धीर धरण्याची शक्ती भाग १


मार्शमेलो (आपण इथे गुलाब जाम हा शब्द वापरूया) प्रयोग स्टेनफोर्ड प्राध्यपक वाल्टर मिशेल यांनी महत्वाच्या मानसिक अभ्यासाची एका मागून एक अशी शृंखला सुरु केली.
ह्या प्रयोगाच्या वेळी ४ ते ५ वर्ष वयाच्या १०० हून अधिक मुलांवर चाचणी घेण्यात आली, ह्या प्रयोगाद्वारे जे आरोग्य, पैसा, काम आणि आयुष्यात विश्वास ठेवण्यासारखे व अतिशय महत्वाचा माणसातील गुण निदर्शनास आला.
आता आपण प्रयोगाबद्दल बोलूया व तो गुण आपण आल्या आयुष्यात कसा वापरू शकतो ते हि बघूया.
गुलाब जाम प्रयोग
प्रत्येक लहन मुलाला एकांत खोलीत नेण्यात आले, त्यांना खुर्चीवर बसवून त्यासमोरील टेबलावर त्यांच्या समोर गुलाब जाम ठेवण्यात आला.
खुर्चीवर बसणाऱ्या प्रत्येक मुलासोबत प्रयोगकर्ता एक करार करत होता.
प्रयोगकर्ता बोलला कि मी आता खोली बाहेर जात आहे. जर मी बाहेर असताना हा गुलाब जाम नाही खाल्ला तर तुम्हाला बक्षीस म्हणून अजून एक गुलाब जाम देण्यात येईल. असो, जर प्रयोगकर्ता येण्याच्या आत त्या लहान मुलाने ठरवले कि तो गुलाब जाम खायचा मग त्या मुलाला अजून एक गुलाब जाम नाही भेटणार.
निर्णय सोपा होता : फक्त एक आता लगेच खायचे किंवा थोडी वाट बघून एक सोडून दोन खायचे.
प्रयोगकर्ता १५ मिनिटांसाठी खोली सोडून जातो.
खालील व्हीडीओ मध्ये बघू शकता कि एकटी वाट बघत असणारी लहान मुल आपले मनोरंजन करत असतात. प्रयोगकर्त्याने दरवाजा बंद करताच काही मुल गुलाब जाम वर तुटून पडतात व खाऊन टाकतात. उरलेली काही शरीराचे चाळे करत असतात, उड्या मारतात व खुर्ची सरकवत असतात, अश्याने ते स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, पण काही वेळाने ते गुलाब जाम खायचा मोह टाळू शकत नाही. आणि शेवटी त्याच्यामधील काही मुल धीर धरण्यामध्ये यशस्वी झाले.
१९७२ साली प्रसिध्द झालेला हा प्रयोग द मार्शमेलो प्रयोग म्हणून ओळखण्यात येतो, त्यावेळेस हा प्रयोग फार प्रसिध्द नव्हता, कारण त्याचा महत्वाचा व माणसाच्या सर्वांगीण विकासाशी निगडीत भाग हा नंतर आला. तो भाग किंवा प्रयोगाचा निष्कर्ष हा पुढील दुसऱ्या भागात बघू.
अश्विनीकुमार फुलझेले
निर्वाणा
सल्लागार, वक्ता, प्रशिक्षक
८०८०२१८७९७
solution.nirvana@gmail.com
Previous
Next Post »
0 आपले विचार