उसाचा रस व्यवसाय असलेल्या दोघांनी आजूबाजूला व्यवसाय सुरु केला. दुपारपर्यंत एकही ग्लास विकला नाही गेला, दोघेही त्रस्त झाले. मग एका व्यवसायिकाचा एक ग्लास रस विकला गेला, त्याचे १० रुपये मिळाले. तो व्यवसायिक खुश झाला व त्याने शेजारील उसाच्या रसाच्या व्यवसायिकाकडून एक उसाचा रस विकत घेतला. आता दुसरा उसाचा रस वाला पण खुश झाला. आता दुसर्या उसाच्या रस वाल्याने पहिल्याकडून एक उसाचा रस विकत घेतला. दोघे एकमेकांकडून उसाच्या रसाची खरेदी विक्री करत राहिले व रात्रीपर्यंत खूप विक्री केली.


एक स्टार्टअप (startup) आहे तर दुसरा व्हिसी (VC), ते दोघे एकमेकांना युनिकोर्न बनवत राहिले.


स्टार्टअप म्हणजे नवीन उद्योग व्यवसाय, व्हिसी म्हणजे नवीन आणि लघु उद्योग व्यवसायांनमध्ये गुंतवणूक करणारी कंपनी.


अश्विनीकुमार

Previous
Next Post »
0 आपले विचार