आपल्यामधील काही गैरसमज दूर करा


चूक - उद्योजक बनायला खूप मेहनत करावी लागते.
बरोबर - उद्योजक बनणे खूप सोपे आहे. फक्त आवड आणि इच्छाशक्ती लागते. काही एका प्रयत्नातच आणि मेहनत न घेत सुरवातीपासून उत्तम व भरभराटिचा व्यवसाय करतात, काही थोड्या प्रयत्नाने, काही अथक प्रयत्नाने व काही जे बनतच नाही पण प्रयत्न करतच असतात. हे मानसिकतेशी आणि स्वभावाशी संबधित आहे.

चूक - उद्योजक उच्चशिक्षित असतात आणि त्यांनी नावाजलेल्या विद्यापीठामधून पदवी घेतली असते.
बरोबर - उद्योजक शाळेबाहेर प्रत्यक्ष व्यवहारिक अनुभव घेवून तयार होतो.

चूक - गरीब लोक उद्योजक बनू शकत नाही.
बरोबर - उद्योजक बनणे हे संपूर्णपणे मानसिकतेशी निगडीत आहे त्यामुळे कोणीही, जगाच्या पाठीवर कुठेही उद्योजक बनू शकतो.

चूक - फक्त वाममार्गाने मोठा उद्योजक होऊ शकतो.
बरोबर - प्रत्येक माणूस हा आपल्या स्वभावानुसार राहतो व त्यानुसार त्याचा उद्योग चालवतो. आणि दोन्ही प्रकारचे मोठे उद्योजक आपल्याकडे आहेत, मी त्यांच्या नावाचा उल्लेख इथे करणार नाही.

चूक - उद्योजक बनायला १८ वर्षे पूर्ण असावी लागतात.
बरोबर - उद्योजक बनायला वयाची मर्यादा लागत नाही कारण हा संपूर्णपणे मानसिक खेळ आहे. जेवढे कमी वयाचे उद्योजक भारताबाहेर जगात आहेत त्यापेक्षा जास्त त्यांचे प्रमाण भारतात आहे हे जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष उद्योगाला सुरवात कराल तेव्हा अनुभवास येईल.

चूक - ज्यांनी उद्योग करायचा प्रयत्न केला ते आज भिकेला लागलेत किंवा रस्त्यावर आले आहेत.
बरोबर - अर्धवट अनुभव, केलेल्या चुका परत परत करणे, विरुद्ध दिशेने जाने, अनुभवी किंवा तज्ञ लोकांची मदत न घेणे, ध्येय नसलेल्या नकारात्मक मानसिकता असलेल्या लोकांच्या समूहात वावरणे व भविष्यात चांगले होईल ह्या भ्रमात राहून उद्योग चालू ठेवणे ह्या सध्या गोष्टींमुळे नवीन उद्योजक आपला उद्योग डबघाईला आणतात.

आपले आयुष्य सोपे असते. नकारात्मक विचार ते कठीण बनवतात व सकारात्मक विचार ते सोपे बनवतात आणि इथेच मदत करते ते आत्म विकास. जो स्वतःच्या अंतर्मनामध्ये बदल घडवत जातो तो प्रगतीच्या पथावर असतो. म्हणून प्राचीन काळापासून एक सुविचार आहे "जे आत आहे तेच बाहेर आहे"

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार