार्थ जर तुम्ही एका कंपनीचे सीम वापरत असाल तरी ते तुम्हाला इतर अनेक सवलतींच्या जाहिरातींचा मारा करतील किंवा एखाद दुसरी स्कीम तुम्हाला न विचारता सुरु करून तुमच्याकडून पैसे काढून घेतील.
म्हणजे तुम्ही नुसते ग्राहक असून ते समाधानी नाही तर तुमच्या मेहनतीच्या कमाईचा एक एक पैसा पण काढायला कमी करणार नाही आणि त्यांची वृत्ती देखील अशी कि तुम्हाला खायला पैसे नसतील तरी चालेल पण आम्हाला पैसे द्या.
वस्तूंच्या किमंती इतक्या भरमसाठ वाढवून ठेवल्या आणि आपल्या कंपनीतल्या सेल्स डीपार्टमेंट ला टार्गेट देतात कि आम्हाला गिर्हाईक आणून द्या आणि नाही आणले तर नोकरी सोडा. आता घरांच्या किमती इतक्या वाढवून ठेवल्या आहेत कि हे कुणालाच शक्य होत नाही, मग पर्याय एकच दुसरी नोकरी शोधा.
आपली लहान मुल हि शेजार्यांच्या घरात वाढायची, आता प्रत्येक जन दरवाजा बंद करून आप आपल्या घरी राहतोय. इथे जाती धर्माचा प्रश्न नाही आहे हे स्वजाती सोबतही घडत आहे.
बातमी देणाऱ्या वाहिन्यांच्या आहारी इतके गेलो आहे कि ते जे बोलतील ते खरे असे मानत बसतो. दोन जणांच्या संवादाची जागा हि वाद विवादाने घेतली आहे. बातमीदार सरळ सरळ विद्वेषाची भाषा वापरत आहे ज्यामुळे घरा घरात वाद निर्माण होऊ लागले आहेत कारण नकारात्मकता अगोदर त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला संपवते.
हे आजचे वास्तव आहे. ह्जारातून एक सकारात्मक मी माणू शकतो पण लाखांतून एक सकारात्मक हि अतिशयोक्ती होते कारण कधीही ती नकारात्मकता तुमच्या आयुष्यात येवू शकते.
ह्याला पर्याय एकच आत्मविकास तेही वास्तव जगाला धरून. सतत आत्मविकास करणारा मनुष्य हा परिस्थिती आपल्या ताब्यात ठेवतो, जो कमजोर नकारात्मक मानसिकतेचा असतो त्याला किंवा तिला परिस्थिती स्वतःच्या ताब्यात ठेवते.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार