आकर्षणाचा सिद्धांत. अज्ञानाने केलेला गैर वापर आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर झालेला दुष्परिणाम

तिशीतील तरून एकदा माझ्याकडे आत्मविकासाच्या समुपदेशनासाठी आला होता. त्याने सरकारी नोकरी हि आकर्षणाच्या सिद्धांताद्वारे मिळवली होती, आणि ह्यामध्येच त्याची सर्व मानसिक आणि शारीरिक उर्जा हो संपून गेली होती.

सरकारी नोकरी, पगार असून असून किती असेल? आणि वरची कमाईहि असून असून किती असेल? त्याहीपेक्षा जास्त कमावणारे आहत कि. जेव्हा आपल्या आयुष्यात आकर्षणाचा सिद्धांत काम करणार असतो ती वेळ किंवा तो क्षण हा कुणालाच माहित नसतो. नाही धर्मगुरूला आणि नाही मानसोपचार तज्ञाला. म्हणून ते सतत सांगत असतात कि नेहमी सकारत्मक आणि मोठा विचार करा म्हणून.

पण आपण ऐकणार कुठे? गर्व जागा झालेला असतो, जिद्दीने आंधळे झालेले असतो. नको त्या ठिकाणी हजारो आणि लाखो खर्च कराल पण आत्मविकासासाठी १ रुपयाही खर्च नाही करणार. मग काय स्वर्ग आणि नर्क इकडेच आहे, तुम्हाला जे पाहिजे तसेच आयुष्य भेटेल. आणि कोणीही काहीही करू शकत नाही, अगदी तुम्हीसुद्धा.

जे काही महिने आणि वर्ष त्या तरुणाने आत्मविकासाद्वारे आकर्षणाच्या सिद्धांताला जागृत करायला घालवले आणि तेही फक्त समृद्धीचा एक घटक असलेल्या पैश्याला आकर्षित करण्यासाठी. म्हणजे प्रचंड समृद्धीचा समुद्र समोर आहे तर त्यामध्ये करोडोंचा पैश्यांचा प्रवाह येईल अशी नहर खोदण्याऐवजी फक्त एक छोटासा पाईप टाकून फक्त काही हजारांचा प्रवाह हा आपल्याकडे घेतला आणि तोही कायमस्वरूपी.

ह्यामध्ये त्याच्या खाजगी आयुष्यामधील बाकीचे भाग जसे मानसिक आणि शारीरिक आरोग्य, मानसिक आणि शारीरिक मुलभूत गरजा, जोडीदार म्हणजे बायको किंवा प्रेयसी, कौटुंबिक आयुष्य आणि सामाजिक आयुष्य हे संपूर्णपणे दुर्लक्षित केले गेले आणि आता ह्याचा परिणाम तो ह्या सर्व आयुष्यातील भागात अपयशी म्हणून जगत आहे.

मुर्खपणा करू नका. आपले आयुष्य काही मस्करी नाही आहे, एकदा जन्माला आला तर आलाच आणि एकदा मेलात तर मेलातच. इथे काही दुसरा मार्ग नाही आहे. म्हणून जेव्हाही विचार कराल, भावना व्यक्त कराल तेव्हा समृद्धीची व्यक्त कराल. समृद्धी मध्ये जीवनातील सगळे अंग येतात, एकही सुटत नाही. किंवा तुम्ही असे करू शकता कि फक्त ज्या अंगांची कमी आहे फक्त तितकेही घेतले तरी पुरेसे आहे.

आपल्या नैसर्गिक शारीरिक आणि मानसिक गरजा ओळखा. आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. ह्यामुळे तुमच्या आतील नकारात्मक उर्जेचे अडथळे जे भावनिक आणि वैचारिक स्वरुपात आहेत ते दूर होवून अध्यात्मिक उर्जा ज्याला आपण सकारात्मक किंवा आकर्षणाचा सिद्धांत बोलू ती वाहायला लागते.

आणि ह्यासोबतच तुमच्या आंतरिक बदलाबरोबर आजूबाजूची परिस्थितीही बदलत जाते. तुम्ही तुमच्या स्वप्नांचे आयुष्य अमर्याद स्वरुपात जगू लागतात.

आयुष्य तुमचे आणि जबाबदारही तुम्हीच.

घ्या आपल्या आयुष्याचा लगाम आत्मविकासाद्वारे आपल्या हातात.

धन्यवाद
अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार