FDI आणि आपण “जो परिस्थितीनुसार बदलेल तोच टिकेल”




जेव्हा 90 साली थेट परकीय गुंतवणूक (FDI) साठी प्रयत्न चालू होते तेव्हा भारतीय लोक त्याला विरोध करत होते. राज्यकर्ते (राजकारणी, उद्योजक, धार्मिक गुरु) मग ते जगामध्ये कुठल्याही देशाचे असू देत ते एक सुंदर पर्याय निवडतात "फोडा आणि राज्य करा" तेच आपल्या इथे वापरले गेले. लोकांनी स्वतःहून फूट पडून घेतली आणि अनेक वर्ष त्यामध्ये गुंग राहिले तोपर्यंत खाजगी कंपन्यांनी इथे आपले बस्तान बसवले पण.

हा काळ अक्षरक्ष रॉकेट च्या गतीने प्रगती करण्याचा होता आणि ती अनेक लोकांची झाली पण, त्यापैकी काही असे होते ज्यांना आपोआप फायदा मिळत गेला. सरकारी नोकऱ्या हळू हळू बंद करत गेले आणि आता अशी वेळ आली की तात्पुरते कर्मचारी हे मोठ्या संख्येने वाढले, जागा निघाली तरी खूपच कमी ज्यासाठी हजारोंच्या (काही ठिकाणी लाखोंच्या) घरात अर्ज येतात. ह्यामध्ये जे धाडसी होते त्यांनी खाजगी नोकरीमधून प्रगती केली. ती वेळ निभावून नेऊन आता उच्चं पदावर पोहचले आहेत.

काही केले तरी बाजारपेठ तर आता मुक्त झालीच आहे तर का नको त्याच्या नुसार चालावे? निसर्गाचा नियम आहे "ताकदवर जीव जगत नाही, जो बदलानुसार आपल्या मध्ये बदल घडवतो तो जीव जगतो" नाही तर डायनासोर आता जिवंत असले असते आणि झुरळ हे कधीच संपून गेले असते. FDI जर आलेच आहे तर का नाही स्पर्धेला सामोरे जायचे? आज ना उद्या हे होणारच आहे कारण सामान्य लोक एकत्र येऊ शकत नाही, त्यांची संख्या अब्जोच्या घरात आहे, मुठ्ठी भर सत्ताधीश एकत्र येऊ शकतात आरामात कारण त्यांचंही संख्या 500 च्या घरात आहे.

आपण हत्ती आहोत आणि ते आपले माहूत आहे त्यामुळे आपण त्यांच्या ताब्यात आहोत. एक माहूत इतक्या मोठ्या हत्तीसारख्या प्राण्याला आपल्या ताब्यात ठेवतो. असे जगातील काही मुठ्ठीभर श्रीमंत लोक कायदा, पोलीस आणि सैन्य ह्या अंकुशच्या मार्फत अब्जो लोकांना आपल्या ताब्यात ठेवतात.

जर आपल्यासमोर कोणी ताकदवर उभा असला तर त्याच्याशी मैत्री करायची की वैर? ह्यासाठी कुठच्या तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेण्याची गरज तर नाही ना? इतका तरी तुम्ही विचार करू शकता ना? मग ह्याला पर्याय काय? एक्दम सोपा पर्याय आहे, जो मार्ग ह्यांनी निर्माण केला आहे त्या मार्गाने चालत जाऊन आपला फायदा करून घेणे हेच होय.

जग काय बोलत ह्या कडे लक्ष्य देत बसाल तर उभ्या आयुष्यात पुढे नाही जाणार. जे आपल्या मनाला वाटेल तेच कराल. सल्ला पण तज्ज्ञ लोकांचा घेतलेला बरा. कारण जग म्हणजे सामान्य लोक, जे एक यांत्रिक मानवासारखे प्रोग्राम केल्यासारखे तोच तोच विचार आणि कृती करत राहतात, ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई च्या लोकल मधील गोष्टी ऐकल्यावर समजेल.

काही कठीण नाही, पण नुसता तोच तोच विचार करत बसलात तर ते अजून कठीण होऊन जाईल. आणि त्यामुळे नकारात्मकता वाढत जाईल. कुठल्याही परिस्थितीचे विरोध किंवा समर्थन करत बसू नका, समजून घ्या व स्वाभिमानाने जगता येईल अश्या तर्हेने स्वतःमध्ये बदल करून उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार ताठ मानेने जगा.
मी इथे पुढे जात नाही कारण प्रत्येक माणूस हा स्वभावाने, परिस्थितीने आणि विविध कारणांनी वेगळा असतो आणि मी माझा दृष्टिकोन त्यांच्यावर थोपवलेला मला आवडणार नाही. तुमचा दृष्टिकोन म्हणजे तुमचे अंतर्मन जे जन्मजात असते आणि जे कोणीच बदलू शकत नाही आणि माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही आहात तसे परिपूर्ण आहात.

मला विनाकारण लोकांना भ्रमात ठेवायला आवडत नाही, जे सत्य आहे तेच मांडतो. सत्य ते सत्यच असत कुणाला पटो किंवा न पटो. सूर्य हा पूर्वेकडूनच उगवणार, शत्रू-मित्र, चांगला किंवा वाईट हे श्वास घेताना ऑक्सिजनच वापरणार, निसर्ग भेदभाव करत नाही, आपण करतो.  मिल कामगार, छोटे उद्योजक संपताना बघितले आहेत. मी फक्त मार्ग दाखवू शकतो, चालायचे तुम्हालाच आहे.

काही शंका असल्यास फोन, व्हाट्सअप किंवा इमेल कराल.

धन्यवाद  
चला उद्योजक घडवूया

अश्विनीकुमार फुलझेले
८०८०२१८७९७  
Previous
Next Post »
0 आपले विचार