३७०० करोड रुपयांचा आणि ६ लाख ५० लोकांना फसवणारा फेसबुक लाईक घोटाळा उघडकीस आला

उत्तर प्रदेश पोलिसांनी ३७०० करोड रुपयांचा आणि ६ लाख ५० लोकांना फसवणारा फेसबुक लाईक घोटाळा उघडकीस पाडला. हा उघड झालेला भारतातील सर्वात मोठा इंटरनेट घोटाळा आहे.
मुख्य सूत्रधाराचे नाव आहे अनुभव मित्तल, वय फक्त २६ वर्षे, २०१२ ला कंपनीची सुरवात झाली होती आणि आज ३७०० हजार करोडच्या उलाढाली पर्यंत पोहचली. खाजगी इंजीनिअरिंग कॉलेज मधून शिक्षण घेतले, कॉलेज मध्ये आमीर खानच्या थ्री इडीयट मधील हुशार व्यक्तिमत्व त्याला फुनसुक वांगडू म्हणून ओळखले जात होते.
एबलेझ इन्फो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड (Ablaze Info Solutions Pvt Ltd.) ह्या नावाने कंपनी नोएडा मध्ये कार्यरत होती आणि ह्याच्या वेबसाईट सध्याचे चे नाव आहे socialtrade . biz. हे सतत आपल्या वेबसाईटचे नाव बदलत असत.
हा भारतातील सर्वात मोठा उघड पडलेला घोटाळा ज्याची कार्यपद्धती हि एमएलएम सारखी होती म्हणजे जर एक मनुष्य जॉईन झाला तर त्याने कमीत कमी २ मनुष्यांना जॉईन करायचे. हि काम करायची पद्धत त्यांच्या ३ साथीदारांनी दिली ज्यांना पोलिसांनी ५०० करोड रुपयांसोबत दिल्लीमध्ये पकडले होते.
पोलीस सांगतात कि “ती काही लोकांना विश्वास बसण्यासाठी पैसे द्यायचे ज्यामुळे लोकांचा विश्वास बसायचा आणि त्यांचे बघून इतर लोक गुंतवणूक करत होते.”
जो मनुष्य ती वेबसाईट चालवत होता तो जे वेबसाईटला जॉईन झाले त्यांना हमी द्यायचा कि “जी लिंक तुमच्या मोबाईल वर येईल तिला क्लिक केल्यावर ५ रुपये भेटतील.” असे पोलीस सांगत होते.
अश्या पद्धतीने जेव्हा गुंतवणूकदार कंपनीच्या बँक अकाऊंट मध्ये हजारो रुपये टाकायचे तेव्हा त्यांना खोटी पैसे भरल्याची लिंक पाठवली जायची.
अनेक वर्षांपासून कंपनीचा हा घोटाळा सुरूच होता, पण जास्तीत जास्त पैसा हा कंपनीने मागील काही महिन्यात म्हणजे मागील वर्षी ऑगस्ट पासून कमावला, त्यानंतर ते काही पैसा हा ज्यांच्या कडून जास्त फायदा झाला अश्या काही हजार मूर्खांना देणार होते ज्यामुळे त्यांचे बघून अजून लाखो मूर्ख कंपनीला जॉईन झाले असते. (इथे मूर्खाच्या जागी शिवीचा वापर करू शकतात.)
जेव्हा पोलिसांनी नोएडा मधील कंपनीच्या मुख्य कार्यालयावर छापा टाकला होता तेव्हा त्यांना तिथे कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे आणि सभासदांचे २५० पासपोर्ट आढळून आले ज्यांना चांगल्या कामाचे बक्षीस म्हणून ऑस्ट्रेलिया ची सहल देण्यात आली होती.
अजून मूर्खांना फसवण्यासाठी ते तिथे जे कर्मचारी आणि सभासद गेले त्यांचे मौज मजा करण्याचे व्हिडीओ बनवून ते मार्केटिंग साठी वापरणार होते.
ह्याच्या मुख्य सूत्रधाराने घोटाळ्याचे पैसे अनेक महागडे बंगले, महागड्या गाड्या आणि सेलिब्रिटी पार्टी वर खर्च केले.
तरीही काही लाभधारक ह्या कंपनीला सपोर्ट करत आहेत, त्यांना “बकरेकि मा कब तक खैर मनायेगी” हि हिंदीची म्हण माहित नाही. जगामध्ये कुठेही जा फक्त घोटाळे करू शकणारेच इतक्या जलद गतीने पैसे कमवू शकतात ना कि नवीन कल्पना घेवून येणारे.
हा घोटाळा इतका मोठा आहे कि पोलिसांना हा घोटाळ्याचा सर्व पैसा शोधून काढण्यासाठी बराच वेळ लागणार आहे, ह्यामध्ये काही बँक कर्मचाऱ्यांचा हि समावेश असण्याची शक्यता पोलीस नाकारत नाही. हे इतके मोठे काम आहे कि पोलिसांना इन्कमटेक्स आणि बाकी सरकारी खात्यांची मदत घ्यावी लागणार आहे.
सायबर क्राईम म्हणजे इंटरनेट वरील गुन्ह्यांचे भारत हे जगात दुसर्या नंबरचे माहेर घर झाले आहे, तीन वर्ष म्हणजे २०१४ पर्यंत सायबर गुन्ह्यात ३५० टक्क्यांनी प्रचंड वाढ झाली आहे.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार