बेघर परिस्थिती ते जगप्रसिद्ध सिने नायक, अभिनेता आणि श्रीमंत व्यक्तिमत्व सिल्वेस्टर स्टेलोन


प्रेरणादायी सत्य घटनांवर आधारित जीवनगाथा

हि कथा वाचूनही तुमचे रक्त सळसळले नाही तर ते रक्त नसून पाणी आहे.

आयुष्यामधील प्रचंड दुख संकट आणि दारिद्र्यापासून सुख समृद्धीचे साम्राज्य उभे केले.

सिल्वेस्टर स्टेलोन, जगप्रसिद्ध सुपरस्टार हॉलीवूड अभिनेता, २०१६ साली नमूद केलेली संपत्ती ४ बिलियन डॉलर म्हणजे भारतीय २४० खरब रुपये इतकी आहे. हि झाली सिल्वेस्टर स्टेलोन ची वर्तमान परिस्थिती.

भूतकाळात सिल्वेस्टर स्टेलोन काही चांदीचा चमचा घेवून जन्माला नव्हता आला. त्याने आयुष्याच्या प्रत्येक भागात संघर्ष केला. तो इतक्या आर्थिक अडचणीत होता कि त्याला त्याच्या बायकोचे दागिने हे चोरून विकावे लागले. परिस्थिती इतकी खालावत गेली कि तो शेवटी बेघर झाला. ३ दिवस तो न्यू योर्क च्या बस स्टेशन वर झोपला होता. परिस्थिती इतकी बिकट होती कि न तो घर भाडे भरू शकत होता आणि नाही जेवण विकत घेवू शकत होता.

आश्चर्याची गोष्ट हि होती कि ह्या परिस्थितीची परिसीमा गाठली तेव्हा गाठली जेव्हा तो त्याच्या कुत्रायालाही खाऊ घालू शकत नव्हता, त्यावेळेस दारूच्या दुकानाजवळ तो कुणाही अनोळखी व्यक्तीला कुत्रा विकायला तयार झाला होता. शेवटी त्याने तो कुत्रा १७०० रुपयांना विकला आणि रडत रडत तो तिथून निघून गेला.

२ आठवड्यानंतर जेव्हा सिल्वेस्टर स्टेलोन मुहोम्मद अली विरुद्ध चक वेपनर ह्यांचा बॉक्सिंग चा सामना बघितला होता, त्यानंतर त्याला रॉकी ह्या इतिहासातील प्रसिद्ध सिनेमाची कथा लिहायचे प्रोस्ताहन भेटले. त्याने २० तासातच सिनेमाची स्क्रिप्ट लिहून काढले. त्यानंतर जेव्हा सिल्वेस्टर स्टेलोन जेव्हा स्क्रिप्ट विकायला गेला होता तेव्हा त्याला १,२५,००० डॉलर (८५ लाख रुपये) इतकी ऑफरहि भेटत होती. पण त्याची एक अट होती कि त्याला त्या सिनेमामध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम करायचे होते.

पण प्रत्येक स्टुडीओ त्याला नाकारत होता कारण त्यांना मुख्य अभिनेता म्हणजेच त्या वेळचा प्रसिद्ध कलाकार घ्यायचा होता. ते त्याला म्हणत असत कि “तू दिसतोही जोकर सारखा आणि बोलतोही जोकर सारखा.” मग तो तिकडून आपली स्क्रिप्ट घेवून निघून यायचा. काही आठवड्यानंतर स्टुडीओ ने परत १,७०,००,००० रुपयांची ऑफर दिली सिल्वेस्टर ने तो ऑफरहि नाकारली. त्यानंतर त्यांनी २,३८,००,००० ची ऑफर दिली आणि तीही नाकारली गेली. त्याला त्या सिनेमामध्ये मुख्य अभिनेता म्हणूनच काम पाहिजेच होता.

शेवटी त्या स्टुडीओ ने स्क्रिप्ट साठी २४ लाख दिले आणि सिल्वेस्टर स्टेलोन ला मुख्य नायकाची भूमिकाहि दिली. बाकीचा इतिहास हा तुम्हाला माहितच आहे. तुम्हाला काय वाटते कि त्याने हे २४ लाख भेटल्यावर काय विकत घेतले असेल? जो कुत्रा त्याने विकला होता तो. हो, स्टेलोन आपल्या कुत्र्यावर खूप प्रेम करत होता. स्टेलोन ३ दिवस त्या दारूच्या दुकानाच्या बाहेर ज्या माणसाला कुत्रा विकला होता त्याला शोधत थांबला होता.

शेवटी तिसर्या दिवशी तो मनुष्य त्याच्या कुत्र्यासोबत येताना त्याला दिसला. त्याने त्या मनुष्याला तो कुत्रा का विकला हे कारणही समजून सांगितले आणि आपला कुत्रा परत मागितला, त्या मनुष्याने स्पष्ट नकार दिला. स्टेलोन ने त्याला ७००० रुपये देवू केले तेही त्या मनुष्याने नाकारले. ३४ हजार देवू केले तेही नाकारण्यात आले, ६८ हजार देवू केले तेही नाकारण्यात आले.

तुमचा विश्वास नाही बसणार पण शेवटी स्टेलोनने त्याला चक्क १० लाख २० हजार रुपये देवू केले त्याच कुत्र्यासाठी जो त्याने संकटात असताना फक्त १७०० ला विकला होता आणि स्टेलोनने आपला कुत्रा परत मिळवला.

तोच स्टेलोन जो रस्त्यावर झोपायला मजबूर झाला होता, ज्याने आपला कुत्रा फक्त त्याला खायला घालू शकत नाही म्हणून विकला होता तो आजच्या घडीला ह्या पृथ्वीतलावर इतिहासातील सर्वकृष्ट अभिनेता आणि एक श्रीमंत व्यक्ती म्हणून वावरत आहे.

बिकट परिस्थिती खूप वाईट असते. खरच खूप वाईट असते. कधी तुम्हाला स्वप्न पडले होते का? अद्भुत स्वप्न? पण तुम्ही इतक्या बिकट परिस्थितीत असतात कि त्यावर तुम्ही अमलबजावणी करू शकत नाही? ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःला खूप शुद्र समजत आहात? स्वतःला कमी लेखत आहात? असे माझ्यासोबतहि अनेक वेळा झाले आहे.

आयुष्य खूप कठीण आहे. संधी अशी काय तुमच्या बाजूने निघून जाते कि तुम्ही कोणीच नाही आहात. लोकांना तुम्ही उत्पादनासारखे पाहिजे आहात, ना कि तुम्ही. जग खूप निष्ठुर आहे. जर तुम्ही प्रसिद्ध, श्रीमंत किंवा तुमची ओळख नसेल तर तुम्ही बिकट परिस्थितीत आहात.

तुमच्या तोंडावर दरवाजे बंद केले जातील. लोक तुमची प्रतिष्ठा धुळीस मिळवतील, आणि तुमच्या आशा ह्या पायदळी तुडवतील. तुम्हाला कसे तरी धक्का देत देत पुढे जात जायचे आहे आणि तरीही काही नाही घडणार.

आणि मग तुमच्या आशा ह्या मावळल्या जातील. तुम्ही कोलमडून गेला असाल. पूर्णपणे कोलमडून गेला असाल. तुम्हाला जगण्यासाठी मिळेल ते काम करावे लागेल. तुम्हाला कदाचित पोटभर तर सोडाच पण एकवेळचे अन्न देखील मिळणार नाही. आणि हो कदाचित तुम्हाला रस्त्यावर झोपावेही लागेल.

तुमच्या स्वप्नांना कधीच म्हणजे कधीच संपू देवू नका. काहीही घडत गेले तरी स्वप्न बघने सोडू नका. तुमची आशा संपली असेल तरीही स्वप्न बघत रहा.

त्यांनी पाठ फिरवली तरीही स्वप्न बघत रहा.

त्यांनी दरवाजा बंद केला तरीही स्वप्न बघत राहा.

तुम्ही सोडून कुणालाच माहिती नाही कि तुमची क्षमता काय आहे ते. तुम्ही काय आहात आणि कोण आहात हे सामान्य लोक तुमच्या कपड्यांवरून म्हणजेच बाहेरील पेहरावावरून ओळखतील. पण कृपया करून आपली लढाई थांबवू नका, इतिहासात आपली जागा बनवण्यासाठी लढाई करा. आपल्या प्रतिष्ठेसाठी लढाई करा. कधी म्हणजे कधीच हार माणू नका.

भले तुमच्या अंगावर एकही कपडा नसू देत, भले मग तुम्ही रस्त्यावरील कुत्र्यांसोबत झोपत असाल, हे ठीक आहे, पण जो पर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही संपला नाही आहात, माझ्यावर विश्वास ठेवा.

सतत लढाई करत रहा. सतत तुमची स्वप्न आणि आशा ह्या जिवंत ठेवा. श्रेष्ठतेकडे वाटचाल सुरु ठेवा. प्रतिष्ठेकडे वाटचाल सुरु ठेवा.

अश्या आयुष्यात चमत्कार घडवणाऱ्या मराठी व्यक्तीमत्वानसोबत माझा दररोज चा संपर्क येत असतो.

सिल्वेस्टर स्टेलोन करू शकतो तर तुम्हीही करू शकता.
मी करू शकतो तर तुम्हीही करू शकता.
जगामध्ये इतर कोणी करू शकते तर तुम्हीही करू शकता.

धन्यवाद
अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार