सकारात्मक आणि नकारात्मक शब्दांचा परिणाम


७ वर्षांचा अजय हा सतत हस्त खेळत आनंदात राहणारा मुलगा एकदा बगीच्यात खेळायला आला होता. तो झाडावर चढत होता.

अजय काही पहिल्यांदाच झाडावर चढत नव्हता. तो वर जात जात ३० फुटापर्यंत त्या झाडावर चढून गेला.

त्याला त्याचा उस्ताह हा तब्यत ठेवता येत नव्हता. तो एक फांदी पकडून त्यावर हातांनी जोर जोरात मागे पुढे झुलू लागला.

तो त्याच्या खेळण्यात इतका मग्न होता कि त्याला कळतच नव्हते कि ती फांदी तुटूही शकते.

अजयचे बघून त्याचा चुलत लहान भाऊ सचिनही झाडावर चढू लागला, तोही जवळपास अजय च्या १० फुट खाली एका फांदीवर लटकू लागला.

अजय चे वडील आणि सचिन ची आई हे आप आपल्या मुलांवर लक्ष्य ठेवून होते. ते काही बोलण्याअगोदर जोर जोरात वारे वाहू लागले आणि ते झाड हेलकावे घेवू लागले,

“अजय घट्ट पकडून ठेव” अजयच्या वडिलांनी मोठ्याने ओरडून सांगितले.
“सचिन खाली पडू नको” सचिनच्या आईने घाबरून जावून मोठ्याने ओरडून सांगितले.

काही सेकंदानेच सचिनचा झाडाच्या फांदीला पकडलेला हात सुटला आणि तो तोल जावून खाली पडला. नशिबाने त्याला काही जास्त लागले नाही, आणि अजय आरामत सांभाळत झाडावरून खाली उतरत आला.

घरी गेल्यावर सचिनच्या आईने अजयच्या वडिलांना विचारले “मला आश्चर्य वाटले कि दोन्ही मुल हि एकाच झाडावर लटकलेली होती माझ्या मुलाचा हात निसटला आणि पडला पण तुमचा मुलगा नाही पडला, असे कसे झाले?”

अजय च्या वडिलांनी उत्तर दिले “मला नक्की नाही सांगता येत पण जेव्हा जोर जोरात वारे वाहू लागले होते तेव्हा तुम्ही घाबरलात आणि घाबरून मोठ्याने ओरडलात कि “सचिन पडू नकोस” आणि दुसर्याच क्षणी सचिन फांदी पकडून ठेवू शकला नाही आणि तो पडला.”

सचिन ची आई जेव्हा न समजल्याने परत आश्चर्याने बघू लागली तेव्हा अजय चे वडील स्पष्ट करून सांगू लागले “आपल्या मन मेंदूला आपल्या नकारात्मक आदेशावर कृती करायला कठीण जाते, आपले मन मेंदू हे गोंधळून जाते.
सचिन ची पहिली प्रतिक्रिया हि होती कि तो कल्पना करू लागला आहे कि तो पडला आहे म्हणून आणि त्याचे मन मेंदू हे त्याला पडू नको म्हणून सांगत होते.
जेव्हा अजय ने आपल्या मन मेंदूला आदेश दिला कि घट्ट पकडून ठेव तेव्हा त्याचा मेंदू लगेच घट्ट पकडून लटकण्याची कल्पना करू लागला आणि फांदी घट्ट पकडून ठेवायची हा आदेशही माणू लागला, व त्याने तसे केले.”

सचिनची आई हे उत्तर ऐकून चक्रावून गेली. कसे सकारात्मक विचार आणि शब्द हे आपल्या मन, मेंदू आणि आयुष्यात बदल घडवून आणतात हा विचार ती करत बसली.

ह्या लघु कथेमध्ये आपल्या संपूर्ण आयुष्याचा सारांश दडलेला आहे. ह्या परिस्थितीजागी तुम्ही तुमच्या आयुष्यातील कुठल्या अंगात समस्यांना सामोरे जात आहात किंवा गेला आहात ते ठेवा, तुम्हाला उत्तर आरामात भेटेल.

ह्यामधील ९० % समस्या ह्या समुपदेशनाद्वारे आपण आपल्या आयुष्यातून कायमस्वरूपी मुळापासून नष्ट करू शकतो, किंवा त्याची तीव्रता कमी करू शकतो.

प्रत्येक क्षणी सकरात्मकच विचार कराल, कारण आकर्षणाचा सिद्धांत आणि आपले मन मेंदू पाहिजे ते वास्तवात आणू शकते.

धन्यवाद
अश्विनीकुमार

बालक, पालक आणि कुटुंब
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार