आयुष्यातील संकटामुळे तुम्ही गाजर बनता, अंड बनता कि कॉफी




एकदा एक मुलगी तिच्या आयुष्यातील समस्येपासून खूप त्रस्त असते. तिच्या आयुष्यातील कठीण काळ चालू असतो जो तिच्या चेहऱ्यावर दिसून येत असतो. गेल्या काही दिसंपौस्न तिच्या आईचे लक्ष्य असते व ती ओळखते कि आपली मुलगी एका कठीण प्रसंगातून चालली आहे. आपल्या मुलीला कसे समजवायचे असे विचार करताना तिला एक कल्पना सुचते.

ती तिच्या मुलीला किचन मध्ये घेवून जाते, गॅसवर ३ पातेले पाणी टाकून गरम करायला ठेवते, पहिल्या पातेल्यामध्ये ती गाजर टाकते, दुसऱ्या पातेल्यामध्ये ती अंड टाकते आणि तिसऱ्या पातेल्यामध्ये ती कॉफी टाकते आणि पाणी उकळण्याची वाट बघत असते. तिच्या मुलीला धीर धरवत नसतो, तिला आश्चर्य वाटत असते कि आई हे काय करत आहे म्हणून.

वीस मिनिटानंतर तिची आई गॅस बंद करते. ती गाजर एका प्लेट मध्ये, अंड एका प्लेट मध्ये आणि कॉफी कपमध्ये काढते.

आई (मुलीकडे बघून) : तुला काय दिसत आहे?

मुलगी : गाजर, अंड आणि कॉफी.

आई : नीट बघ, गाजराला हात लावून बघ.
तिची मुलगी हात लावते आणि नरम झाले आहे असे सांगते.

आई : आता अंड फोड.
तिची मुलगी अंड फोडते, वरचे कवच काढते आणि बोलते कि अंड कठीण झाले आहे.

तिची आई आता कॉफी कडे बोट दाखवते आणि प्यायला सांगते. तिची मुलगी जेव्हा कॉफीचा कप तोंडाजवळ नेते तेव्हा कॉफीचा सुगंध तिला येतो, एक घोट घेतल्यावर तरतरीत करणारी चव तिला येते, व हस्यासोबत तिचा चेहरा उजळतो.

मुलगी : आई तुला नक्की मला काय सांगायचे आहे?

आई : गाजर, अंड आणि कॉफी या तिघांनी गरम पाण्याचे सारखेच संकट झेलले. तरीपण तिघांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात. गाजर हे कठीण व मजबूत होते, पण संकटाच्या गरम पाण्याचा सामना केल्यावर ते नरम आणि कमजोर झाले. अंड हे आपल्या पातळ कवचा बरोबर नाजूक होते, पण जसा अंड्याचा संकटाच्या गरम पाण्याशी सामना होतो ते आतून कठीण होवून जाते. कॉफीचा विशेष गुणधर्म आहे. कॉफीने जेव्हा गरम पाण्याच्या संकटाचा सामना केला तेव्हा तिने उकळत्या पाण्याला बदलून टाकले व त्या पाण्यात सुगंध आणि स्वाद भरून नवीन पेय केले.
तू तुझ्या आयुष्यातील संकटाचा सामना करून कोण झालीस?
जेव्हा संकट तुझ्या आयुष्याचा दरवाजा वाजवत होती तेव्हा तू प्रतिक्रिया कशी देत होतीस?
तू गाजर आहेस, अंड आहेस कि कॉफी?

बोध : आयुष्यात अनेक घटना आपल्या अवती भोवती घडत असतात, काही घटना आपल्यासोबत घडत असतात, पण त्यामध्ये एकच महत्वाचे असते ते म्हणजे आपण कशी प्रतिक्रिया देतो ते आणि आपणा त्यापासून काय शिकतो. आयुष्य म्हणजे आपण तोंड दिलेल्या सगळ्या संकटापासून अनुभव, स्वीकार आणि बदल करून सकारात्मक आयुष्य घडवणे आहे.
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार